3 उत्तरे
3
answers
माणसं जोडणं म्हणजे काय?
2
Answer link
माणसं जोडणं म्हणजे काय ?
माणसं जोडणं म्हणजे,
समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं.
आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं...
माणसं जोडणं म्हणजे,
ऐकण्याची कला शिकणं.
फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...
माणसं जोडणं म्हणजे,
माणसांवर "शिक्के" न मारणं.
समोरचा अधिक महत्त्वाचा -
हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...
माणसं जोडणं म्हणजे,
कौतुकाची एकही संधी न सोडणं.
तक्रार मात्र जपून करणं...
माणसं जोडणं म्हणजे,
प्रतिक्रिया नव्हे, "प्रतिसाद" देणं.
रागाचंही रुपांतर प्रेमात करता येणं...
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं...
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे,
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांचं मन जपणं..!!!
.
2
Answer link
माणसं जोडणं म्हणजे,
समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं.
आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं...
माणसं जोडणं म्हणजे,
ऐकण्याची कला शिकणं.
फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...
माणसं जोडणं म्हणजे,
माणसांवर "शिक्के" न मारणं.
समोरचा अधिक महत्त्वाचा -
हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...
माणसं जोडणं म्हणजे,
कौतुकाची एकही संधी न सोडणं.
तक्रार मात्र जपून करणं...
माणसं जोडणं म्हणजे,
प्रतिक्रिया नव्हे, "प्रतिसाद" देणं.
रागाचंही रुपांतर प्रेमात करता येणं...
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं...
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे,
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांचं मन जपणं..!!!
0
Answer link
माणसं जोडणं म्हणजे:
- नवीन ओळखी निर्माण करणं: अनोळखी लोकांशी बोलून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
- संबंध टिकवणं: जुन्या मित्रांच्या व कुटुंबीयांच्या संपर्कात राहून त्यांचे संबंध अधिक दृढ करणे.
- सामंजस्य निर्माण करणं: दोन व्यक्तींमधील मतभेद दूर करून त्यांच्यात समेट घडवून आणणे.
- आधार देणं: अडचणीच्या काळात लोकांना मदत करणे आणि त्यांना भावनिक आधार देणे.
- संवाद वाढवणं: लोकांमध्ये सकारात्मक संवाद वाढवणे, ज्यामुळे गैरसमज टाळता येतात.
माणसं जोडल्याने सामाजिक संबंध सुधारतात आणि एक मजबूत समाज निर्माण होतो.