2 उत्तरे
2
answers
राक्षसताल सरोवर बद्दल माहिती द्या?
0
Answer link
कैलास पर्वताची यात्रा हिंदू आणि जैन भाविकांसाठी अति पवित्र यात्रा मानली जाते. या मार्गावर लागणारे मानसरोवर हा यात्रेचा महत्वाचा टप्पा मनाला जातो आणि यासरोवरात भाविक कडाक्याच्या थंडीतही स्नान करण्याचे पुण्य मिळवितात. कैलास पर्वताजवळ राक्षसताल नावाचेही सरोवर आहे मात्र यात कुणीही स्नान करत नाही कारण या सरोवरात स्नान केले तर बुद्धी भ्रष्ट होते असा समज आहे. http://bit.ly/3s5fmo6
यामागे अशी कथा सांगतात कि लंकेचाराजा रावण अतिविद्वान, उत्तम प्रशासक आणि प्रतिभाशाली होता. तोशिवभक्त होता. त्याने कैलास पर्वताजवळ शिवाची उपासना केली तेव्हा या सरोवरात अगोदर स्नान केले होते. येथे शेजारीच असलेले गौरी कुंड हे पार्वतीचे स्नानस्थळ होते.
येथे रावणाची नजरपार्वतीवर पडली. रावणाच्या उपासनेने प्रसन्न झालेल्या महादेवानी जेव्हा रावणाला काय हवे असे विचारले तेव्हा रावणाने तुमची पत्नी पार्वती द्या अशी मागणी केली. सरोवरात स्नान केल्याने रावणाची बुद्धी भ्रष्ट झाली व त्यामुळे त्याने अशी मागणीकेली असा समज आहे.या सरोवरात स्नान न करण्यामागे वैज्ञानिक कारणही दिले जाते. या सरोवरात काही घातक नैसर्गिक वायू पाण्यात मिसळले आहेत. त्यामुळे हेपाणी काहीसे विषारी झाले आहे. यात स्नान केल्याने मृत्यूचा धोका नाही पण त्या पाण्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात म्हणून येथे स्नान केले जात नाही असे सांगितले जाते.

____________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*🔵 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🔵*_
______________________________
0
Answer link
राक्षसताल सरोवर हे तिबेटमध्ये असलेले एक सरोवर आहे. मानसरोवर सरोवराच्या पश्चिमेला हे सरोवर आहे.
- स्थान: हे सरोवर कैलास पर्वताजवळ आहे.
- भूभाग: राक्षसताल हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून ह्याचा आकार चंद्रकोरीसारखा आहे.
- क्षेत्रफळ: याचा आकार 250 चौरस किलोमीटर आहे.
- इतिहास: राक्षसताल हे रावणाशी संबंधित आहे, त्याने येथे तपश्चर्या केली होती असे मानले जाते.
अधिक माहितीसाठी आपण खालील दुवे बघू शकता: