2 उत्तरे
2
answers
सौजन्यशीलता म्हणजे काय?
0
Answer link
सौजन्यशीलता।
आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही एखाद्याची गैरसोय होणार नाही असे वागणे, आपल्याला बरोबरीच्या व्यक्तीशी विनयाने वागणे, इतरांचे म्हणणे ऐकून घेणे, दुसऱ्या व्यक्ती बद्दल आदर भाव प्रकट करणे, म्हणजे सर्जनशीलता होईल. दुसऱ्याचे स्वागत करणे, त्यांच्या सुखदुःखाची समरस होणे, म्हणजेच सौजन्यशीलता होईल.
आपल्यामूळे दुस-याला त्रास होणार
नाही, गैरसोय होणार नाही असे वागणे. आपल्या
बरोबरीच्या व्यक्तीशी विनयाने वागणे, इतरांचे म्हणणे ऐकणे, दुस-या व्यक्तीबद्दल आदरभाव प्रकट करणे म्हणजे सौजन्यशीलता होय. दुस यांचे स्वागत करणे, त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणे यांतून सौजन्यशीलता दिसते. सौजन्यात | विनय, नम्रता या गुणांना फार महत्त्व आहे. हे | गुण अंगी बाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडून चूक झाल्यास क्षमा मागणे. कोणी मदत केली तर कृतज्ञता व्यक्त करणे, आभार मानणे हा सौजन्यशीलतेचा भाग , आहे.
थोर व्यक्तीबद्दल वाटणारा आदरभाव, | मित्राबद्दल मैत्रीपूर्ण भावना, बरोबरीच्या स्नेह्यांबरोबर खेळकरपणा, आपल्यापेक्षा लहान असणा-यांबद्दल समजूतदारपणा, हे आपल्या वागण्यातून व्यक्त झाले पाहिजे. अभिवादन करणे, स्वागत करणे यांतून आपला सुसंस्कृतपणा दिसतो. पाहुण्यांना निरोप |देण्यासाठी दारापर्यंत जावे. वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले यांना मदत करण्यासाठी पुढे व्हावे. यांतून आपले सौजन्य दिसते.
0
Answer link
सौजन्यशीलता म्हणजे नम्रता, विनयशीलता आणि दुसऱ्यांबद्दल आदर दाखवणे. हे एक सामाजिक कौशल्य आहे ज्यामुळे व्यक्ती एकमेकांशी आदराने आणि समजूतदारपणे वागतात.
सौजन्यशीलतेचे काही पैलू:
- आदर: दुसऱ्या व्यक्तीला मान देणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे.
- नम्रता: অহংকার न ठेवता साधेपणाने वागणे.
- विनय: लीनता आणि आदराने बोलणे.
- सहानुभूती: दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवणे.
- क्षमाशीलता: दुसऱ्यांच्या चुका माफ करण्याची तयारी दर्शवणे.
सौजन्यशीलतेमुळे समाजात सलोखा आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.