Topic icon

अमेरिकन इतिहास

0

बोस्टन चहा पार्टी:

बोस्टन चहा पार्टी ही 16 डिसेंबर 1773 रोजी बोस्टन, Massachusetts मध्ये झालेली एक राजकीय निदर्शनाची घटना होती. या घटनेत, अमेरिकन वसाहतीवाद्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या चहाच्या जहाजांवर हल्ला चढवला आणि जहाजावरील चहा समुद्रात फेकून दिला.

पार्श्वभूमी:

ब्रिटिशांनी चहावर लावलेल्या अन्यायकारक करांना वसाहतीवाद्यांनी विरोध केला. 'प्रतिनिधित्व नाही, कर नाही' (No taxation without representation) ही त्यांची प्रमुख मागणी होती. ईस्ट इंडिया कंपनीला मदत करण्यासाठी ब्रिटिशांनी चहावरील कर कमी केला, ज्यामुळे कंपनीला वसाहतींमध्ये स्वस्त दरात चहा विकणे शक्य झाले. यामुळे वसाहतींमधील व्यापारी आणि नागरिक संतप्त झाले.

घटना:

* Sons of Liberty या संघटनेच्या सदस्यांनी सॅमुअल ऍडम्सच्या नेतृत्वाखाली Mohawk Indians (अमेरिकेतील আদিবাসী) वेशात बोस्टन हार्बरमधील जहाजांवर हल्ला केला. * त्यांनी सुमारे 342 पेट्या चहा समुद्रात फेकून दिल्या, ज्याची किंमत त्यावेळेस $10,000 (आजच्या अंदाजे $1.7 दशलक्ष) होती.

परिणाम:

* ब्रिटिश सरकारने Massachusetts वर कठोर निर्बंध लादले, ज्याला Coercive Acts म्हटले जाते. * या घटनेमुळे अमेरिकन क्रांतीला (American Revolution) चालना मिळाली, ज्यामुळे 1775 मध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले.
अधिक माहितीसाठी:
उत्तर लिहिले · 30/5/2025
कर्म · 1120
0
बोस्टन चहापार्टी टीप लिहा?
बोस्टन बंदरात १६ डिसेंबर १७७३ रोजी घडलेल्या एका घटनेमुळे वसाहतींच्या ब्रिटिश शासनविरोधी संघर्षाला अचानक गंभीर वळण लागले, त्या साली ब्रिटिश संसदेने वहाचा कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन वसाहतीत चहा विकण्याची मक्तेदारी दिली. ह्या कंपनीच्या गोदामात १ कोटी ७० लाख पौंड चहा पडून होता. कंपनीला दिवाळखोरीतून वाचविण्यासाठी वरील कायदा करण्यात आला होता. ईस्ट इंडिया कंपनीने अमेरिकन वसाहतींतील आपल्या मर्जीच्या काही व्यापाऱ्यांना चहा विकण्याची मक्तेदारी दिली. त्यामुळे वगळण्यात आलेले व्यापारी संतापले. अनेक बंदरात कंपनीच्या जहाजातून चहा उतरून घेण्यास विरोध होऊ लागला, बोस्टन शहरात मॅसॅच्यूसेट्स्चे गव्हर्नर थॉमस हचिनसनच्या कुटुंबाला चहा विकण्याची मक्तेदारी मिळाली होती. बोस्टनमध्ये कंपनीच्या जहाजातून चहा उतरविण्यास आंदोलकांनी विरोध केला तेव्हा हचिनसन कुटुंबाने प्रतिदबाव आणून कंपनीच्या जहाजांना चहा उतरविल्याशिवाय बंदर सोडण्यास मनाई केली. ह्यामुळे आंदोलक चिडले. १६ डिसेंबर १७७३रोजी आंदोलकांच्या एका गटाने रेड इंडियन लोकांसारखा पोशाख करून जहाजातील चहाच्या ३४२ पेट्या (किंमत अंदाजे १० हजार पौंड) बोस्टनच्या बंदरातील सागरात ओतून टाकल्या. अशा रितीने सागरातील माशांना चहापार्टी देण्यात आली.
उत्तर लिहिले · 29/6/2022
कर्म · 1020