2 उत्तरे
2
answers
शाळा समितीची कार्ये विषद करा
0
Answer link
शाळा समितीची कार्ये :
(१) शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
२) आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करुन त्याची शिफारस करणे. (परिशिष्ट-अ प्रमाणे)
३) त्या शाळेस शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.
४) बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.
५) शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
६) अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.
७) बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहीलयाची दक्षता घेणे.
(८) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनांचे संनियंत्रण करणे.
९) शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
(१०) शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
(११) शाळेतील मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे. १२) शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे.
(१३) शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे.
१४) मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.
१५) निरुपयोगी साहित्य रु. १,०००/- (रु. एक हजार मात्र) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.
(१६) शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे.
१७) शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखीस्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे. समितीच्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
ठळक वैशिष्ट्ये-
१) आपल्या पाल्यास शाळेत दाखल करणे हे पालकांचे कर्तव्य.
२) शाळाबाह्य मुलांना वयानुरूप समकक्ष वगति प्रवेश
३) शाळाबाह्य मुलांना विशेष प्रशिक्षणाची सुविधा
४) कोणत्याही प्रकारच्या भेदभावास प्रतिबंध
५) कोणत्याही प्रकारच्या शारीरिक शिक्षेस व मानसिक छळास प्रतिबंध
६) बालकास कोणत्याही वर्गात मागे ठेवता येणार नाही.
७) बालकाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढता येणार नाही.
८) इ. ८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळणार.
९) तक्रार निवारण्यासाठी राज्यबालहक्क आयोगाची स्थापना
१०) बालस्नेही शिक्षणासाठी भौतिक सुविधांची उपलब्धता.
शाळा व्यवस्थापन समिती गठन
स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व अनुदानित शाळांमध्ये समितीची स्थापना.
समितीचा कार्यकाल २ वर्षे, २ वर्षांनंतर पुनर्रचना
मुख्याध्यापक / केंद्रप्रमुख यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना / पुनर्रचना करण्यापूर्वी पालक सभेत समितीविषयक सर्व माहिती देणे आवश्यक.
समितीची रचना राजकीय / सामाजिक दबावाखाली न करता पालकसभेत खेळीमेळीच्या वातावरणात व कायद्यातील/नियमावलीतील तरतुदींच्या आधारे करावी.
समितीचे ७५% सदस्य बालकांचे माता पिता किंवा पालक उर्वरित २५% सदस्यांमध्ये मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत/म.न.पा./न.पा. सदस्य, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ किंवा बालविकासतज्ज्ञ यामधून निवड केलेल्यांचा समावेश.
किमान ५० % सदस्य महिला.
स्वीकृत सदस्य म्हणून शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड (किमान १ मुलगी असावी.)
पालक सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यात येईल. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव असतील.
विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे माता पिता किंवा पालक यांना प्रतिनिधीत्व
शाळा व्यवस्थापन समिती जबाबदाऱ्या व कार्य
शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे.
शाळा शिक्षण हक्क कायदयाशी अनुरुप करणे.
शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.
गावातील / परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.
शालेय पोषण आहार योजना व इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.
शालेय मंत्रिमंडळ/बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणून घेणे.
शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.
शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.
शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणाऱ्या अडचणींचे निरसन करून शाळेचा विकास करणे.
शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
महिन्यातून किमान एक बैठक घेणे, बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करून देणे.
आपले ध्येय
१००% पटनोंदणी १००% उपस्थिती
शाळा व्यवस्थापन समितीसाठी मार्गदर्शक सूचना
शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक आयोजित करावी.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नावे फलकावर लावण्यात यावी. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी व शिक्षकांनी एमेकांनांचा आदर करावा.
समिती सदस्य व शिक्षक यांनी एकमेकांच्या सहकार्याने शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करावेत.
शाळेच्या सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये विहित प्रक्रियेचा अवलंब करण्यात यावा. त्यात पारदर्शकता असावी.
