शिक्षण शाळा शालेय उपक्रम

शाळा सिद्धी अंमलबजावणीसाठी उपक्रमाची माहिती मिळेल का?

13 उत्तरे
13 answers

शाळा सिद्धी अंमलबजावणीसाठी उपक्रमाची माहिती मिळेल का?

11

शाळा सिद्धी अंमलबजावणीसाठी शिक्षक व शाळा प्रमुखांवरून दहा उपक्रम:

  1. शाळेच्या विकास योजनेत सक्रिय सहभाग.
  2. स्वयंमूल्यमापनात मदत करणे.
  3. सुधारणा क्षेत्रांची निवड करणे.
  4. कृती आराखडा तयार करणे.
  5. नियमित आढावा बैठका घेणे.
  6. अध्यापनशास्त्रात सुधारणा करणे.
  7. शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर करणे.
  8. विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आयोजित करणे.
  9. पालकांशी नियमित संवाद साधणे.
  10. शाळेच्या भौतिक सुविधा सुधारण्यात योगदान देणे.
उत्तर लिहिले · 18/6/2022
कर्म · 460
6
शाळा सिद्धी अंमलबजावणी साठी उपक्रम 

* शाळा सिद्धि * ( समृद्ध शाळा) या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबी समजून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास सिद्ध होणे गरजेचे ठरत आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक घटकाविषयी, शाळा सिद्धि निर्धारक *श्यामकांत रूले (जळगाव)* यांच्या अभ्यासातील संकलित माहिती आपणासमोर खालील लिंक द्वारे मांडण्यात येत आहे....

http://www.balsnehi.in/2015/12/blog post_11.html?m=1

शालेय माहितीचे ७ मुख्य क्षेत्रे व ४५ उपक्षेत्रे यांचे विवेचन वरील लिंक द्वारे संकलित करून आपणापर्यंत पोहचविण्यात मला आनंद होत आहे.

तसेच, शालासिध्दी संदर्भातील school Evaluation या Dashboard (दर्शक फलक) वर केंद्र शासनाच्याDashboard (दर्शक फलक) वर केंद्र शासनाच्या

*www.nuepa.org* *www.nuepa.eduplan.nic.in* या संकेत स्थळावर विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

शाळा सिध्दी ppt Book डाऊनलोड साठी खालील लिंक वर

क्लिक करा

http://www.balsnehi.in/p/home.html?m=1

धन्यवाद!!!!

सर्व शाळांसाठी आनंदाची बातमी. शाळासिध्दी विषयाशी निगडित अनेक उपक्रमशील शाळा व शिक्षकांकडून विचारणा होत आहे. मा. असिफ शेख सर (प्रमुख शाळा सिद्धी) यांच्याशी झालेल्या चर्चेअंती स्वयंस्फूर्तीने स्वयं व बाह्य मूल्यांकनास उत्सुक शाळांनी खाली दिलेल्या लिंकचा अभ्यास करावा. काही सूचना व सुधारणा सुचवावयाच्या असल्यास मेल करावा.

* विषय शाळासिध्दी*

शाळास्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही

1. सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/12/2016) / एसडी-6 दिनांक 30 मार्च,

2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे,

2. "शालासिद्धी" संदर्भातील school Evaluation या Dashboard ( दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या www.nuepa.org,www.

nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करण्यात यावेवाचन करण्यात यावे.

3. शाळा माहिती व दर्शक फलक (Dashboard) नुसार आपल्या शाळेची माहिती सात मुख्य क्षेत्र व 45 उपक्षेत्रानुसार तयार करण्यात यावी. शाळेची वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तयार करुन ठेवावी. या माहिती बरोबरच माहितीची पुष्टी देणारे पुरावे, फोटो, चित्रफिती, रजिष्टर, अभिलेखे तयार करण्यात यावे.

