मूलभूत विज्ञान विज्ञान

विज्ञान म्हणजे नेमके काय?

2 उत्तरे
2 answers

विज्ञान म्हणजे नेमके काय?

0


विज्ञान म्हणजे काय?
 


अनेकदा तर एखाद्या गोष्टीमागे तंत्रज्ञान दडले आहे याची आपल्याला जाणीव नसते. साधे फुलका(पोळी) करण्याचे उदाहरण घ्या. छान गोलगोल, टम्म फुगलेला, उत्तम शेकलेला, पण तरीही अंगावर भाजल्याच्या खुणा न मिरविणारा फुलका बनविणे हे कौशल्याचे काम आहे. कणिक योग्यरीत्या मळणे, त्या ओल्या गोळ्याला पुरेसा ‘वाक’ असणे, तो सर्व बाजूंनी सारखा दाब देऊन लाटला जाणे, योग्य उष्णतेवर योग्य वेळ भाजला जाणे व अखेरीस गरमागरम फुलका त्याला धक्का न लावता हलकेच आगीतून डब्यात घालणे या सर्व क्रियांसाठी आपण क्रमशः परात, पोळपाट-लाटणे, चूलशेगडी-गॅस व चिमटा या उपकरणांचा वापर करत असतो. 


एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा- विज्ञान, वैज्ञानिक. तुमच्या डोळ्यापुढे कसल्या प्रतिमा येतात?- चकाचक प्रयोगशाळा व तिथली मोठ-मोठी उपकरणे, चंबूपात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकड्यांची गिचमिड, e=mc2 यांसारखी अगम्य समीकरणे, पृथ्वीभोवती गरगरणारे उपग्रह, झाडावरून पडणारे सफरचंद पाहून विचारात पडलेला न्यूटन, आयफोन, पांढऱ्या कोटातले, रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे वेंधळे शास्त्रज्ञ ...

आणि मनात कुठले शब्द येतात?- सृष्टीज्ञान, निरीक्षण, प्रयोग, अनुमान, सिद्धांत, प्रमेय, तर्कशुद्ध विचारपद्धती...

हे सारे आपापल्या जागी बरोबर आहे. पण विज्ञान यांच्यापलीकडेही आहे. विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास मी म्हणेन-

१. विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञान-संपादनाची एक पद्धतही आहे.

२. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.

३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. (अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही.)

४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.

५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच कितीतरी शतकांपासून लाखो, करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत व त्यात आपले योगदान देऊन त्याला व स्वतःला समृद्ध करत आली आहेत..

६. हा ‘खेळ’ खेळणाऱ्यांसाठी- ज्यांना आपण वैज्ञानिक म्हणतो- जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे. विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण तंत्रज्ञान असे म्हणतो.

आता याच मुद्यांचा थोडा खोलात जाऊन विचार करू या.

विज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी या पृथ्वीवरील लाखो व्यक्तींच्या माध्यमातून होत असते. त्यातील कोणताही तुकडा वेगळा नसतो. तर तो परस्परांशी, विश्वातील एकूण विज्ञान समुच्चयाशी जुळलेला असतो, त्याच्याशी सुसंगत असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रितसाठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते (किंवा असायला हवी). विज्ञान हे एकाच वेळी ज्ञानसमुच्चय असते व त्याच्या निर्मितीची पद्धतही असते. वैज्ञानिक पद्धतीने जे ज्ञान मिळते, त्यालाच आपण विज्ञान म्हणतो. (वैज्ञानिक पद्धतीचा सविस्तर विचार आपण नंतरच्या लेखांमध्ये करणार आहोत.) विज्ञानाचा मूळ उद्देश सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना वा प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. ते शोधून काढण्याच्या पद्धतीचे नावही विज्ञानच. काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभबिंदू- गृहितक- ठरविणे. आता या दोन बिंदूंना सांधणारा रस्ता प्रयोग- निरीक्षण- निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहितक व संशोधनपद्धती तपासून पाहणे व नव्याने सुरुवात करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते व तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे
उत्तर लिहिले · 6/8/2022
कर्म · 53750
0

विज्ञान म्हणजे निसर्गाचा आणि आपल्या सभोवतालच्या जगाचा अभ्यास पद्धतशीरपणे करणे होय.

विज्ञानामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • निरीक्षण करणे: आपल्या सभोवतालच्या जगाचे बारकाईने निरीक्षण करणे.
  • प्रश्न विचारणे: निरीक्षणांवरून प्रश्न निर्माण करणे.
  • अनुमान लावणे: प्रश्नांची संभाव्य उत्तरे शोधणे.
  • प्रयोग करणे: लावलेल्या अनुमानांची चाचणी घेणे.
  • निष्कर्ष काढणे: प्रयोगांच्या निष्कर्षांवरून अनुमान बरोबर आहे की चूक हे ठरवणे.

विज्ञानामुळे आपल्याला जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी विज्ञानाचा उपयोग होतो.

उदाहरणार्थ:

  • गुरुत्वाकर्षणाचा नियम (Newton's Law of Gravity)
  • सापेक्षता सिद्धांत (Theory of Relativity)
  • उत्क्रांतीचा सिद्धांत (Theory of Evolution)
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5060

Related Questions

विज्ञानं म्हणजे काय?
विद्यान म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे काय?
सायन्स म्हणजे काय?
what is science ?
सायन्स (विज्ञान) म्हणजे काय?