शाळेच्या विकासास साहाय्यभूत ठरेल असा शाळा विकास आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात यावी.
बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थानिक कलाकारांच्या मदतीने उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य/मुख्याध्यापक/शिक्षकांचा सन्मान करण्यात यावा.
विद्यार्थी लाभाच्या योजनांची तसेच शाळेस शासनाकडून मिळणाऱ्या निधीची माहिती अद्ययावत करून शाळेच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावी.
उत्तर लिहिले
·
७ तासांपूर्वी
Chhaya Shirke's profile picture
Chhaya Shirke
कर्म
·
१७.८ हजार
संबंधित प्रश्न
आदर्श शाळा योजना म्हणजे काय?
१ उत्तर
शाळा स्तरावर प्रवेशाची असलेली यादी कशी तयार कराल?
१ उत्तर
शाळा विकास आराखडा?
१ उत्तर
शाळा समितीची कार्य स्पष्ट करा?
१ उत्तर
covid-19 शास्त्र मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तुमची शाळा सुरु झाली, तुमच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला अचानक सर्दी,खोकला, ताप असल्याचे तुमच्या लक्षात आहे, तुम्हाला करायच्या कारवाईचे 500 शब्दांमध्ये अहवाल लेखन कसे कराल?
३ उत्तरे
शाळासिद्धी अंमलबजावणीसाठी शिक्षक शाळा प्रमुख म्हणून 10 उपक्रम लिहा.?
१ उत्तर
प्रश्न
शाळा
शाळा समितीचे कार्य कोणते आहे?
१ उत्तर
शाळा समितीची कार्ये :
(१) शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
२) आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करुन त्याची शिफारस करणे. (परिशिष्ट-अ प्रमाणे)
३) त्या शाळेस शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.
४) बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.
५) शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
६) अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.
७) बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहीलयाची दक्षता घेणे.
(८) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनांचे संनियंत्रण करणे.
९) शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
(१०) शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
(११) शाळेतील मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे. १२) शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे.
(१३) शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे.
१४) मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.
१५) निरुपयोगी साहित्य रु. १,०००/- (रु. एक हजार मात्र) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.
(१६) शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे.
१७) शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखीस्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे. समितीच्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
ठळक वैशिष्ट्ये-
१) आपल्या पाल्यास शाळेत दाखल करणे हे पालकांचे कर्तव्य.
२) शाळाबाह्य मुलांना वयानुरूप समकक्ष वगति प्रवेश
३) शाळाबाह्य मुलांना विशेष प्रशिक्षणाची सुविधा
४) कोणत्याही प्रकारच्या भेदभावास प्रतिबंध
५) कोणत्याही प्रकारच्या शारीरिक शिक्षेस व मानसिक छळास प्रतिबंध
६) बालकास कोणत्याही वर्गात मागे ठेवता येणार नाही.
७) बालकाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढता येणार नाही.
८) इ. ८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळणार.
९) तक्रार निवारण्यासाठी राज्यबालहक्क आयोगाची स्थापना
१०) बालस्नेही शिक्षणासाठी भौतिक सुविधांची उपलब्धता.
शाळा व्यवस्थापन समिती गठन
स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व अनुदानित शाळांमध्ये समितीची स्थापना.
समितीचा कार्यकाल २ वर्षे, २ वर्षांनंतर पुनर्रचना
मुख्याध्यापक / केंद्रप्रमुख यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना / पुनर्रचना करण्यापूर्वी पालक सभेत समितीविषयक सर्व माहिती देणे आवश्यक.
समितीची रचना राजकीय / सामाजिक दबावाखाली न करता पालकसभेत खेळीमेळीच्या वातावरणात व कायद्यातील/नियमावलीतील तरतुदींच्या आधारे करावी.