4. | शाळा - UDISE CODE युडायस कोडचा वापर करुन शाळेचा पासवर्ड असलेला लॉग इन आय डी (Login ID ) शाळा तयार करु शकते. यासाठी शाळेने LOGIN ID म्हणून शाळेचा UDISE कोड टाकावा. शाळेचे gmail खात्याचा समावेश करावा. पासवर्ड शाळेनेच निवडून तो टाकावा. त्यानंतर हाच पासवर्ड जतन करावा व प्रत्येक लॉग इन च्या वेळी वापरावा. आपल्या शाळेचे खाते अशाप्रकारे उघडून शाळा स्वयं मूल्यमापन विषयक सर्व माहिती भरावी व save करावी. काही बदल नसल्यास final submit करावी. Final submit केल्यानंतरच सदरची माहिती इतरांना दिसेल याची नोंद घ्यावी.

5. शाळेची माहिती व बाह्यमूल्यमापनाची तयारी पूर्ण झाल्यावर शाळेने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडे शाळा बाह्य मूल्यमापन व समृध्दशाळा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर 1 महिण्याच्या आत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडून शाळा बाह्य मूल्यमापन निर्धारकांकडून करण्यात येईल. निर्धारणाच्या वेळी शालेय माहितीशी संबंधित सर्व माहिती, पुरावे व अभिलेखे • निर्धारकांना उपलब्ध करुन देणे शाळांना बंधनकारक आहे.

6. बाह्य मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित शाळा ही समृध्द शाळा निकष पूर्तता करीत असल्यास नियोजित तारखांना शाळेचेशाळा निकष पुर्तता करीत असल्यास नियोजित तारखांना शाळेचे प्रमाणपत्र "समृध्दशाळा 2016" अर्थात"SS-2016" वितरीत केले जातील.

7. शाळा सिध्दी समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठीdir.mscert@gmail.

|comashalasiddhimaha@gmail.com या मेल चा वापर

करावा.

8. सर्व माहिती भरुन झाल्यावर खालील लिंक मध्ये देखील माहिती भरण्यात यावी.

http://goo.gl/forms/omliwWETqXTByIw73

शाळांसाठी आचारसंहिता शाळा माहितीचे प्रपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी सात क्षेत्रे व 45 उपक्षेत्राची माहिती तयार करुन ठेवावी. चूकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळा निर्धारणासाठी येणा-या निर्धारकांना कोणत्याही कामाची किंवा नोंदीची सक्ती करु नये निर्धारकांना आवश्यक त्या माहितीचे रजिष्टर्स, दाखले, पुरावे व अभिलेखे पाहण्यासाठी उपलब्ध करुन द्यावे. निर्धारक, कामकाज याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.

● उपक्रमशील शिक्षकांना सुवर्णसंधी -

शाळा बाह्य मूल्यमापनासाठी आवश्यक निर्धारक (Assesoors ) निर्मिती व कार्यपध्दती

1. निर्धारक म्हणून काम करण्यास इच्छूक व्यक्तीने सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय

शैगुवि / 2016 / (12/2016) / एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.काळजीपूर्वक वाचन करावे.

2. निर्धारक निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरावी. सदर लिंकनुसार प्राप्त अर्जामधून निर्धारकांची निवड केली जाईल. निवड करतांना निर्धारकाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व उल्लेखनीय कामाचा विचार केला जाईल.

3. गुगल फॉर्म लिंक फक्त असेसर करिता http://goo.gl/forms/gE6Hm1dbkacoDc6s 2

4. निर्धारकांनी "शालासिद्धी"संदर्भातील school Evaluation या Dashboard (दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या www.nuepa.org,www.nuepa.

eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करावे.

5. निर्धारकांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच शाळा बाह्य मूल्यमापन करण्यासाठी निर्धारक म्हणून कामकाज करता येईल. निर्धारकांसाठी विद्या परिषदेने नियोजित केलेल्या तारखांना संबंधित शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे अनिवार्य राहील.

