शिक्षण
नियोजन
शालेय शिक्षण
शाळा स्तरावरती दहा शाळाबाह्य मुले दाखल झाली आहेत. त्यांच्यासाठी अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाचे शाळा स्तरावरती नियोजन करा. (पूर्वतयारी, प्रत्यक्ष कार्यवाही)?
3 उत्तरे
3
answers
शाळा स्तरावरती दहा शाळाबाह्य मुले दाखल झाली आहेत. त्यांच्यासाठी अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाचे शाळा स्तरावरती नियोजन करा. (पूर्वतयारी, प्रत्यक्ष कार्यवाही)?
10
Answer link
उत्तर:- संपूर्ण राज्यात कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किमान नऊ महिने शाळा बंद होत्या . ऑनलाइन वा ऑफलाइन अशा पर्यायातून शिक्षण चालूच होते पण त्याला मर्यादा होत्या . विद्यार्थी किमान नऊ ते दहा महिने शाळा या प्रचलीत व्यवस्थेपासून दूर असल्याने सोबतच शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध होते तरी त्यांच्या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नक्कीच झालेले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन नुकसान ( learning loss ) होत आहे . तरी ते नुकसान भरून काढणे आणि प्रत्येक बालकास त्याच्या इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यास मदत करणे ही शाळेची आणि त्यातील प्रत्येक शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी आहे . विद्यार्थ्यांची गळती रोखणे , शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे आणि त्याद्वारे प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे आणि प्रत्येक मूल शिकू शकते या उद्देशाने प्रत्येकाने कार्यरत राहणे महत्वाचे आहे . या संदर्भाने शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल करणे आणि त्यांच्या वयानुरूप इयत्तेतील अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी अध्ययन अध्यापनाचे नियोजन पुढील प्रमाणे करण्यात येते.
पुर्वतयारी :-
*विद्यार्थी शाळा प्रवेश- नाव नोंदणी अभियान आणि जागृती.
*शाळाबाह्य , अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवणे.
● शाळा प्रवेश अभियान ( प्रवेशोत्सव ) नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला राबवणे. प्रवेश अभियानासाठी पारंपारिक पर्यायांसोबत रेडियो , कम्यूनिटी रेडियो , टीव्ही , इतर डिजिटल संसाधने आणि प्रसार माध्यमांचा व्यापक आणि पुरेपूर वापर करावा .
* मुली , विशेष गरजा असलेले विद्यार्थी , सामाजिक आणि आर्थिक वंचित गटातील विद्यार्थी यांच्या प्रवेश तथा शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष लक्ष देणे .
• सदर अभियानाद्वारे नवीन विद्यार्थी / शाळाबाह्य विद्यार्थी शाळेला जोडले जातीलच पण कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे शाळा सुरू होताना ( दीर्घ कालावधीनंतर ) सध्या शिकत असलेले विद्यार्थी तथा पालक यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे .
● विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येऊन शिकण्याबद्दल सुरक्षिततेची भावना निर्माण करणे . याकरीता पालक , समाज आणि शाळा यांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेणे.
● स्थलांतरीत बालकांचे होऊ पाहणारे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून प्रत्येक शिक्षक / शाळेने संभाव्य स्थलांतरीत बालकांची यादी तयार करणे .
*अशा बालकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी वारंवार गृहभेटी देऊन उदबोधन करावे .
• शाळा सुरू झाल्यानंतर दीर्घ कालखंडानंतर विद्यार्थी शाळेत येणार आहेत . या कालखंडामध्ये कदाचित विद्यार्थ्यांचे अध्ययन नुकसान ( Leaning Loss ) झाले असण्याची शक्यता आहे . त्यामुळे या शैक्षणिक वर्षाच्या उर्वरित कालावधीमध्ये तसेच नवीन शैक्षणिक वर्षात अध्यापन सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना काही प्रमाणात उपचारात्मक / अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करणे .
* याकरीता शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या मदतीने उपचारात्मक / अतिरिक्त पूरक मार्गदर्शक कार्यक्रमाचे नियोजन करून अंमलबजावणी करणे .
*याकरीता आवश्यकतेनुसार SMC / SMDC सदस्य / सामाजिक संस्था / शासकीय विभाग यांची मदत घ्यावी .
* गरजेनुसार उपचारात्मक / स्तराधारीत शिक्षणाची सोय करणे . या उपचारात्मक / अतिरिक्त पूरक मार्गदर्शक कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची सध्याची विषयनिहाय अध्ययन स्थिती / स्तर माहिती करून घेणे गरजेचे आहे .
प्रत्यक्ष कार्यवाही:-
आपल्या भाषेत बोलण्याचे, चर्चा करण्याचे भरपूर स्वातंत्र्य
आणि संधी दिली जावी.
• आपली गोष्ट सांगण्यासाठी (भाषिक आणि सांकेतिक
स्वरूपात) संधी व प्रोत्साहन द्यावे.
