3 उत्तरे
3
answers
शाळा समितीची कार्ये कसे विशद कराल?
2
Answer link
शाळा समितिची कार्य
.
.
:
शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये :
अधिनियमातील कलम २२ अनुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडावी लागतील.
(१) शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
२) आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करुन त्याची शिफारस करणे. (परिशिष्ट-अ प्रमाणे)
३) त्या शाळेस शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.
४) बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.
५) शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
६) अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.
७) बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहीलयाची दक्षता घेणे.
(८) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनांचे संनियंत्रण करणे.
९) शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
(१०) शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
(११) शाळेतील मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे. १२) शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे.
(१३) शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे.
१४) मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.
१५) निरुपयोगी साहित्य रु. १,०००/- (रु. एक हजार मात्र) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.
(१६) शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे.
१७) शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखीस्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे. समितीच्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
सदर शाळा व्यवस्थापन समितीस आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील.
0
Answer link
शाळा समितीची कार्ये खालीलप्रमाणे आहेत:
- शाळेचा विकास आराखडा तयार करणे: शाळेच्या विकासासाठी योजना तयार करणे आणि त्या योजनांची अंमलबजावणी करणे.
- शालेय व्यवस्थापनात मदत करणे: शाळेच्या दैनंदिन कामकाजात मुख्याध्यापकांना मदत करणे आणि मार्गदर्शन करणे.
- शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे: शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
- शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करणे: शिक्षकांच्या कामाचे वेळोवेळी मूल्यमापन करणे आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे.
- विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे: विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
- पालकांशी समन्वय साधणे: शाळा आणि पालक यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करणे.
- शाळेसाठी निधी उभारणे: शाळेच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी (Funds) उभारणे.
- शाळेच्या मालमत्तेचे व्यवस्थापन: शाळेच्या संपत्तीची देखभाल करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे.
- शालेय नियमांचे पालन करणे: शाळेतील नियम व कायद्यांचे पालन करणे आणि इतरांना त्याचे पालन करण्यास प्रोत्साहित करणे.
- सामाजिक सहभाग वाढवणे: शालेय कार्यक्रमांमध्ये समाजाचा सहभाग वाढवणे.
अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: GR link