भूगोल ग्रामीण जीवन विज्ञान

ग्रामीण म्हणाजे काय?

ग्रामीण हा शब्द 'गाव' या संज्ञेशी संबंधित आहे.

व्याख्या:

  • शहरांपासून दूर असलेला आणि शेतीप्रधान असलेला भाग म्हणजे ग्रामीण भाग.
  • जिथे लोकसंख्या कमी असते आणि निसर्गावर आधारित जीवनशैली असते, त्याला ग्रामीण जीवन म्हणतात.

ग्रामीण भागाची काही वैशिष्ट्ये:

  • शेती हा प्रमुख व्यवसाय असतो.
  • लोकसंख्या घनत्व कमी असते.
  • नैसर्गिक वातावरण जास्त असते.
  • शहरांच्या तुलनेत सोयीसुविधा कमी असतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. विकिपीडिया - ग्रामीण वस्ती
1 उत्तर
1 answers

ग्रामीण म्हणाजे काय?

2
पूर्वी जी गावे वसलेली ती शेटे-महाजनांनी राजाज्ञेने वसवली. सरकारचा हुकूम झाला की ही मंडळी एखाद्या ओसाड जागी जायची. त्यांच्याजवळ सरकारचे अभयपत्र असायचे. तेवढ्या भरंवशावर लोक तिथे येऊन वसती करायचे. मराठेशाहीत युद्धामुळे अशी अनेक गावे उध्वस्त व्हायची, आणि मग शेटे-महाजनांमुळे परत वसायची. अशा रीतीनी खोरीच्या खोरी त्यांनी वसवली. पुण्याच्या सदाशिव, नारायण, नाना या पेठा अशाच शेटे-महाजनांनी वसवल्या. त्याबद्दल त्यांना गावकऱ्यांकडून तेल, पासोड्या, विड्याची पाने यासारख्या गोष्टी वर्षभर फुकट मिळायच्या.

गाव वसताना तेथे शिंपी, तेली, तांबोळी, कोष्टी, गवंडी, कासार, पिंजारी आणि रामोशी येतील हे पाह्यले जायचे. एकदा ही मंडळी जमली की अनेक भटक्या जमातीच्या लोकांची गावात ये-जा सुरू व्हायची. कोष्ट्याकडून कापडे विकत घेऊन गावकरी शिंप्याकडून कपडे शिवून घ्यायचे. तेल्याने घरी घाणा चालवून करडई, तीळ, शेंगादाणा, जवस अशा प्रकारची तेले काढायची आणि ती गावोगाव विकायची. कासार घोड्यावरून गावोगाव मुली-बायकांना बांगड्या विकून यायचे आणि त्याबदल्यात धान्य मिळवायचे. अशा रितीने एकदा गावगाड सुरळीत सुरू झाला की शेट-महाजन त्या गावात त्यांच्यापैकी एखाददोन माणसे ठेवून दुसऱ्या ठिकाणी गाव वसवायला जायचे.
उत्तर लिहिले · 28/8/2022
कर्म · 1975

Related Questions

राजकीय भूगोलाची व्याख्या सांगून त्याचे स्वरूप स्पष्ट करा?
नैसर्गिक घटक व सांस्कृतिक घटक यातील फरक काय आहे?
आदिवासी जमाती भारताच्या कोणत्या विभागात मुख्यतः आढळतात, स्पष्ट करा?
भारतातील दळणवळणाची विविध साधने कोणती आहेत ते स्पष्ट करा?
ग्रामीण आणि नगर यातील भेद थोडक्यात स्पष्ट करा?
डांगी भाषा महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात बोलली जाते?
अरबी समुद्रात कोणत्या बेटांचा समूह आहे?