सामन्याज्ञान वाहतूक वाहन परवाना

दोन चाकी गाडीचा परवाना (लायसन्स) हरवले असेल तर परत कसे मिळेल?

3 उत्तरे
3 answers

दोन चाकी गाडीचा परवाना (लायसन्स) हरवले असेल तर परत कसे मिळेल?

2
तुमचा वाहन परवाना हरवला आहे? 'या' पद्धतीने तुम्हाला मिळवता येईल डुप्लिकेट Driving Licence

ज्या वेळेस तुम्ही वाहन चालवता त्यावेळी तुमच्या सोबत वाहन परवाना (Driving Licence) ठेवणे अनिवार्य आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय जर तुम्ही वाहन चालवत असल्यास तुमच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.

मात्र काही वेळेस असे होते की, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवते किंवा चोरी होते. अशा वेळी आपल्याला त्याबद्दल चिंता वाटते. परंतु यामध्ये टेन्शन घेण्याची कोणतीच गरज न्ही आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स हरवले किंवा खराब होण्याच्या स्थितीत असल्यास तुम्ही ते डुप्लिकेट पद्धतीने ही मिळवू शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.

काही राज्यांच्या RTO विभागाकडून डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन मिळवता येण्याची सुविधा ही उपलब्ध करुन दिली आहे. मात्र काही ठिकाणी ही सुविधा नाही आहे. अशावेळी तुम्हाला तुमच्या येथील परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. येथे तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीने याची माहिती दिली जाणार आहे. तर तुम्हाला वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने डुप्लिकेट लायसन्स मिळवण्याची सुविधा दिली जात असेल तर 'या' काही स्टेप्स वापरुन ते तुम्ही मिळवू शकता.

>>डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 'या' स्टेप्सचा वापर करा :

-सर्वात प्रथम तुमच्या राज्याच्या वाहतुक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

- तेथे तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागणार असून LLD फॉर्म भरावा लागणार आहे.

-हा फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आइट जरुर मिळवा.

-मात्र ज्यावेळी तुमच्याकडे महत्वाची कागदपत्रे मागितली जातील त्यावेळी ती अटॅच करा.

-ही कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने RTO ऑफिसमध्ये सादर करु शकता.

-या स्टेप्स फॉलो केल्यानंतर पोस्टाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईल. मात्र तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही तो पर्यंत अर्जाची पावती सांभाळून ठेवावी लागणार आहे. 

तर ऑफलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला RTO ऑफिसला भेट द्यावी लागणार आहे. त्याचसोबत तेथे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुमच्याकडून 200 रुपयांचा शुल्क ही भरावा लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स पत्त्यावर पाठवले जाणार आहे.


धन्यवाद...!!

उत्तर लिहिले · 13/8/2022
कर्म · 19610
1
हरवलेले लायसन्स परत मिळवणे
उत्तर लिहिले · 13/8/2022
कर्म · 25
0
हरवलेल्या दुचाकी वाहन परवान्यासाठी (लायसन्स) अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

1. एफआयआर (FIR) नोंदवा:

परवाना हरवल्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवा. एफआयआरची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.

2. अर्ज सादर करणे:

RTO (Regional Transport Office) मध्ये जाऊन अर्ज भरा. अर्ज ऑनलाइन उपलब्ध असल्यास, तो डाउनलोड करून भरा.

3. आवश्यक कागदपत्रे:

  • एफआयआरची प्रत
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, इत्यादी)
  • पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, वीज बिल, इत्यादी)
  • जुना परवाना नंबर (माहित असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

4. शुल्क भरणे:

डुप्लिकेट परवान्यासाठी आवश्यक शुल्क भरा.

5. अर्ज जमा करणे:

भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे RTO मध्ये जमा करा.

6. पडताळणी आणि प्रक्रिया:

तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर डुप्लिकेट परवाना जारी केला जाईल.

7. डुप्लिकेट परवाना मिळवणे:

पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला डुप्लिकेट परवाना मिळेल.

हे लक्षात ठेवा:

  • अर्ज करण्यापूर्वी RTO च्या वेबसाइटवर किंवा कार्यालयात जाऊनcurrent process आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासा.
  • काही RTO मध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

वाहतुकीचा सर्वात स्वस्त पर्याय कोणता?
एचएसआरपी नंबर प्लेट जुनी गाडी २५ वर्ष जुनी आहे, तिला प्लेट बदलून घेता येते का? आरसी संपली आहे तरी?
माझ्या गाडीची आरसी संपली आहे. 99 ची गाडी आहे. फॅन्सी नंबर प्लेट बसवण्यासाठी काय करावे?
जुनी गाडीचे नंबर हे तीन अक्षरी आहेत, ते नवीन नंबर प्लेटसाठी कसे बदलता येतील?
महिंद्रा पिकअपसाठी कोणकोणती कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात?
घरोघरी व दरडोई वाहने उपलब्ध असलेला देश कोणता?
मराठ्यांच्या काळात दळणवळणाची साधने कोणती होती?