2 उत्तरे
2
answers
समतोल आहार म्हणजे काय? सकस आहाराचे फायदे कोणते?
2
Answer link
संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय
अन्न हे मानवी जीवनाचे 'अस्तित्व' टिकवण्यास आवश्यक अशी, प्राथमिक गरज आहे. आपल्या शरीराची वाढ होणे ,झीज भरुन काढणे,ऊर्जा निर्मिती हे सर्व आपल्याला अन्नातून मिळणार्या घटक पोषण तत्त्वांमुळे पूर्ण होऊ शकते .आहारात घेतलेले अन्न पोषण दृष्ट्या समतोल असायला हवे.
चला तर मग आपण जाणून घेऊया
1संतुलीत आहार म्हणजे काय व सकस आहार म्हणजे काय?
संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय?
रोजच्या अन्नपदार्थात पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वाचा समावेश करणार्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात.
संतुलित आहाराचे प्रकार व फायदे कोणते, संतुलित किंवा सकस आहार कसा असावा व या संतुलित आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश होतो ते आपण ह्या लेखामध्ये विस्तृत स्वरुपात बघूयात.
*संतुलीत आहार – प्रकार*
१) दुग्धजन्य पदार्थ : अंडी,मास,मासे इ.
२) फळे व भाजीपाला : केळी,हिरव्या पालेभाज्या इ.
३) स्निग्ध पदार्थ : लोणी,तुप,तेल इ.
४) तृणधान्य व कडधान्य – मोड आलेले उसळ, चपाती इ.
*संतुलीत व सकस आहार – फायदे*
संतुलीत आहाराचा आपण आपल्या जेवनात समावेश नाही केलात तर आपले शरीर निरोगी व धडधाकड नाही राहू शकनार. पोषक तत्त्वांचा आहारात सामावेश असने गरजेचे असते. संतुलित आहार आपण घेतल्यामुळे आजारपण येत नाही .मानसिक स्वास्थ चांगले राहते त्यामुळे आपल्या अन्नपदार्थात संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे.
या धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक आहाराची आवश्यकता असते पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरी दुष्परिणाम शरीरावर होतो .म्हणून निरोगी तंदुरुस्त शरीरासाठी संतुलीत आहाराची आवश्यकता आहे .आहारात *कॅलरी, लोह व जीवनसत्वे* विशिष्ट प्रमाणात व त्यामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे, कारण अन्नात पौष्टिक घटकांसोबत पोषणमूल्य नसलेल्या घटकांचा समावेश असू शकतो.
आपल्या आहारामध्ये सुमारे पस्तीस टक्के भाग प्रथिनांचा आसावा.असे आहारतज्ज्ञांचे मत आहे .ही प्रथिने आपल्याला *दूध आणि दुग्धजन्य पदार्थ डाळी पालेभाज्या मोडविलेली कडधान्ये* याद्वारे मिळतात .प्रथिनांपासून आपल्या शरीरातील पेशी व स्नायूंना पोषण मिळत असते .तसेच आपले त्वचा केस यासाठी देखील प्रथिने आवश्यक आहे .पुरुषांचे स्नायू महिलांच्या मानाने जास्त बळकट असल्याने पुरुषांना अधिक प्रमाणात प्रथिनांची गरज असते .त्यामुळे आहार तज्ज्ञांच्या मते आपल्या दर जेवणामध्ये एक भाग तरी प्रथिनांचा असायला हवा .ही प्रथिने *शिजवलेले डाळ उसळ पनीर किंवा मासे* या कोणत्याही स्वरूपात असावित पुरुषांना दिवसाला *६० ग्रॅम प्रथिने* आवश्यक आहेत.तर स्त्रियांना *५५ ग्रॅम प्रथिनांची* गरज असते.
कोणत्या वेळेला कोणत्या अन्न पदार्थाचे सेवन करावे हे पाहूया.
१. *सकाळी न्याहारी*.
गरज :- कॅल्शियम, प्रोटीन व लोह.
पोषणासाठी आवश्यक पदार्थ :- एक ग्लास दूध दही ताक पनीर त्यापैकी कोणताही एक पदार्थ .
ऊर्जेसाठी पूरक :- शिरा, पोहे, पोळी, टोस्ट, ब्रेड, अंडे व फळे.
२. *दुपारचे जेवन*
गरज :- प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स व लोह.
पोषणासाठी आवश्यक पदार्थ :- एक मध्यम आकाराची वाटी घट्ट डाळ, उसळ व मांसाहारी मध्ये मासळी किंवा चिकन अंड्याचा पदार्थ.
ऊर्जेसाठी पूरक :- चपाती, भात, भाकरी, ताक, दही व कोशिंबीर इ.
३. *संध्याकाळची न्याहारी*
गरज:- कॅल्शियम, प्रोटीन.
पोषणासाठी आवश्यक व ऊर्जेसाठी पूरक पदार्थ:- चणे दाणे पनीर लिंबू शरबत.
४. *रात्रीचे जेवण*
पोषणासाठी आवश्यक पदार्थ :- भाकरी, पोळी, भात, फळभाजी, कोबी, गाजर, दुधी भोपळा व बटाटा.
ऊर्जेसाठी पूरक:- कढी, सुप व कोशिंबीर .
*तात्पर्य*
आजच्या फार्स्ट लाइफमध्ये आपल्या कडून फास्ट फूड व जाहिरात बाजी मुळे नको ते अन्न सेवन केले जात आहे .आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बहुतेक घटकांवर आपले नियंत्रण नसते त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी उत्तम संतुलित व सकस आहार, पुरेशी झोप आणि जोडीला व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे .
*जरी विभिन्न आपले वेश भाषा, विभिन्न आपले अन्न, परी शारीरिक तंदुरुस्तीसाठी संतुलित आहार गरजेचा आहे.*
0
Answer link
समतोल आहार म्हणजे काय:
समतोल आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये सर्व आवश्यक पोषक तत्वे योग्य प्रमाणात असतात. ह्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असतो.
सकस आहाराचे फायदे:
- शारीरिक विकास: सकस आहारामुळे शरीर निरोगी राहते आणि योग्य विकास होतो.
- रोगप्रतिकारशक्ती: सकस आहार रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, ज्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते.
- ऊर्जा: सकस आहारामुळे दिवसभर काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते.
- मानसिक आरोग्य: सकस आहाराचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि तणाव कमी होतो.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त लिंक्स: