निसर्ग
भूगोल
सरोवर
निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाणारे खऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
3 उत्तरे
3
answers
निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाणारे खऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
2
Answer link
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.
धन्यवाद...!!
0
Answer link
लोणार सरोवर, जे निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाते, ते बुलढाणा जिल्ह्यात आहे.
हे सरोवर एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि ते एका उल्कापातामुळे तयार झाले आहे, असा समज आहे.
हे ठिकाण पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: