मराठी भाषा व्याकरण

सगळेच मुसळ केरात' ही म्हण कशी रूढ झाली?

1 उत्तर
1 answers

सगळेच मुसळ केरात' ही म्हण कशी रूढ झाली?

3
मुसळ केरांत जाणें म्हणजे फारच हलगर्जीपणा, दुर्लक्ष, अंदाधुंदी असणें. कारण केरांत जाण्याइतकी मुसळ काही लहान वस्तु नाही !

अत्यंत महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होणें. महत्वाचीच गोष्ट विसरणें. उदाहरणार्थ : "अग सगळंच मुसळ केरांत ! गौरीपुढें मिठाईचं तबक ठेवायला विसरलोंच."

एक महत्वपूर्ण गोष्ट करायची राहून गेल्याने केलेली सारी तयारी, घेतलेले कष्ट व परिश्रम, खटाटोप, केलेले प्रयत्न सारे वाया जाणे.

भात गीरणी, हाॅलर , यांत्रिक कांडण येण्या आधीची गोष्ट :-

मोठे संयुक्त कुटुंब, स्वयंपाकाची धांदल उडाली आहे, कुणी मसाला वाटीत आहे, कुणी भाजी निवडीत आहे , तर कुणी चुल पेटवीत आहे. अशात एखाद्या नव्या आलेल्या सुनबाईस पटकन भात कांडायचे काम सोपविले आहे.

कणगीतुन भात काढलाय त्या आधी घाई गर्दीत आजूबाजूस तिने साफसफाई केली आहे. पाला पाचोळा, गुरांचा चारा, पेंढा अस सर्व छान झाडलोट केली आहे. पण तिला भात कांडायचे मुसळच सापडेना.

सारा खोळंबा झाला तेंव्हा कुटुंबातील उच्चपदस्थ डोखरी ओरडली सगळी कडे शोधलेस काय ? नवखी सुन 'हो' म्हणाली. तशी डोखरी पुढे होऊन मुसळ शोधायला लागली.

"अग्गो बाई माझे हे काय दिसतेय लांबडे केरात ? एवढे सगळे मुसळ केरात लोटलेस ! दिसले कसे नाही ! तुझे ध्यान कुठे असते काम करताना ?"

अशा प्रकारे तेंव्हापासुन ही म्हण रूढ झाली असावी !!




मुसळाचा अर्थ-

तांदूळ इ० सडण्याकरितां , गोल व लांब लांकूड घेऊन त्याच्या टोंकाला वसवी किंवा मांडळ बसवून केलेलें साधन ; कांडणी . गदा ह्या नांवाचें युद्धोपयोगी हत्यार ; सोटा .
उत्तर लिहिले · 20/4/2022
कर्म · 121645

Related Questions

मराठीच्या व्याकरणाचा सुवर्णकाळ कोणत्या राजघराण्याच्या काळाला म्हटले जाते ?
रक्तदान उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्राला सहभागी करून घेण्यासाठी विनंती पत्र कसे लिहाल?
मराठी व्याकरणासाठी चांगली pdf मिळेल काय ?
पुरुषलिंगी नामाचे अनेकवचन हे पुरुषलिंगी होते की नपुंसकलिंगी? स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे स्त्रीलिंगी होते की नपुंसकलिंगी?
संयुक्‍तवाक्‍य व मिश्रवाक्‍य यांच्या विषयी माहिती मिळेल का?
डाव साधने वाक्यप्रचार कोणत्या जीवक्षेत्राशी संबंधित आहेत हे सांगून त्यांचा वाक्यात उपयोग कसा कराल?
संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?