दिव्यांग्त्वाचे एकूण २१ प्रकार
सुची
1. - अंध
2. -अंशतः अंध (दृष्टिदोष)
3. - कर्णबधिर
4. वाचादोष
5. अस्थिव्यंग
6.- मानसिक आजार
7. - अध्ययन अक्षमता
8. - सेरेब्रल पालसी (मेंदूचा पक्षाघात)
9. - स्वमग्न
10. - बहुविकलांग
11.
13. मतिमंद
14. -अविकसित मांसपेशी
15. मज्जासंस्थेचे तीव्र आजार
16. - मेंदूतील चेतासंस्था संबंधी आजार
17.- रक्ता संबंधी कॅन्सर
18. - रक्तवाहिन्या संबंधित आजार
19. - रक्ता संबंधी रक्ताचे प्रमाण कमी
20. हल्लाग्रस्त पीडित
21. कंपावत रोग
?
२१ दिव्यांग (अपंग) प्रकार
> दिव्यांग म्हणजे काय? दिव्यांग 21 प्रकार
दिव्यांगत्व (अपंगत्व) म्हणजे काय ?
‘एखादया आजारामूळे किंवा कुपोषणामूळे व्यक्तींची किंवा त्याच्या इंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे यांस ‘अपंगत्व ‘असे म्हणतात.’
१ .अंधत्व:-
Ø दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टीहीन असणे.
Ø डोळे जन्मतः बंद असणे
Ø अपघाती अंधत्व.
२ .अंशत:अंध
Ø दूरचे/जवळचे कमी दिसणे
Ø भिंगाच्या चष्म्याचा वापर
Ø दोन्ही डोळ्यात अथवा एका डोळ्यात दोष असेल तर दिसण्यामध्ये अडथळा येतो.
Ø जवळचे अथवा दूरचे कमी दिसते किवा कधी-कधी दिसत नाही.
Ø डोळ्यात तिरळेपणा असतो.
३ .कर्णबधिरत्व
ज्या व्यक्तीचा चांगल्या कानाचा श्रवणऱ्हास 60 डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना ‘कर्णबधिर व्यक्ती’ म्हणतात.
Ø ऐकण्याची क्षमता अजिबात नसणे
Ø ऐकू कमी येणे
Ø कानातून पाणी येणे
Ø कानाचा पडदा फाटणे
४ .वाचादोष
अडखळत बोलणे, अस्पष्ट बोलणे, शब्दांची तोडफोड करणे, बोलतांना शब्द मागे-पुढे करणे त्यात तारतम्य नसणे यालाच ‘वाचादोष‘ असे म्हणतात.
Ø बोलण्यात अडखळणे
Ø जीभ जाड असणे
Ø जिभेचा शेंडा नसणे
Ø तोतरे बोलणे
Ø Clept palate
Ø टाळूला होल असणे
५.अस्थिव्यंग
चलनवलन विषयक विकलांगत्व म्हणजेच अस्थिव्यंगत्व. अस्थिव्यंग मुले म्हणजे अशी मुले की,ज्यांची हाडे, सांधे व स्नायु हे योग्यप्रकारे कार्य करत नाहीत. अशा मुलांना ‘अस्थिव्यंग मुले’ असे म्हणतात.
Ø ह्लनचलन क्रिया करण्यास अक्षम.
Ø हे सहज दिसणारे अपंगत्व आहे.
Ø या मुलांची हालचालींवरील मर्यादेची त्रुटी दूर केल्यास ती सर्व-सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेवू शकतात.
Ø मैदानी खेळ, हस्तकौशल्य याकडे विशेष लक्ष्य पुरवावे लागते.
६.मानसिक आजार
Ø असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन
Ø मतिमंदत्वाखेरीज मेंदूमध्ये अन्य कोणत्याही कारणाने आलेला आजार व त्यामुळे सकारात्म्क वा नकारात्मक ‘मानसिक आजार असणारी व्यक्ती’ होय.
Ø असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन,स्वतःशी बोलणे.अभिव्यक्त
Ø भीती वाटणे .
Ø नेहमी गुमसुम राहणे.
७.अध्ययन अक्षम
Ø लेखन वाचन गणितीय क्रिया अडचण
Ø अभ्यासात मागे राहणे
Ø समजण्यात अडचणी असणे
Ø आकलन करण्यास अवघड
Ø विशिष्ट अध्यायातील अडचणी
Ø विशेषतः वाचन , लेखन व गणितात अडचणी येतात.
Ø आरशातील प्रतिमा सारखे लेखन
Ø उलटे अक्षर लिहणे,
Ø अंक ओळखण्यात गोंधळ
Ø शब्द गाळून वाचणे
८.मेंदूचा पक्षाघात
मेंदूचा पक्षाघात म्हणजे मेंदूवर झालेला आघात वा अपघातामुळे मेंदूच्या विकास प्रक्रियेवर परिणाम होउन शरीराच्या एका किंवा अनेक भागाचे नियंत्रण कमी झाल्याने बहुविध प्रकारची विविधांगी विकलांगता असलेली व्यक्ती होय.
Ø हातापायात आकड
Ø मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही
Ø हलनचलन क्षमता कमी
९.स्वमग्नता
Ø स्वतःच्या विश्वात हरवलेले असतात.
Ø समाजात कमी मिसळतात
Ø आत्ममग्न असतात स्वमग्नता ही एक अशी मानसिक गुंतागुंतीची अवस्था किंवा विकासात्मक विकृती आहे.
Ø भाषिक कौशल्य विकसित होत नाही.
Ø स्वत:च्याच भाव-स्वप्न विश्वात रमून गेलेले असतात. म्हणून या अवस्थेस ‘स्वमग्नता’ असे म्हणतात.
