संगणक साक्षरता
तंत्रज्ञान
डिजीटल साक्षरता प्रश्नावली?
मूळ प्रश्न: डिजिटल साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नावली कशी तयार कराल?
उत्तर:-
डिजिटल साक्षरता हा शब्द नव्यानेच रुजू झालेला आहे. “डिजिटल साक्षरता म्हणजे काय?”, तर आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपण इलेक्ट्रॉनिक संसाधने जसे की मोबाईल्स आणि संगणक निर्माण करू शकलेलो आहे. त्याच संसाधनांचा संपूर्णतः वापर करण्याची क्षमता म्हणजे डिजिटल साक्षरता!
सध्या डिजिटल इंडिया ही संकल्पना आपण सातत्याने ऐकत आहोत. प्रत्येक जीवनावश्यक वस्तू आणि सेवा ऑनलाईन उपलब्ध झालेली आहे. त्याप्रमाणेच ऑनलाईन शिक्षण व सोशल मीडिया या स्तरांवर देखील आपल्याला मोबाईल अथवा संगणक व्यवस्थितरित्या वापरता येणे, ही काळाची गरज बनलेली आहे.
सध्या प्रत्येक नागरिकाचा संबंध इंटरनेट जगताशी येतच आहे. त्यासाठी विशिष्ट संगणकीय भाषा आणि काही तांत्रिक बाबी व संकल्पना लक्षात येणे आवश्यक असते, त्याशिवाय तुम्ही सहजरीत्या डिजिटल साक्षर बनणे अशक्य आहे.
संपूर्ण जग इंटरनेटमुळे जवळ आलेले आहे. इंटरनेटचा वाढता वापर पाहता बहुसंख्य लोकांना त्याचा वापर जर करता आला तर एक वेगळीच इंटरनेट दुनिया निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. त्यासाठी भविष्यात सर्व लोक डिजिटली साक्षर करणे आवश्यक आहे.
तांत्रिक संसाधने वापरून पाहिल्याशिवाय आपल्याला त्यांचा वापर सहजरीत्या करता येत नाही. सध्या शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढी ही शिक्षण तसेच इतर सुविधा ऑनलाईन पद्धतीने हाताळत आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी सर्व नागरिक साक्षर करणे हे ध्येय होते. परंतु सध्या मोबाईल, संगणक आणि इंटरनेटमुळे लोकांना डिजिटल साक्षर करणे हे ध्येय समोर आहे. तंत्रज्ञानामुळे मानवी आयुष्य दिवसेंदिवस सोयीस्कर आणि सुदृढ बनत चालले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल साक्षरता ही संकल्पना सर्वत्र राबवणे अत्यावश्यक आहे.
त्यासाठी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काही प्रश्नांची निर्मिती केली आहे ती खालील प्रमाणे.
1) संगणक चालू व बंद कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती लिहा ?
2) संगणक प्रोजेक्टरशी सोडण्या विषयी थोडक्यात माहिती सांगा?
3) मोबाईल वरून व्हिडीओ कॉल करण्याच्या पायऱ्या सांगा?
4) मोबाइलवरील इंटरनेट संगणकाशी कसे कनेक्ट करावे थोडक्यात सांगा?
6) प्रश्न पत्रिका तयार करण्यासाठी कोणत्या एप्लीकेशन चा वापर करावा?
7)मोबाईलवर इंटरनेटचा वापर करून वस्तुनिष्ठ प्रश्न कसे तयार करावे याविषयी स्पष्ट करा?
8)वर्ग अध्यापन करत असताना मोबाईल वरील कविता स्पीकरवर ऐकवण्यासाठी त्याची जोडणी कशी करावी याविषयी माहिती सांगा?
9)संगणकाला प्रिंटर ची जोडणी कशी करावी याविषयी थोडक्यात सांगा?
10) लॅपटॉप ला बाहेरून कीबोर्ड जोडता येतो का? व तो कसा ते सांगा?
11) विद्यार्थ्यांचा मोबाईलवर शूट केलेला एखाद्या खेळाचा व्हिडिओ तयार करून त्यावर गाणी कसे टाकावे ते सांगा?
12) मोबाईल मधील उपलब्ध फोटोंचा वापर करून पीडीएफ फाईल तयार करता येऊ शकते का? व कशी या विषयी ची माहिती सांगा?
13) मोबाईल मधील उपलब्ध फोटोंचा वापर करून व्हिडिओ तयार करता येऊ शकतो का? व कसा ते सांगा?
14) मोबाईल मधील फाईल्स संगणकाच्या मध्ये कश्या ट्रान्सफर करता येतील ते सांगा?
15) मोबाईलवर दीक्षा एप्लीकेशन चा वापर कसा करावा?
16) पाठ्य पुस्तका वरील बारकोड च्या सहाय्याने मोबाईल वर पाठ किंवा कविता कशी पहावी याविषयी थोडक्यात सांगा?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers