2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        अध्यापन म्हणजे काय?
            0
        
        
            Answer link
        
        अध्यापन म्हणजे काय?
 
            सध्याचे जग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने झपाट्याने बदलत चालले आहे.आज आपण पाहत आहोत की इंटरनेट च वाढता वापर आणि त्यामध्ये झालेली क्रांती त्यामुळे संपूर्ण जगाचा चेहरा मोहरा बदलत चालला आहे.त्यामुळे त्याचप्रमाणे प्राचीन काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अध्ययन आणि अध्यापन चे वेगवेगळ्या पद्धती होत्या. परंतु सध्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा झपाट्याने बदल होत आहे. अध्ययन आणि अध्यापन हे शब्द खूप मोठ्या प्रमाणावर आणि विस्तारित आहेत. पूर्वीच्या काळी होणारे अध्यापन पद्धती बदलून आता नव्याने पद्धती उदयास येत आहेत. अध्यापनाची विशिष्ट अशी व्याख्या न करता अध्यापन म्हणजे शिक्षण 
"शिकावयास प्रेरणा देणे म्हणजे अध्यापन होय."असे म्हणणे योग्य असे वाटते.
    कारण मनुष्य हा सर्वात बुद्धिवान असून तो सतत आपल्या ज्ञानामध्ये आपल्या पंचेंद्रियांच्या मार्फत वेगवेगळे अनुभव घेत असतो. त्यातून शिकत असतो ,प्रत्येक गोष्ट शिकवण्याची गरज नाही, तर काही गोष्टी अशा आहेत की त्या माणूस स्वयं अध्ययनातून शिकत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाबतीतही वेगळं असं काही नसतं, विद्यार्थीही अनुकरणीय आणि सतत नवीन नवीन गोष्टी शिकणारे असतात. त्यांना फक्त प्रेरणा देणे हे गरजेचे असते. योग्य दिशा देणे आवश्यक असते,म्हणून शिकण्यासाठी प्रेरणा देणे म्हणजेच अध्यापन होय असे म्हणता येईल.
"
            0
        
        
            Answer link
        
        अध्यापन म्हणजे शिकवण्याची क्रिया किंवा प्रक्रिया. हे ज्ञान, कौशल्ये आणि समजूतदारी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याची एक पद्धत आहे.
अध्यापनामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- शिक्षकाने विद्यार्थ्याला विषय समजावून सांगणे.
 - विद्यार्थ्याला नवीन गोष्टी शिकण्यास मदत करणे.
 - विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे.
 - विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणे.
 
अध्यापन ही एक कला आहे. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करतो आणि त्याला यशस्वी होण्यास मदत करतो.
अध्यापनाचे काही प्रकार:
- औपचारिक अध्यापन: हे शिक्षण शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये होते.
 - अनौपचारिक अध्यापन: हे शिक्षण घरी, समाजात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी होऊ शकते.
 
अधिक माहितीसाठी हे दुवे पहा: