अमेरिकन इतिहास इतिहास

बोस्टन चहा पार्टीवर टीप लिहा?

2 उत्तरे
2 answers

बोस्टन चहा पार्टीवर टीप लिहा?

0
बोस्टन चहापार्टी टीप लिहा?
बोस्टन बंदरात १६ डिसेंबर १७७३ रोजी घडलेल्या एका घटनेमुळे वसाहतींच्या ब्रिटिश शासनविरोधी संघर्षाला अचानक गंभीर वळण लागले, त्या साली ब्रिटिश संसदेने वहाचा कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन वसाहतीत चहा विकण्याची मक्तेदारी दिली. ह्या कंपनीच्या गोदामात १ कोटी ७० लाख पौंड चहा पडून होता. कंपनीला दिवाळखोरीतून वाचविण्यासाठी वरील कायदा करण्यात आला होता. ईस्ट इंडिया कंपनीने अमेरिकन वसाहतींतील आपल्या मर्जीच्या काही व्यापाऱ्यांना चहा विकण्याची मक्तेदारी दिली. त्यामुळे वगळण्यात आलेले व्यापारी संतापले. अनेक बंदरात कंपनीच्या जहाजातून चहा उतरून घेण्यास विरोध होऊ लागला, बोस्टन शहरात मॅसॅच्यूसेट्स्चे गव्हर्नर थॉमस हचिनसनच्या कुटुंबाला चहा विकण्याची मक्तेदारी मिळाली होती. बोस्टनमध्ये कंपनीच्या जहाजातून चहा उतरविण्यास आंदोलकांनी विरोध केला तेव्हा हचिनसन कुटुंबाने प्रतिदबाव आणून कंपनीच्या जहाजांना चहा उतरविल्याशिवाय बंदर सोडण्यास मनाई केली. ह्यामुळे आंदोलक चिडले. १६ डिसेंबर १७७३रोजी आंदोलकांच्या एका गटाने रेड इंडियन लोकांसारखा पोशाख करून जहाजातील चहाच्या ३४२ पेट्या (किंमत अंदाजे १० हजार पौंड) बोस्टनच्या बंदरातील सागरात ओतून टाकल्या. अशा रितीने सागरातील माशांना चहापार्टी देण्यात आली.
उत्तर लिहिले · 29/6/2022
कर्म · 1020
0

बोस्टन टी पार्टी:

बोस्टन टी पार्टी ही एक राजकीय निदर्शनेची घटना होती जी १६ डिसेंबर १७७३ रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे घडली. अमेरिकन वसाहतवाद्यांनी ब्रिटीश सरकार विरोधात हे निदर्शन केले.

कारणे:

  • ब्रिटिश सरकारने चहावरील कर कमी केला, पण वसाहतींना तो कर मान्य नव्हता.
  • 'नो टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन' (No taxation without representation) ही वसाहतवाद्यांची मागणी होती, कारण ब्रिटिश संसदेत त्यांचे प्रतिनिधित्व नव्हते.

घटना:

  • 'सन्स ऑफ लिबर्टी' (Sons of Liberty) या संघटनेच्या सदस्यांनी बोस्टन हार्बरमध्ये असलेल्या जहाजांवर चढाई केली.
  • त्यांनी ३४२ पेट्या चहा समुद्रात फेकून दिल्या. ह्या चहाची किंमत $१८,००० (£१०,०००) होती.

परिणाम:

  • ब्रिटिश सरकारने या घटनेला गंभीरतेने घेतले आणि वसाहतींवर अधिक निर्बंध लादले.
  • या घटनेमुळे अमेरिकन क्रांतीला (American Revolution) चालना मिळाली.

महत्व:

बोस्टन टी पार्टी ही अमेरिकन इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. या घटनेने वसाहतवाद्यांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण केला आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1120

Related Questions

बोस्टन चहा पार्टी विषयी माहिती लिहा?