कला नृत्य

नृत्यकलेचे एकूण प्रकार किती व कोणते?

2 उत्तरे
2 answers

नृत्यकलेचे एकूण प्रकार किती व कोणते?

1
नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.[१]

*भरतनाट्यम

ही सर्वात प्राचीन नृत्य शैली असून तिचा उगम तामिळनाडू येथील तंजावूर प्रांतात झाला.
या शैलीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.
यात कर्नाटक संगीत असते.
एकल शैली असून स्त्री किंवा पुरुष दोघेही नाचू शकतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
संस्कृत, कन्नड, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये नृत्य रचना आढळतात.
वाद्य- मृदंग, घटम, खंजिरा, मोरसिंग, बासरी, व्हायोलीन, तालम आणि वीणा.
दैवत- शिव,विष्णू, मुरुगन, गणेश, देवी.
ग्रंथ- नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण.
रचना-पुष्पांजली, अलारिपू,जतीस्वरम, कौतुकम, शब्दम, वर्णम, अभिनय पदम, तिल्लाना, मंगलम
*कथक

उत्तर भारतात उदयास आलेली शैली.बनारस,जयपूर लखनौ येथे विस्तार.
मोगल संस्कृतीचा प्रभाव
हिंदुस्थानी संगीताचा वापर
एकल शैली असून स्त्री आणि पुरुष दोघेही नृत्य करतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
हिंदी, ब्रिज, भोजपुरी,उ र्दू भाषांमध्ये रचना असतात.
वाद्य - बासरी, तबला, पेटी, पखवाज, सारंगी.
दैवत- कृष्ण, शिव.
ग्रंथ - नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण
रचना - वंदना, सलामी, थाट, परण, अभिनय पक्ष.
*कथकली

केरळची वैशिष्ट्यपूर्ण शैली
आर्य आणि द्रविड संस्कृतीचा प्रभाव
कर्नाटक सोपनम संगीत
समूह शैली आणि फक्त पुरुष कलाकार
भाषा -मल्याळम, संस्कृत
वाद्य - चेंगला, मद्दल, चेंडा, एल्लतालम
दैवत - रामायण, महाभारतातील पात्र आणि भास, कालिदासाची नाटके
ग्रंथ- हस्तलक्षण दीपिका
रचना - श्लोक, पदम, कलाझीम
*मणिपुरी नृत्य

मणिपूर, आसाम, बंगाल, त्रिपुरा या ईशान्य भारतातील शैली.
वैष्णव संप्रदायाचा प्रभाव.
समूह शैली
भाषा -मणिपुरी
वाद्य - ढोलक, बासुरी, शंख, झांजा, तंबोरा, पुंग
दैवत- कृष्ण
ग्रंथ- गोविंद संगीत, लीला विलास.
रचना - रासलीला
कथक
 भारतातील नृत्यशैली

उत्तर लिहिले · 12/5/2022
कर्म · 53750
0

भारतीय नृत्यकलेचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत:

  1. शास्त्रीय नृत्य (Classical Dance):

    हे नृत्य प्रकार विशिष्ट नियमांनुसार आणि परंपरेनुसार सादर केले जातात. शास्त्रीय नृत्यांमध्ये भरतनाट्यम, कथक, कथकली, ओडिसी, कुचिपुडी, मणिपुरी, मोहिनीअट्टम आणि सत्रिया यांचा समावेश होतो.

  2. लोक नृत्य (Folk Dance):

    हे नृत्य प्रकार स्थानिक परंपरा आणि संस्कृतीचा भाग आहेत. हे नृत्य प्रकार विशिष्ट प्रदेशांमध्ये विशेष प्रसंगी केले जातात. उदाहरणे: लावणी (महाराष्ट्र), भांगडा (पंजाब), बिहू (आसाम), गरबा (गुजरात).

टीप: काही ठिकाणी सेमी-क्लासिकल (Semi-classical) नृत्य प्रकारचा देखील उल्लेख आढळतो, जो शास्त्रीय आणि लोक नृत्यांचा संगम असतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2380

Related Questions

नृत्यकला म्हणजे काय ते लिहून भारतीय नृत्याचे विविध प्रकार स्पष्ट करा?
घुंगराचे वजन किती असते?
ब्राझील देश कोणत्या नृत्य प्रकार साठी प्रसिद्ध आहे?
मणिपुरी नृत्य प्रकार स्पष्ट करा. कला आणि सामाजिक जीवन यांच्यातील परस्पर संबंध सविस्तर स्पष्ट करा?
नृत्य आणि नृत्यकला यातील फरक स्पष्ट कसा कराल?
कथकली नृत्यशैली म्हणजे काय?
नृत्य कलेचे प्रकार कोणते?