6. शाळा सिध्दी समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठीdir.mscert@gmail.coma shalasiddhimaha@gmail.com या मेल अॅड्रेस चा वापर KARP करावा.

निर्धारकांसाठी आचारसंहिता 1.शाळा स्वयं मूल्यमापन व शाळा - बाह्य मूल्यमापन याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी. विद्या परिषदेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 15/6/2022
कर्म · 53710
0

शाळा सिद्धी (Shala Siddhi) अंमलबजावणीसाठी काही उपक्रम खालीलप्रमाणे:

  1. स्व-मूल्यांकन (Self-Evaluation):
    • शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासह कार्यशाळा आयोजित करणे.
    • प्रत्येक घटकांकडून शाळेच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीवर विचार करणे आणि नोंदी तयार करणे.
    • स्व-मूल्यांकन अहवाल तयार करणे.
  2. सुधारणा योजना (Improvement Plan):
    • स्व-मूल्यांकन अहवालाच्या आधारावर सुधारणा करण्याची गरज असलेल्या क्षेत्रांची निवड करणे.
    • प्रत्येक क्षेत्रासाठी SMART उद्दिष्ट्ये (Specific, Measurable, Achievable, Relevant, Time-bound) निश्चित करणे.
    • उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी कृती योजना (Action Plan) तयार करणे, ज्यात जबाबदार व्यक्ती आणि वेळेची मर्यादा नमूद करावी.
  3. अंमलबजावणी (Implementation):
    • तयार केलेल्या कृती योजनेनुसार उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करणे.
    • शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करणे, ज्यात नवीन शिक्षण पद्धती, तंत्रज्ञान आणि मूल्यांकन पद्धतींचा समावेश असेल.
    • विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग, समुपदेशन सत्रे आणि कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करणे.
    • पालकांसाठी नियमित बैठका आयोजित करणे, ज्यात शाळेच्या प्रगतीविषयी माहिती देणे आणि त्यांचे मत जाणून घेणे.
  4. नિયમિત देखरेख आणि मूल्यांकन (Regular Monitoring and Evaluation):
    • ठराविक कालावधीनंतर (उदा. दर तीन महिने) कृती योजनेच्या प्रगतीचा आढावा घेणे.
    • उद्दिष्ट्ये साध्य होत आहेत किंवा नाही हे तपासणे आणि आवश्यक असल्यास योजनेत बदल करणे.
    • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे नियमित मूल्यांकन करणे आणि त्यानुसार शिक्षणात बदल करणे.
  5. अहवाल सादर करणे (Reporting):
    • शाळा सिद्धी अंतर्गत केलेल्या कामाचा अहवाल तयार करणे आणि तो शिक्षण विभागाला सादर करणे.
    • अहवालात सुधारणा योजना, अंमलबजावणी आणि मूल्यांकनाची माहिती असावी.

टीप: शाळा सिद्धी मार्गदर्शकतत्त्वे आणि नियमांनुसार वरील उपक्रमांमध्ये बदल करणे अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (MSCERT) अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: MSCERT

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

गॅप सर्टिफिकेटसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात?
१०वी चा १ विषय गेला आहे, त्यासाठी मला सगळे विषय परत द्यावे लागतील का?
मी २००५ मध्ये इयत्ता १० वी मध्ये नापास झालो आहे, माझा एक विषय गेला आहे. आता मला २०२६ मध्ये १० वी बोर्ड परीक्षा द्यायची आहे, मी परीक्षा देऊ शकतो का? परीक्षा देण्याची पद्धत काय असेल?
मूळ मराठी शिकत असताना शिकण्याची प्रक्रिया अधिक उन्नत कशी करता येईल?
गणेश काय अभ्यास करतो ते सांगा?
12वीला ४८.९३ टक्के आहेत, इंग्रजी थोडे कच्चे आहे, गणित चांगले आहे, पुढे काय करावे सुचत नाही?
औपचारिक शिक्षण म्हणजे काय?