प्रशासन समीक्षा साहित्य

उपयोजित समीक्षेनेचे स्वरूप स्पष्ट करून समीक्षेनेचे वर्गीकरण थोडक्यात कसे सांगाल?

 उपयोजित समीक्षेचे स्वरूप

विशिष्ट वाङ्मयीन मूल्ये व विशिष्ट जीवनमूल्ये यांच्या कळत-नकळत स्वीकारलेल्या चौकटीतून साहित्यकृतीची तर्कसंगतपणे केलेली आकलने किंवा मूल्यामापन हा उपयोजित समीक्षेचा मुख्य प्रकार आहे. लेखक, त्याची साहित्यकृती आणि वाचक या तीन घटकांचा स्थल-काल-परस्थितीचा जो अवकाश बेहून असतो. त्यातील वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व, वर्गीय जाणिवा याची नोंद घेतली जाते. साहित्यकृतीचा विचार बाह्यतांत्रिक रचना, आशयाचा सामाजिक-नैतिक, तौलनिक व मूल्यमापनात्मक विवेकाचे दर्शन, सांस्कृतिक ध्येये, उद्दिष्टे यांचा संदर्भ येतो. तसेच आस्वादक, वाचक व त्याचा आस्वाद प्रत्यय यांच्या पकडीतून बाहेर पडून समग्र बाबक व त्याचा भावनिक, बौद्धिक प्रक्रियांनी व्यक्त होणारा वाचनप्रत्यय याकडे उपयोजित समीक्षा अधिक कल देते. त्यामुळे वाङ्मयीन, सांस्कृतिक परंपरा व परिस्थिती यासंबंधीचे समीक्षीय भान या उपयोजित समीक्षेतून दिसून येते.

उपयोजित समीक्षेमध्ये संशोधन, आकलन, आस्वाद व मूल्यमापन या गोष्टींना महत्त्व असते. या



व्यापक चौकटीतून विशिष्ट साहित्यिक, त्यांची साहित्यकृती किंवा विशिष्ट साहित्यप्रकारांचा अभ्यास होत असतो किंवा एकाच साहित्यकृतीसंबंधी अनेक समीक्षक आपापल्या परीने आपली मांडणी करत असतात. उदा. अवकाळी पावसाच्या निमित्ताने (संपा. सतीश कामत) या संपादनामध्ये आनंद विंगकर यांनी लिहिलेल्या 'अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट' या कादंबरीची अनेकांगानी समीक्षा करण्यात आलेली दिसते. तसेच एकाच साहित्यकाच्या विविध लेखनाचीदेखील समीक्षा केली जाते. उदा. 'बाहुपेडी विंदा' (संपा. विजया राज्याध्यक्ष) या संपादनातून विंदा करंदीकर यांच्या समग्र साहित्याचे आणि त्यांनी लिहिलेल्या समीक्षेची समीक्षा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या साहित्यकांच्या साहित्याची तुलनादेखील या समीक्षेत केली जाते. याशिवाय पुस्तकपरीक्षण हा उपयोजित समीक्षेचा एक मोठा भाग आहे. वेगवेगळ्या मासिकातून, नियतकालिकातून विशेषांकातून पुस्तकपरीक्षणे लिहिली जातात. शिवाय काही वर्तमानपत्रातूनदेखील अशी परीक्षणे पहायला मिळतात.
1 उत्तर
1 answers

उपयोजित समीक्षेनेचे स्वरूप स्पष्ट करून समीक्षेनेचे वर्गीकरण थोडक्यात कसे सांगाल?

2
उपयोजित समीक्षेचे स्वरूप

विशिष्ट वाङ्मयीन मूल्ये व विशिष्ट जीवनमूल्ये यांच्या कळत-नकळत स्वीकारलेल्या चौकटीतून साहित्यकृतीची तर्कसंगतपणे केलेली आकलने किंवा मूल्यामापन हा उपयोजित समीक्षेचा मुख्य प्रकार आहे. लेखक, त्याची साहित्यकृती आणि वाचक या तीन घटकांचा स्थल-काल-परस्थितीचा जो अवकाश वेढून असतो. त्यातील वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व, वर्गीय जाणिवा यांची नोंद घेतली जाते. साहित्यकृतीचा विचार बाह्यतांत्रिक रचना, आशयाचा सामाजिक-नैतिक, तौलनिक व मूल्यमापनात्मक विवेकाचे दर्शन, सांस्कृतिक ध्येये, उद्दिष्टे यांचा संदर्भ येतो. तसेच आस्वादक, वाचक व त्याचा आस्वाद प्रत्यय यांच्या पकडीतून बाहेर पडून समग्र वाचक व त्याचा भावनिक, बौद्धिक प्रक्रियांनी व्यक्त होणारा वाचनप्रत्यय याकडे उपयोजित समीक्षा अधिक कल देते. त्यामुळे वाङ्मयीन, सांस्कृतिक परंपरा व परिस्थिती यासंबंधीचे समीक्षीय भान या उपयोजित समीक्षेतून दिसून येते.

उपयोजित समीक्षेमध्ये संशोधन, आकलन, आस्वाद व मूल्यमापन या गोष्टींना महत्त्व असते. या

३व्यापक चौकटीतून विशिष्ट साहित्यिक, त्यांची साहित्यकृती किंवा विशिष्ट साहित्यप्रकारांचा अभ्यास होत असतो किंवा एकाच साहित्यकृतीसंबंधी अनेक समीक्षक आपापल्या परीने आपली मांडणी करत असतात. उदा. अवकाळी पावसाच्या निमित्ताने (संपा. सतीश कामत) या संपादनामध्ये आनंद विंगकर यांनी लिहिलेल्या 'अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट या कादंबरीची अनेकांगानी समीक्षा करण्यात आलेली दिसते. तसेच एकाच साहित्यकाच्या विविध लेखनाचीदेखील समीक्षा केली जाते. उदा. 'बहुपेड़ी विंदा' (संपा. विजया राज्याध्यक्ष) या संपादनातून विंदा करंदीकर यांच्या समग्र साहित्याचे आणि त्यांनी लिहिलेल्या समीक्षेची समीक्षा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या साहित्यकांच्या साहित्याची तुलनादेखील या समीक्षेत केली जाते. याशिवाय पुस्तकपरीक्षणे हा उपयोजित समीक्षेचा एक मोठा भाग आहे. वेगवेगळ्या मासिकातून, नियतकालिकातून, विशेषांकातून पुस्तकपरीक्षणे लिहिली जातात. शिवाय काही वर्तमानपत्रातूनदेखील अशी परीक्षणे पहायला मिळतात.

१.३.२ साहित्य समीक्षेचे स्वरूप

साहित्यकृती अस्तित्वात येत असतानाच तिची समीक्षा अस्तित्वात येत असते. समीक्षेशिवाय तिचे अस्तित्व केवळ एक लेखनकृती इतकेच असते. त्यामुळे समीक्षा ही कलेच्या संदर्भात अपरिहार्य असते. कलाकृतींचा आस्वाद घेणे आणि आस्वादाच्या ओघातच आवश्यक तेथे टीका करून त्या कलाकृतीचे मूल्यमापन या समीक्षेत केले जाते. उपयोजित समीक्षा करत असताना साहित्य तत्त्वाचा शोध घेऊन साहित्याचे प्रयोजन साहित्यनिर्मितीमागील हेतू आणि साहित्यकृतीचे जीवनाच्या दृष्टीने मूल्य या घटकांची तपासणी केली जाते. ही तपासणी करत असताना साहित्यकृतीचा आकृतिबंध, त्यातील आशयाचे स्वरूप, आशय, भाषा या सर्व बाबींचा विचार केला जातो. या ठिकाणी आपल्याला आधुनिकतेच्या अनुषंगाने समीक्षेचा विचार करणे अभिप्रेत आहे. समीक्षेचा इतिहास पाहायचा म्हटला तर तो आपल्याला प्राचीन काळापासून दिसतो. प्राचीन काळात भामह, बामन, दण्डी, रुद्रट, भरत यांनी शब्द, अर्थ, वाक्य, काव्य, रस यांची विविधांगाने समीक्षा केली होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून श्री. कृ. कोल्हटकर, कृ.प्र. खाडिलकर, तात्यासाहेब केळकर, ना. सी. फडके, बा.सी.मर्ढेकर यांचीदेखील समीक्षा मराठी साहित्यात दिसून येते. १९६० नंतर अनेकविध प्रवाहांनी मराठी वाङ्मय विश्वात मोलाची भर घातली.. वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवविश्वांनी बरेच साहित्य मराठीत नव्याने जन्म घेऊ लागले. या साहित्यावर अनेकागाने उलट-सुलट चर्चा झाल्या. पुढे त्या समीक्षारूपाने मराठीत आल्या. यातूनच अनेकविध समीक्षाप्रकार मराठीत उदयाला आले.

प्राचीन भारतीय समीक्षा ही सिद्धान्त मांडणारे ग्रंथ आणि विशिष्ट ग्रंथांची चिकित्सा करणारी अशा स्वरूपाची होती, या समीक्षेत पद्यरचनेला प्राधान्य होते. पद्य हे पाठांतर आणि आकलनासाठी सोपे असल्यामुळे अशा मार्गाने अभ्यास करणे ही त्याकाळी ज्ञानप्राप्तीची पद्धती होती. तसेच अशा ग्रंथामध्ये

४काही न देता अल्पाक्षरत्व रचनाही असल्याचे दिसते. कालांतराने यामध्ये बदल घडत गेला. पुढे मराठ्यांच्या सत्तेचा शेवट, सरजामशाहीचा अस्त इंग्रजी शिक्षणाची सुरुवात पुण्यामध्ये झालेल्या शिक्षणाची सोय, मुद्रणकलेचा प्रवेश आणि प्रचार नियतकालिकांचा प्रारंभ, दळणवळणांच्या आधुनिक व्यवस्थेचा प्रारंभ यासारख्या घडामोडीमुळे एक प्रकारचा शिक्षित समाज बाहेर पडून लागला. या समाजाचे विचार, संकल्पना व स्वानुभव यातून साहित्य आकाराला येत गेले. या साहित्यावर अनेकांशी चर्चा होऊन मराठीत समीक्षा निर्माण होऊ लागली. इंग्रजी विद्या पाश्चात्य आचार-विचार व संस्कृती, त्यातून झालेल्या भौतिक सुधारणा यामुळे आपणदेखील पाश्चात्यासारखे बनले पाहिजे. नवे शिक्षण घेतले पाहिजे. अशी जाणीव सर्वत्र बळावू लागली. यातून साहित्याच्या या नवीन हालचालीस प्रारंभ झाला. सुरुवातीला शालेय पाठ्यपुस्तके नंतर 'दर्पण', 'प्रभाकर', 'ज्ञानप्रकाश', 'ज्ञानोदय', 'ज्ञानदूत', 'इंदूप्रकाश' यासारखी नियतकालिके आकाराला आली. या नियतकालिकांच्या माध्यमातून नवीन पुस्तकांचा परिचय करून देण्यात येऊ लागला. त्याचबरोबर त्यातील गुणदोषांचाही उल्लेख होऊ लागला. एखाद्या ग्रंथकाराच्या आणि त्याच्या विविध लेखनकृतींचा एकत्रित विचार हा प्रकार नव्यानेच अस्तित्वात आला, त्यांच्या साहित्यासंबंधीही भाषणे होऊ लागली. या भाषणांचे व लेखांचे संग्रह निघाले. प्राचीन संस्कृत वाङ्मयाच्या तुलनेने आपण कुठे आहोत याची तुलना केली जाऊ लागली. यातून संस्कृत आणि पाश्चात्त्य साहित्यशास्त्राचा अभ्यास सुरू होऊन 'समीक्षा' हा सर्वस्वी नवीन असा प्रकार मराठी साहित्यात आला..