१०.बहुविकलांग
एका पेक्षा जास्त अपंगत्व असते. उदा. सेरेब्रल पाल्सी with मतिमंदत्व,कर्णबधीर,अंधत्व इ.
११.कुष्ठरोग
Ø कुष्ठरोग्याच्या आघातामुळे हातापायात विकृती दिसते.
Ø त्वचेवर चट्टे,खवले,डाग असतात.
Ø हात, पाय, बोटे सुन्न पडतात.
१२.बुटकेपणा
Ø शारीरिक कमी उंची असणाऱ्या प्रौढ व्यक्तीची उंची ४ फुट १० इंच किंवा १४७ सेमी पेक्षा कमी असते.
Ø शारीरिक गुणसुत्रामुळे शरीराची वाढ व विकास इतर मुलांपेक्षा कमी असणे.
१३.बौद्धिक अक्षमता
Ø या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास खुंटल्यामुळे शिकण्यात समस्या सोडवण्यात कठीण जाते.
Ø दैनदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनदिन व्यवहार करण्यास कठीण जाते.
Ø अध्ययन करण्यास समस्या येतात.
Ø वर्तुणूक समस्या दिसून येतात.
१४.अविकसित मांसपेशी
Ø हा आजार स्नायुंशी संबंधित आहे.
Ø या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींच्या शरिरातील, ठराविक भागातील, अवयवांतील स्नायुंचे तंतु कमजोर होउ लागतात. किंबहूना नष्ट होउ लागतात.यास ‘मस्कुलर डिस्ट्रोफी’ असे म्हणतात.
Ø स्नायू अविकसित झालेले असतात.
Ø दैनंदिन क्रिया करण्यात असमर्थ असणे.
Ø शरीराची हालचाली करण्यात हळू हळू मागे जाणे.
१५.मज्जासंस्थेचे तीव्र आजार
Ø तीव्र स्वरुपात ताप येणे
Ø मेंदूज्वर
Ø ब्रेन टयूमर
Ø तीव्र डोकेदुखी
Ø चेतासंस्थेमध्ये क्षती निर्माण होणे.
Ø हायड्रोसिफलीक, संतुलन बिघाड होणे.
१६.मल्टीपल स्कलेरोसीस
हा विकार मेंदूतील चेता संस्थेतील (सेंट्रल र्नव्हस सिस्टम) संदेशवाहक चेतातंतूंवरील संरक्षक आवरण मायलिनला धक्का पोहोचल्यामुळे होतो. मायलिनला धक्का पोहोचल्याचा परिणाम मेंदूकडून शरीराच्या अन्य भागांकडे पोहोचणाऱ्या संदेशांवर होतो. त्याचा परिणाम म्हणून खालील लक्षणे तयार होतात.
Ø हातापायातील स्नायू मधील ताठरपणा किंवा कमजोरी संवेदनांमध्ये परिवर्तन,
Ø संवेदना कमी होण्याचे प्रमाण पाया कडून वरील दिशेने बदल करत चालते.
Ø स्नायुंमधील शिथीलता येते व स्थानू काम करणे कमी करतात.
Ø मलव्दार व मुत्राशयावरील नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते.
Ø नेत्रकंप- डोळ्याभोवतालच्या स्नायुंच्या कार्यातील बदलाने नेत्रकंप सुरु होतो.
१७. थेलेसेमिया /कॅन्सर
Ø रक्ताची (हिमोग्लोबिन ) कमतरता असते.
Ø वारंवार रक्त पुरवावे लागते.
Ø हा अनुवांशिक रोग आहे.
Ø बालकांची वाढ खुंटणे,
Ø चेहरा सुखावलेला,
Ø वजन वाढत नाही.
Ø श्वास घेण्यास त्रास होतो.
Ø वारंवार आजारी पडणे.
१८.हिमोफेलीया /अधिक रक्तस्त्राव
Ø हा आनुवंशिक रक्तविकार आहे.
Ø रक्तवाहिन्या तील बिघाडामुळे हा रोग होतो.
Ø यामध्ये रक्तस्राव होणे.
Ø जखमा झाल्यास अधिक रक्तस्राव होतो.
Ø कधी कधी रक्तस्राव थांबत नाही.
Ø रक्तस्त्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगणे.
१९.स्किल सेल डिसीज
Ø रक्ताचे प्रमाण कमी असणे.
Ø रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव /अंग खराब होणे.
Ø शरीरातील पेशींचा आकार होतो.
Ø हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो.
२०. हल्लाग्रस्त पिडीत ॲसिड
Ø शरीराच्या ज्या भागावर ॲसिड हल्ला झाला असेल ती जागा भाजल्यासारखी विद्रूप दिसते.
Ø चेहरा,हात,पाय,
Ø डोळे यावर काळ्या रंगाची भाजल्यासारखी त्वचा आढळते.
२१. कंपवात रोग
कंपवात म्हणजेच पार्किन्सन्स
डिसीज हा मेंदूतील सबस्टान्शिया नायग्रा नावाच्या भागातील पेशींची संख्या आणि कार्य कमी झाल्याने होणारा आजार आहे.
माणसाच्या हालचालीतील सुबकता, डौल, आणि सफाई या रेणूमुळे प्राप्त होते. या
Ø रेणूच्या अभावामुळे रोग्याच्या शरीराला कंप सुटतो,
Ø हालचाली संथावतात, स्नायू ताठर होतात.
Ø कंपवात झालेल्या रुग्णाचे वजन कमी होते.
Ø तांत्रिकीय तंत्र प्रणाली संबधीत कठीण जाणे.