समाजशास्त्र आदिवासी जीवन

आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?

2
आदिवासींची ठळक वैशिष्ट्येआदिवासी समाजांसंबंधी भरपूर संशोधन व लिखाण झाले असले, तरी आदिवासी या संज्ञेची एकही सर्वमान्य व्याख्या करता आलेली नाही. आदिवासी जमातींची काही ठळक वैशिष्ट्ये अशी :
एक एक आदिवासी जमात एका विशिष्ट भूप्रदेशात राहाते व तो भूप्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रगत समाजाच्या प्रदेशाच्या मानाने लहान असतो. आदिवासी क्षेत्र इतर प्रगत समाजापासून दूर किंवा जंगलात असते. रस्त्यांच्या अभावी तो प्रदेश दुर्गम असतो.
आदिवासी जमात साधारणपणे अंतर्विवाही असते व तिचे बहिर्विवाही कुळींत विभाजन झालेले असते. समाजातील गट लहान असतात व ते नातेसंबंधांवर आधारलेले असतात. या गटांचे सदस्यत्व आधुनिक समाजातील मंडळाच्या (क्लब) सदस्यत्वाप्रमाणे ऐच्छिक नसते.
प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. आदिवासी समाजाचे नियंत्रण पूर्णपणे पंचायत किंवा त्यांचा मुखिया करतो.
एकेका आदिवासी जमातीची बहुधा स्वतंत्र भाषा वा बोली असते.
आदिवासींचा धर्म क्षेत्रीय म्हणजे त्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित असतो; त्यांची तीर्थक्षेत्रेही त्यांच्या भागातच असतात.
आदिवासी अर्थव्यवस्थेत गटवार श्रमविभाजनाचा वा धंदेवार भिन्न सामाजिक गटांचा अभाव असतो. सर्व लोक सर्व प्रकारची कामे करतात. याशिवाय आदिवासी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने प्राथमिक स्वरूपाची असतात. पाटावरवंटा, सापळे, जाळी, आकडे, गळ, दोऱ्या, टोकदार व धारदार दांडकी, हातोडा, कोयता ह्यांसारखी प्राथमिक अवजारेच वापरात असतात. अर्थव्यवस्थेतील उत्पादन-वितरण-सेवन या तीन टप्प्यांपैकी वितरण म्हणजे मालाची वा उत्पन्नाची सार्वत्रिक देवघेव, हा टप्पा आदिवासी अर्थव्यवस्थेत नसतो. उत्पादन कमी असल्यामुळे बाजारपेठाही नसतात. जो तो आपापल्या उत्पादनाचा उपभोग घेतो. त्यांची अर्थव्यवस्था बहुधा नाणे इ. चलनावाचून चालणारी व वस्तुविनिमयाधिष्ठित असते. वस्तुविनिमय म्हणजे उपयुक्त वस्तूंची देवघेव.
आदिवासी समाजात परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इ. माध्यमांद्वारे देते.
धर्मात निसर्गपूजेस व जादूसारख्या क्रियाकल्पास महत्त्व असते.
आदिवासी समाजात परंपरा व सामाजिक नियंत्रण यांवर भर असल्याने सर्व लोकांच्या वागण्यात सारखेपणा असतो. दैनंदिन व्यवहारातील ठराविक चाकोरीमुळे सवयी व चालीरीती बनतात. एकंदरीत समाजात एकजिनसीपणा जास्त आढळतो.
आदिवासी समाज बरेचसे स्वयंकेंद्रित असतात; त्यांचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवन बाह्यसंपर्कापासून शतकानुशतके अलिप्त राहिल्याने स्वयंकेंद्रितता येणे स्वाभाविक आहे. जगातील सर्व समाज पूर्वी आदिवासी अवस्थेत होते. पुढे ते ग्रामीण समाज झाले. नंतर राज्यसंस्था आल्यानंतर राजधान्या व व्यापारी पेठा झाल्या व त्यामुळे नागरीकरणास प्रारंभ झाला. औद्योगिक क्रांतीनंतर संपूर्ण नागरीकरणाच्या दिशेने मानवी समाज वाटचाल करू लागले आहेत, असे प्रख्यात मानवशास्त्रज्ञ रॉबर्ट रेडफिल्डचे मत आहे. आधुनिक काळात त्यामुळेच निर्जमातीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आदिवासी समाजांचे ग्रामीण समाजावस्थेत रूपांतर होऊ लागले आहे.

उत्तर लिहिले · 18/4/2022
कर्म · 121765
0
येथे आदिवासी समुदायाची काही वैशिष्ट्ये आहेत:

आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये:

  • भौगोलिक एकाकीपणा: आदिवासी समुदाय सहसा दुर्गम आणि डोंगराळ भागात राहतात, ज्यामुळे ते इतर समुदायांपासून भौगोलिकदृष्ट्या वेगळे राहतात.
  • विशिष्ट संस्कृती: त्यांची स्वतःची वेगळी संस्कृती, परंपरा, चालीरीती आणि जीवनशैली असते.
  • भाषा: आदिवासी समुदायांच्या स्वतःच्या प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषा असतात.
  • सामाजिक रचना: त्यांची सामाजिक रचना सहसा साधी आणि समतावादी असते.
  • आर्थिक क्रियाकलाप: ते सहसा शेती, शिकार आणि वन उत्पादनांवर अवलंबून असतात.
  • शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण: आदिवासी समुदायांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असते आणि ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात.
  • राजकीय प्रतिनिधित्व: राजकीय प्रक्रियेत त्यांचे प्रतिनिधित्व सहसा कमी असते.
  • जंगल आणि निसर्गावर अवलंबित्व: ते त्यांच्या जीवनशैलीसाठी जंगल आणि नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात.
  • देवता आणि धार्मिक श्रद्धा: त्यांची स्वतःची वेगळी देवता आणि धार्मिक श्रद्धा असतात, ज्या निसर्गावर आधारित असतात.
  • कला आणि हस्तकला: आदिवासी समुदाय त्यांच्या कला आणि हस्तकलेसाठी ओळखले जातात, ज्यात ते नैसर्गिक वस्तूंचा वापर करतात.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1220

Related Questions

आदिवासी जमातींची वैशिष्ट्ये कोणती?
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा जवळचे गोंड आदिवासींचे गाव कोणते?
विदर्भातील आदिवासी समुदाय आणि समाज जीवन या बाबतीत माहिती?