समितीचे ७५% सदस्य बालकांचे माता पिता किंवा पालक उर्वरित २५% सदस्यांमध्ये मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत/म.न.पा./न.पा. सदस्य, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ किंवा बालविकासतज्ज्ञ यामधून निवड केलेल्यांचा समावेश.
किमान ५० % सदस्य महिला.
स्वीकृत सदस्य म्हणून शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड (किमान १ मुलगी असावी.)
पालक सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यात येईल. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव असतील.
विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे माता पिता किंवा पालक यांना प्रतिनिधीत्व
शाळा व्यवस्थापन समिती जबाबदाऱ्या व कार्य
शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे.
शाळा शिक्षण हक्क कायदयाशी अनुरुप करणे.
शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.
गावातील / परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.
शालेय पोषण आहार योजना व इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.
शालेय मंत्रिमंडळ/बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणून घेणे.
शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.
शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.
शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणाऱ्या अडचणींचे निरसन करून शाळेचा विकास करणे.
शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
महिन्यातून किमान एक बैठक घेणे, बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करून देणे.
आपले ध्येय
१००% पटनोंदणी १००% उपस्थिती
शाळा व्यवस्थापन समितीसाठी मार्गदर्शक सूचना
शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक आयोजित करावी.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नावे फलकावर लावण्यात यावी. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी व शिक्षकांनी एमेकांनांचा आदर करावा.
समिती सदस्य व शिक्षक यांनी एकमेकांच्या सहकार्याने शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करावेत.
शाळेच्या सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये विहित प्रक्रियेचा अवलंब करण्यात यावा. त्यात पारदर्शकता असावी.
शाळेच्या विकासास साहाय्यभूत ठरेल असा शाळा विकास आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात यावी.
बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थानिक कलाकारांच्या मदतीने उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य/मुख्याध्यापक/शिक्षकांचा सन्मान करण्यात यावा.
विद्यार्थी लाभाच्या योजनांची तसेच शाळेस शासनाकडून मिळणाऱ्या निधीची माहिती अद्ययावत करून शाळेच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावी.
0
Answer link
शाळा समितीची कार्ये खालीलप्रमाणे आहेत:
- शाळेचा विकास आराखडा तयार करणे: शाळा समिती शाळेच्या विकासासाठी एक योजना तयार करते. त्या योजनेत शाळेची उद्दिष्ट्ये, ध्येये आणि विकासाची दिशा स्पष्ट केली जाते.
- शालेय व्यवस्थापनात मदत करणे: शाळा समिती शाळेच्या व्यवस्थापनात सक्रिय भूमिका घेते. शिक्षक, मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाळेचे कामकाज सुरळीत चालण्यास मदत करते.
- शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे: शाळेतील शिक्षण अधिक चांगले कसे होईल, यासाठी समिती प्रयत्न करते. शिक्षकांना आवश्यक सुविधा पुरवणे, नवीन शैक्षणिक पद्धतींचा अवलंब करणे आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कार्यक्रम आयोजित करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते.
- शाळेतील सुविधांची देखभाल: शाळा समिती शाळेतील भौतिक सुविधांची देखभाल करते. इमारती, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि क्रीडांगण यांसारख्या सुविधांची नियमित तपासणी करणे आणि त्यांची दुरुस्ती करणे हे समितीचे काम आहे.
- पालकांशी समन्वय: शाळा समिती पालक आणि शाळा यांच्यात समन्वय साधण्याचे काम करते. पालकांच्या समस्या व सूचना विचारात घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करते.
- fund जमा करणे: शाळा समिती शाळेसाठी आवश्यक असणारा निधी (fund) जमा करण्याचे काम करते.
- शासकीय योजनांची अंमलबजावणी: शाळा समिती शासनाच्या विविध योजनांची माहिती देते आणि त्यांची अंमलबजावणी (implementation) व्यवस्थितपणे करते.
टीप: शाळा समितीची कार्ये शाळेच्या प्रकारानुसार आणि स्थानिक नियमांनुसार बदलू शकतात.