आधुनिक मराठीतील महत्त्वाचे पहिले वहिले समीक्षक म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. चिपळूणकरांपासून आधुनिक मराठीचे युग सुरू झाल्याचे मानले जाते. मराठी गद्यलेखनाला त्यांनी वळण दिले; मराठी भाषा व संस्कृती या संबंधाने तत्कालीन समाजाला एक नवीन दृष्टी दिली. ग्रंथावर टीका का करावी? व कशी करावी? चांगल्या टीकाकाराच्या अंगी कोणकोकणे गुण असावेत? याविषयासंबंधी त्यांनी लेखन केले. त्यांच्या या लेखनाचे पुढे अनेकांनी अनुकरण केले. चिपळूणकरांच्यानंतर मराठी समीक्षेमध्ये श्री. कृ. कोल्हटकर यांचे कार्य दिसून येते. साहित्यविचार आणि कलाविचार यांना केंद्रस्थानी मानून मराठी समीक्षेला शास्त्रशुद्ध वळण देण्याचे काम श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केले. समकालीन न. चिं. केळकर यांनी निबंध लेखनाच्या माध्यमातून समीक्षालेखन केले. त्याच्या या असाधारण कामगिरीमुळे त्यांचा गौरव साहित्यसम्राट म्हणून झाला आहे. पत्रकारिता प्रस्तावना, भाषण, भाषाविषयक मते त्यांनी मांडली, याबरोरच वि. ल. भावे, ल. रा. पांगाकर, ना. म. भिडे, वि. वा. भिडे, चिंतामणराव वैद्य, ना. गो. चाफेकर यासारख्या लेखकांनी समीक्षाविश्वात आपले स्थान निर्माण केले.

समीक्षेच्या नव्या टप्प्यामध्ये तिला एक नवे रूप प्राप्त झाले. १९३० च्या सुमारास विद्यापीठीय अभ्यासक्रमात बदल होऊ लागले. त्यामुळे मराठीसारख्या देशी भाषांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले त्यातून अनेक समीक्षा ग्रंथ तयार होऊ लागले. या काळात रा. श्री. जोगांसारखे नामवंत समीक्षक उदयास आले, त्यांनी आपल्या "अभिनव काव्यप्रकाश' या ग्रंथातून भरतमुनीपासून ते जगन्नाथ पंडितापर्यंत सुमारे दोन

५मानसशास्त्राच्या आधारे साहित्यातील भावरूपाचे, भावनिक संघर्षाचे सूक्ष्म व अचूक आकलन करता येते. तेव्हा मानसशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून साहित्यनिर्मितीमागील तसेच साहित्यकृतीतील मनोव्यापाराचा शोध घेता येतो.

मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीमध्ये साहित्यकृतीचा लेखकाच्या मनाशी साक्षात संबंध अभ्यासला जातो. या संबंधामुळे साहित्यकृती आणि लेखक यांच्या अनुभवविश्वाचा शोध घेतला जातो. साहित्यकृतीत असणाऱ्या व्यक्तिरेखांच्या मानसिक अवस्थाचे चित्रण आणि प्रत्यक्ष लेखकाचे मनोविश्व यांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते. साहित्यानुभवाची प्रक्रिया ही एक मानसिक प्रक्रिया असते, त्यातील घटनांना एक मानसिक संदर्भ असतो. त्याचा अभ्यास या समीक्षापद्धतीमध्ये केला जातो. मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा अभ्यास करताना सिंगफड फ्राईड या मनोशास्त्रज्ञाच्या सिद्धान्ताचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. सिग्मंड फ्रॉईड यांनी संबोध (Conscious) बोधपूर्व (Pre-Conscious) आणि अबोध / नेणीव (Unconscious) अशा तीन मानसिक प्रक्रियांचे आणि अह (Ego) अत्यंह (Super ego) आणि तत् (ID) अशा तीन शक्तिकेंद्राचे विवेचन केले. आपल्या जाणिवेच्या पातळीवरील घडामोडी म्हणजे संबोध प्रक्रिया अस्पष्ट अशा जाणिवा म्हणजे बोधपूर्ण प्रक्रिया आणि नेणिवेतील कधीही न कळणाच्या घडामोडी म्हणजे असंज्ञ अवोध प्रक्रिया होत. मनाच्या या तिसऱ्या प्रक्रियेतील प्रवृत्तीची जाणीव आपल्याला कधीही होत नाही, त्याचप्रमाणे आपण काय, कसे आहोत याची जाणीव म्हणजे अहं होय. अत्यंह म्हणजे आपल्या कृती उक्तींचे मूल्यमापन करणारी शक्ती म्हणजेच आपली सद्सद्विवेकबुद्धी होय. ही नीतीशी संबंधित आहे. जाणिवेच्या दृष्टीने अनाकलनीय असणारी मूल्यतम नैसर्गिक प्रेरणानी भरलेली, त्याचे समाधान करताना अन्य कोणत्याही गोष्टीचे भान न ठेवणारी आपल्यातील शक्ती म्हणजे तत् होय. •फ्रॉइंडने याशिवाय सेन्सार आणि रतिशक्ती अशा दोन कल्पना मांडल्या आहेत. सेन्सॉर ही आपल्या जाणिवेला नकोशा वाटणाऱ्या गोष्टी दूर लोटणारी प्रक्रिया आहे. तसेच रतिशक्ती म्हणजे व्यापक अधनि लैंगिक प्रेरणामधील शक्ती आहे. फ्रॉइडच्या मते, आपल्या मनात या सर्व शक्ती कार्यरत असतात. आपल्या विविध प्रकारच्या व विविध पातळ्यावरील इच्छांची पूर्तता करणे हे या मनाचे मुख्य उद्दिष्ट् असते, त्यामुळे या शक्ती ह्या आपल्या मनातील सर्वांत महत्त्वाची प्रेरणा आहे.

फ्रॉईडच्या मते, लैंगिक शक्ती ही सर्वगामी असते. ही शक्ती ज्या ठिकाणी स्थिरावते त्यावर माणसाचे व्यक्तिमत्त्व अवलंबून असते. यासंदर्भात फ्रॉईडने इडिपस कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रॉ कॉम्प्लेक्स आणि कॅस्ट्रेशन कॉम्प्लेक्स असे मनोगंड सांगितले. ईडिपस कॉम्प्लेक्स हा महत्वाचा मनोगंड असून मुलाला आपल्या आईविषयी वाटणारे (लैंगिक) प्रेम त्यातून व्यक्त होते. याउलट मुलीला आपल्या वडिलांविषयी वाटणारी ओढ ही इलेक्ट्रॉ कॉम्प्लेक्समधून ओळखली जाते. मुलाच्या या आईवरील प्रेमात त्याचे वडील मुख्य प्रतिस्पर्धी असतात, त्यामुळे त्याच्या मनात त्यांना नष्ट करण्याची इच्छा होते. परंतु वडील अधिक शक्तिशाली असल्यामुळे ते आपले खच्चीकरण करतील अशीही भिती त्याला असते. हा कॅस्ट्रेशन

Commवर्षाची काव्यशास्त्राच्या परंपरांचा परिचय करून दिला. यामध्ये काव्यलक्षण, काव्यप्रयोजन, काव्यकारण, शब्दांच्या शक्ती, वक्रोक्ती, रीतिविचार, रसविचार असे विषय मराठी समीक्षेला उलगडून दाखविले. ग. त्र्य. देशपांडे यांनी प्राचीन काव्यशास्त्राची आणि भरत नाट्यशास्त्राची ओळख करून दिली. संस्कृत साहित्यशास्त्राचा परिचय करून देणारा 'भारतीय साहित्यशास्त्र' हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. पुढच्या काळात पाश्चात्य समीक्षेचा परिणाम मराठी साहित्यावर होऊ लागला. या पाश्चात्त्य साहित्याच्या अभ्यासातून ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, ग. त्र्यं. माडखोलकर, बा. सौ. सर्वेकर, श्री. के. क्षीरसागर, पु. शि. रेगे, कुसुमावती देशपांडे, वा. ल. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, दि. के. बेडेकर यासारखे नामवंत समीक्षक उदयाला आले. या पाश्चात्य साहित्यामुळे मराठी वाङ्मयात अनेकविध बदल झाले. गांधीवाद, मार्क्सवाद, कलावाद, जीवनवाद यासारखे बाद मराठीत चर्चिले गेले. त्यातच १९६० नंतर मराठी वाङ्मयविश्वात अनेक बदल पडले. दुसरे महायुद्ध भारताला मिळालेले स्वातंत्र्य, राज्यघटनेची निर्मिती, त्यातून नव्याने शिकून बाहेर पडलेल्या तरुणाला आलेले आत्मभान यामुळे अनेक प्रकारचे साहित्य निर्माण झाले. या साहित्यावर अनेकांगी चर्चा होऊन समीक्षेचे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले. त्या समीक्षाप्रकारांचा अभ्यास याठिकाणी केला गेला आहे.

अ) मानसशास्त्रीय समीक्षा :

समीक्षेच्या प्रकारामध्ये मानसशास्त्रीय समीक्षा ही एक प्रभावी समीक्षा पद्धती आहे. गेल्या शंभरेक वर्षामध्ये जगभर मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र प्रगत झाले आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव जीवनाच्या अनेक भागावर पडत आहे. परिणामी समीक्षेच्या संदर्भातही मानसशास्त्रीय समीक्षापद्धती हो महत्त्वाची ठरते. कोणतीही साहित्यकृती ही त्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा मनोविश्वाचा, त्याच्या अनुभवविश्वाचा आविष्कार असते. मानसशास्त्रीय समीक्षापद्धतीमध्ये साहित्यनिर्मिती ही जाणिवेच्या पातळीवर मानली असली तरी तिच्यात नेणिवेच्या अबोध मनाच्या पातळीवरील विश्वाचा मोठ्या प्रमाणावर आविष्कार होतो. त्यामुळे लेखकाच्या अनुभवविश्वाला याठिकाणी महत्त्व प्राप्त होते. साहित्यकृती घडत असताना त्यातील प्रतिमा प्रतीके, आशय, रूपविशेष हे विशिष्ट प्रकारचे का? याचा उलगडा लेखकाच्या अबोध मनातील प्रक्रिया कळल्यावर होतो. त्यामुळे साहित्यकृतीचे आकलन अधिक नेमके आणि यथार्थ होते. ही मानसशास्त्रीय समीक्षेची धारणा आहे, कारण साहित्यकृतीचा लेखकाच्या मनाशी साक्षात संबंध असतो, त्या घटनांना लेखकाचे मानसिक संदर्भ असतात. आपल्या मनातील अनेक संदर्भ लेखक पात्रांकरवी साहित्यकृतीतून मांडत असतो. उदा. 'शाळा' ही मिलिंद बोकील यांची कादंबरी. पौगडावस्थेतील मूल्यांचे अनुभवविश्व रेखाटताना दिसते. थोडक्यात, साहित्यकृतीच्या अर्थनिर्णयासाठी मनोविश्लेषण तंत्राचा वापर करणाऱ्या साहित्यसमीक्षेला मानसशास्त्रीय समीक्षा असे म्हणतात. साहित्य हे माणसाच्या मनातील भावविश्वाचा वेध होते तर मानसशास्त्र माणसाच्या मनाची चिकित्सा करते.
उत्तर लिहिले · 23/4/2022
कर्म · 1850

Related Questions

बनगरवाडी या कादंबरीचा आशय थोडक्यात स्पष्ट करा?
जातील हे बी दिवस या आत्मचरित्राचा आढावा घ्या?
गोतावळा ही कादंबरी वाचून त्यावर पुस्तक परीक्षण लिहा?
संघर्ष हा ह्या कालखंडातील कादंबरीचा महत्त्वाचा विषय आहे, या मताची सोदाहरण चर्चा करा.
१९२० ते १९४५ पर्यंतच्या साहित्यावर घेण्यात येणाऱ्या आक्षेपांची चर्चा करा?
राधी ही कथा आहे की कादंबरी, याविषयी तुमचे मत मांडा?
अंगणातील पोपट या कथेचे रसग्रहण करा?