2 उत्तरे
2
answers
तुम्हाला सापडलेल्या एखाद्या नाण्याची माहिती लिहा?
0
Answer link
भारतीय नाण्यांचा जन्म इ. स. पूर्व ६ व्या शतकात झाला असे मानले जाते. भारतीय नाण्यांना वर्षांपेक्षा अधिक जुनी परंपरा आहे. काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग या राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. ही आहत किंवा ठसा पद्धतीने बनवलेली नाणी होती. ही नाणी चौकोनी, गोल, लंबगोल अशा विविध आकारांत बनवली जात असत. ही नाणी चांदीची असत. या नाण्यांवर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे तसेच चंद्र-सूर्य चिन्हे आढळतात. मौर्य साम्राज्यात चांदीबरोबरच तांब्याचीही नाणी पाच चिन्हे अंकित करून सुरू केली गेली. याच काळात ठसे ठोकून नाणी पाडण्याऐवजी साच्यात वितळलेला धातू ओतून तयार करण्यास सुरुवात झाली. सर्वात जुनी ओतीवकामाची चौकोनी आणि गोल नाणी सापडली आहेत. भारतात मोहेंजोदडो व हडाप्पा येथील उत्खननात नाणी सापडली आहेत. ही नाणी इ. स. पूर्व ४ थ्या शतकातील सम्राट अशोकाच्या काळातील तक्षशिला येथे सापडली. त्यावर बुद्ध, बोधीवृक्ष, स्वस्तिक अशी नाण्याच्या एकाच बाजूला चिन्हे आहेत. पांचाल राजांनी सर्व प्रथम दोन साचे वापरून नाण्याच्या दोन्ही बाजूंना चिन्हे उमटवली. गांधार राजांनी त्यात कुशलता मिळवली. इंडोग्रीक काळात त्यावर अक्षरे नोंदली जाऊ लागली. कुशाण राजांनी इ. स. पहिल्या शतकात चांदी आणि तांब्याबरोबर सोन्याचे पहिले नाणे पाडले. यांनीच नाण्यांवर संस्कृत भाषेचा प्रथम वापर केला. याच वेळी बाह्मी लिपीचा वापरही दिसून येतो. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील कौसंबी, अयोध्या, मथुरा इथल्या नाण्यांवर राजांची नावे ब्राह्मी लिपीत आढळतात. गुप्त साम्राज्यात सोन्याच्या नाण्यांत अचूकता आणि विविधता आली. चंद्रगुप्त सम्राटाने काढलेल्या नाण्यांवर त्यांच्यासह राणी कुमारीदेवी आढळते. समुद्रगुप्त सम्राटाच्या नाण्यांवर अश्वमेध, कुऱ्हाड, शिकार करताना वीणावाद्य अशा विविध मुद्रा दिसून येतात. सातवाहनांनी राजा यज्ञ सातकर्णी याने चांदी आणि तांब्याबरोबरच शिशाचीही नाणी पाडली होती. साम्राज्याने सुवर्णहोन प्रचलित केले. शिवकाळात सोन्याचा होन, चांदीची 'लारी' व तांब्याची शिवराई ही प्रमुख नाणी आढळतात. शिवराईवर श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला ‘छत्रपति‘ अशी अक्षरे उमटवलेली असत. शिवाजीच्या काळातील नाणी आजही पहावयास मिळतात.
0
Answer link
मला सापडलेल्या एका नाण्याबद्दल माहिती:
- नाण्याचे नाव: शिवाजी महाराज नाणे
- Metal: चांदी
- वजन: ~11 ग्राम
- आकार: गोल
- अवस्था: वापरलेले
- उत्पादन: रायगड टंकसाळ
- विशेषता:
हे नाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ बनवलेले आहे. या नाण्याच्या एका बाजूला 'श्री राजा शिव छत्रपती' असे देवनागरी लिपीत लिहिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला 'क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव' असे लिहिलेले आहे.
टीप: माझ्याकडे असलेले हे नाणे एक ऐतिहासिक वस्तू आहे आणि ते खूप मौल्यवान आहे.