शब्द

शप्पथ' या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली?

1 उत्तर
1 answers

शप्पथ' या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली?

0



आपले बोलणे खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी ईश्वर, देवता किंवा एखाद्या पुज्य अथवा अतिप्रिय व्यक्ती / गोष्टीची दिली जाणारी साक्ष किंवा ग्वाही म्हणजे शपथ. शप्पथ व शप्पत ही बोलीभाषेतली शपथ ची रूपे आहेत.

शपथ ची संस्कृत व्युत्पत्ती:

शप् या मुळ शब्दापासुन शपथः झाले. शपथ घेणें > शप् - शपति-ते, शप्यति-ते, शप्त .

1 ) शप् चा अर्थ शपथ घेणें - शाप देणे- शिव्याशाप देणे, प्रतिज्ञेवर सांगणे- बोलणे, आण घेणे, भाक घेणे, वचन घेणे, आण-भाक खाणे किंवा देणे, वचन देणे- घेणे. दिव्य करणे, दिव्यातून जाणे, तिरस्कृत किंवा शापित.

2) शप् - अव्य० [संस्कृत] स्वीकरणसूचक शब्द , स्वीकार

3) शप् -चे इंग्रजी अर्थ assure, promise, plight, pledge आश्वस्त करणे, वचन /आश्वासन देणे, विवाहाचे वचन देणे, प्रतिज्ञेवर सांगणे.

शपथ चा उपयोग उदाहरणे :

१) गीतेची शपथ जे सांगेल ते खरे सांगेल २) एवढा उपदेश करून आईबापाचं काही ऐकेल तर शपथ ३) जर पाच मिनिटात झोपेतून उठला नाहीस तर शप्पत घडाभर पाणी टाकील तुझ्यावर { जर तर हे शब्द आधी घालून जोराचा नकार किंवा दुजोरा देण्यांत येतो. } ४). बालशिवाजीने सवंगड्या सोबत रोहिडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या करंगळीच्या रक्ताचा अभिषेक करीत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ५) आई म्हणाली- " यापुढे तू कधीही दारू पिणार नाहीस, जुगार खेळणार नाहीस, खोटे बोलणार नाहीस …तुला माझी शपथ ! " ६) घे बघू माझी शप्पत तू दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे बघत नाहीस म्हणून !

म्हण : शपथ केली वहायला भाकरी केली खायला

वाक्प्रचार : शपथ वाहायला मोकळा होणे / शपथेला मोकळा होणे : काम केले नाही असे कुणी म्हणू नये यासाठी थोडेफार , कसेतरी हलगर्जीपणे काम करणे, शपथ घ्यायला सद्सद्विवेक /अंतर्मन आडवे येऊन नये अशा स्थितीत असणे .

शपथ सोडणे : म्हणजे मुलींच्या खेळात शपथेतुन मोकळॆ करणे ."शपथ सुटली ; कुंभाराची घागर फुटली ; हत्तीवरून साखर वाटली "-असे बोलून शपथेतुन सोडवतात

शपथपूर्वक (क्रियाविशेषण) - शपथ घेऊन, शपथ घेत

शपथपत्र - शपथपूर्वक लेखी जबानी, प्रतिज्ञालेख, प्रतिज्ञापत्र, शपथलेख,क्रियापत्र, ऍफिडेव्हिट



उत्तर लिहिले · 10/5/2022
कर्म · 48335

Related Questions

मार्गदर्शन तत्वे व मूलभूत अधिकार यांचा परस्पर संबंध तुमच्या शब्दात सांगा?
अतिशय समानार्थी शब्द मराठी ?
सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे कोणी म्हंटले आहे?
समास सामासिक शब्द विग्रह?
शब्दाचे वचन बदला भिंति?
जूनि विरुद्धार्ति शब्द मराठी?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तरेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात लिहा 13 विचार soc101?