2 उत्तरे
2
answers
इस्रोचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
1
Answer link
विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) चे संचालक आणि इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ एस. सोमनाथ यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) चे नवीन प्रमुख बनविण्यात आले आहे. ते देशातील सर्वोत्तम रॉकेट तंत्रज्ञान आणि एरोस्पेस अभियंता आहेत. १४ जानेवारीला इसरोचे पूर्वप्रमुख के. सिवन यांचा कार्यकाळ संपला, त्यानंतर इसरोचे दहावे प्रमुख म्हणून एस. सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली.
0
Answer link
एस. सोमनाथ यांची इसरोचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते के. सिवन यांच्या जागेवर आले आहेत. एस. सोमनाथ हे एक रॉकेट वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि liquid propulsion systems center चे संचालक म्हणून काम केले आहे.