• मुलांद्वारे त्यांच्या भाषेत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी मराठी
भाषा आणि इतर भाषांमध्ये (जी भाषा वर्गात वापरली जाते
किंवा ज्या भाषांमध्ये मुले वर्गात बोलतात.) पुन्हा मांडण्याची
संधी द्यावी. त्यामुळे त्या भाषांना वर्गात योग्य स्थान मिळू शकते आणि मुलांच्या शब्दसंपत्ती, अभिव्यक्तीच्या
विकासास संधी मिळू शकेल.
• कथा, कविता सांगण्याची आणि त्यांवर चर्चा करण्याची
संधी दिली जावी.
• मराठीमध्ये सांगितलेली गोष्ट, कविता, गीत, कथा इत्यादी
आपल्या पद्धतीने आणि आपल्या भाषेत सांगण्याची संधी
दिली जावी.
• प्रश्न विचारण्याची आणि आपले म्हणणे मांडण्याची संधी
दिली जावी.
• वर्ग किंवा शाळेत (वाचन कट्टा/ग्रंथालय) स्तरांनुसार वेगवेगळ्या भाषांची (मुलांची स्वत:ची भाषा/इतर भाषेंतील)
मनोरंजक साहित्य जसे-बालसाहित्य, बालपत्रिका, फलक,
दृक्श्राव्य साहित्य उपलब्ध करून द्यावे. हे साहित्य ब्रेल
लिपीतही उपलब्ध असावे. दृष्टिदोष असणाऱ्या मुलांकरिता
काही साहित्य मोठ्या अक्षरांमध्ये छापलेले असावे.
• वेगवेगळ्या कथा, कवितांचे चित्रांच्या आधाराने अनुमान
लावून अभ्यासण्याची संधी दिली जावी.
• विविध उद्देशांना लक्षात घेऊन अध्ययनाच्या विविध
आयामांना इयत्तांमध्ये योग्य स्थान देण्याची संधी असावी.
जसे-एखाद्या गोष्टीमध्ये एखादी माहिती शोधणे, गोष्टीत
घडलेल्या विविध घटनांचा योग्य क्रम लावणे, त्यांना
आपल्या अनुभवांशी जोडून पाहणे इत्यादी.
• ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टी आपल्या पद्धतीने कागदावर
उतरवण्याची संधी असावी.
जरी अक्षरांमध्ये वळणदारपणा नसला तरीही मुले अक्षरांपासून आकृती काढण्याची सुरुवात करत असतात. याचा वर्गात
स्वीकार केला जावा.
• भाषा शिकण्याच्या प्रक्रियेतील मुलांच्या स्वत:च्या वर्तनात
होणारा बदल हा भाषा अध्ययन प्रक्रियेचा भाग समजला
जावा.
अशा प्रकारे शाळाबाह्य मुलांसाठी अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाचे शाळा स्तरावर नियोजन करता येईल.
0
Answer link
शाळा स्तरावर शाळाबाह्य मुलांसाठी अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाचे नियोजन
पूर्वतयारी:
- सर्वेक्षण: शाळेच्या परिसरातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे.
- नोंदणी: मुलांची माहिती गोळा करून शाळेत नोंदणी करणे.
- समिती: शाळाबाह्य मुलांसाठी एक समिती स्थापन करणे, ज्यात शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकार असतील.
- शिबिर आयोजन: मुलांसाठी शैक्षणिक शिबिरांचे आयोजन करणे.
- विशेष प्रशिक्षण: शिक्षकांसाठी शाळाबाह्य मुलांना शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था करणे.
प्रत्यक्ष कार्यवाही:
- अध्ययन:
- मुलांचा शैक्षणिक स्तर जाणून घेण्यासाठी चाचणी घेणे.
- त्यानुसार, त्यांना योग्य वर्गात दाखल करणे.
- विशेष शैक्षणिक साहित्य (Educational Kit) तयार करणे.
- सोप्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठीActivity Based Learning वर भर देणे.
- अध्यापन:
- शिक्षकांनी मुलांना प्रेमळपणे शिकवणे.
- खेळ, गाणी, गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण देणे.
- मुलांना गट करून शिकवणे (Group Learning).
- शिकवताना स्थानिक भाषेचा वापर करणे.
- मूल्यमापन:
- सतत आणि सर्वंकष मूल्यमापन (Continuous and Comprehensive Evaluation) करणे.
- तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा घेणे.
- वर्गात नियमित गृहपाठ तपासणे.
- पालकांशी वेळोवेळी चर्चा करणे.
अतिरिक्त उपाय:
- मुलांसाठी पोषक आहाराची व्यवस्था करणे.
- शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य मोफत देणे.
- आरोग्य तपासणी करणे.
- पालकांसाठी शिक्षण जागृती कार्यक्रम आयोजित करणे.
या उपायांमुळे शाळाबाह्य मुले शाळेत रुळतील आणि शिक्षण घेऊ शकतील.