इंटरनेट तंत्रज्ञान

इंटरनेट-एक मायाजाल या विषयावर संवाद लेखन?

2 उत्तरे
2 answers

इंटरनेट-एक मायाजाल या विषयावर संवाद लेखन?

0
     इंटरनेट एक मायाजाल 
 
  हल्ली ऑनलाईन चोऱ्या आणि फसवणूक इतकी वाढली आहे कि दिवसाला दोन तीन तरी बातम्या नजरेस पडतातच. इंटरनेटच्या ह्या जगात समोरासमोर बसून गप्पा मारणं आता फार कमी झाल आहे. सोशल साईटवरून मैत्री गप्पा प्रेम ह्या गोष्टी काही नव्या नाहीत. पण आजकाल घरी बसून आपण सगळेच इतके त्रासलो आहोत कि इंटरनेट हे एकमेव असं माध्यम झाल आहे जे आपल्याला बाहेरील जगासोबत जोडत. तरुण पिढी तर जवळजवळ इंटरनेटच्या व्यसनाधीन झालीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण आजकाल इंटरनेट सोशल मीडिया ह्या गोष्टी प्रौढ लोकसुद्धा सर्रास वापरताना दिसतात. म्हणजे प्रौढ वयस्कर लोकांनी इंटरनेट सोशल मीडिया वापरू नये ह्या मताची मी अजिबात नाही आहे. नव्या गोष्टी शिकणे आणि काळानुसार बदलणं हे चांगलंच आहे. परंतु अज्ञानी माणसापेक्षा अर्धवट ज्ञान असणारा व्यक्ती धोक्यात येण्याची शक्यता अधिक असते. 
      हल्ली बँकांच्या जाहिरातीमधून अश्या फसवणुकीबद्दल जनजागृती वाढली आहे. त्यामुळे बहुतेक लोकांना हे माहित असत कि कुणी फोन करून OTP मागितला तर तो द्यायचा नाही. बँकेची माहिती अनोळखी व्यक्तींना द्यायची नाही. पण जस आपण चोरांची चोरी करण्याची पद्धत जाणली तसेच चोरांनी देखील आपली चोरी करण्याची पद्धत बदलली. सोशल मीडिया वापरणारा बराचसा प्रौढ वर्ग हा रिटायर झालेल्या लोकांचा असतो. आयुष्यभर मेहनत करून आता निवांत क्षण घालवण्याच्या दिवसात त्यांचं मन ह्या सोशल मीडियाच्या मायाजालात कधी गुंतलं जात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. 
पुरेशी माहिती नसल्याने अनोळखी व्यक्तीची फ्रेंड request accept करणे किंवा त्यांच्याशी गप्पा मारणे ह्या गोष्टी सर्रास चालतात. ह्या वयोगटातील लोक तरुण पिढीपेक्षा तरी खूप जास्त संवेदनशील असल्याने ते त्या समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन आपल्या बद्दल सगळं काही सांगून मोकळे होतात. त्यांच्याही नकळत ते आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल इत्यंभूत माहिती समोरच्या व्यक्तीला देतात. सगळेच लोक असे असतात असं नाही परंतु एक खूप मोठा वर्ग असा आहे जो सोशल मीडिया बद्दल फार काही माहित नसताना देखील त्याचा वापर करत आहे. म्हणजे समोरून आलेली REQUEST हि ज्या नावाने आली आहे ती व्यक्ती त्याच नावाची असेल असं गृहीत धरल जात. पण ती व्यक्ती तीच असेल किंवा तिने ठेवलेले फोटो हे त्याच व्यक्तीचे असतील असे नाही. खूप लोक मुलींच्या नावाने अकाउंट उघडून कित्येकांची फसवणूक करताना दिसून येतात. हे सगळं आपल्या पिढीला माहित आहे पण आपल्या आईवडिलांना ह्या गोष्टी माहित नसतात.
      आपण आईवडिलांना नवीन मोबाईल घेऊन देतो काही गोष्टी शिकवतो देखील पण इंटरनेट्वरुन चालणाऱ्या फसवणुकीबद्दल त्यांना माहिती देणं हि देखील आपलीच जबाबदारी आहे. अन्यथा आपल्यावरच पश्चाताप करत बसण्याची वेळ येईल. 
    परवाच आमच्या ओळखीतल्या एका काकांकडून एका बाईने दहा हजार रुपये उकळले. सोशल मीडिया वरून ओळख झाली काकांची बहीण अकाली मरण पावल्याने ते फार अस्वस्थ होते. अशातच त्यांची ओळख ह्या बाईसोबत झाली. बोलता बोलता काकांनी आपलं दुःख त्यांना सांगितलं. बाई म्हणाल्या आजपासून मीच तुमची बहीण. आता बहीण म्हटलं कि काका सगळ्याच गोष्टी तिला सांगणार. तीन चार महिने अश्याच गप्पा रंगल्या आणि एक दिवस बाईंनी मेसेंज केला माझा नवरा आजारी आहे पैश्याची गरज आहे मला पैसे पाठवा. काकांनी मागचा पुढचा विचार न करता पैसे पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी तब्येत कशी आहे विचारायला मेसेज करतात तर मेसेज काही जात नाही. त्या बाई पैसे घेऊन केव्हाच पसार झालेल्या. अकाउंट देखील डिलीट केलेलं. आता त्या बाई खरच बाई होत्या कि बुवा होता हे त्याच जाणोत. 
     आजचा हा लेख खास प्रौढ वर्गासाठी आहे जे इंटरनेट तर वापरतात पण त्याची फारशी माहिती नसते. अश्या वेळेस आपल्या मुलांना किंवा मित्र मैत्रिणींना विचारूनच सोशल मीडियाचा वापर करा. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या आधी त्याला पडताळून पहा. सोशल मीडिया किंवा इंटरनेट वाईट आहे असं मुळीच नाही परंतु त्याच योग्य ते ज्ञान असेल तरच त्याचा वापर करा अन्यथा पश्यातापाची वेळ येईल.बाकी तुम्ही सुजाण आहातच. पटतंय का? पटलं तर घ्या 

उत्तर लिहिले · 28/4/2022
कर्म · 53700
0

इंटरनेट: एक मायाजाल – संवाद लेखन

पात्र:

  • अर्णव: महाविद्यालयीन विद्यार्थी, इंटरनेटचा नियमित वापरकर्ता
  • सानिया: महाविद्यालयीन विद्यार्थिनी, इंटरनेटच्या वापराबाबत साशंक

Scene 1: महाविद्यालयाच्या कट्ट्यावर

सानिया: (टेबलावर पुस्तकं ठेवत) अर्णव, काय करतो आहेस? नेहमी मोबाईलमध्येच असतोस?

अर्णव: (मोबाईलमध्ये व्यस्त) अगं, बघ ना, किती useful गोष्टी आहेत इंटरनेटवर. मी तर माझ्या प्रोजेक्टसाठी माहिती शोधतोय.

सानिया: मला नाही वाटत इंटरनेट फार उपयोगी आहे. ते एक मायाजाल आहे. लोकांना त्यात अडकवून ठेवतात.

अर्णव: (हसतो) तू असं कसं बोलतेस? इंटरनेटमुळे जग किती जवळ आलं आहे बघ. तू घरबसल्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माहिती मिळवू शकते.

सानिया: माहिती तर मिळते, पण त्यातील किती खरी असते? Fake news (खोट्या बातम्या) आणि चुकीच्या माहितीने लोकांना گمراہ (mislead) करतात.

अर्णव: ते खरं आहे, पण आपण Fact check (तथ्य तपासणी) करू शकतो. News websites (बातम्यांची संकेतस्थळे) आणि इतर reliable sources (विश्वसनीय स्रोत) आहेत ना!

सानिया: मला अजूनही भीती वाटते. Online फसवणूक, identity theft (ओळख चोरी) आणि सायबर गुन्हेगारी किती वाढली आहे बघ.

अर्णव: हो, हे धोके आहेत, पण आपण Safety measures (सुरक्षा उपाय) वापरू शकतो. Strong passwords (मजबूत संकेतशब्द) वापरणे, unknown links (अज्ञात दुवे) वर क्लिक न करणे, आणि आपली personal information (वैयक्तिक माहिती) सुरक्षित ठेवणे हे महत्त्वाचे आहे.

सानिया: मला अजून एक problem आहे. लोक Social media (सामाजिक माध्यमे) वर तासन्तास वेळ वाया घालवतात. Physical activities (शारीरिक हालचाली) कमी झाल्या आहेत आणि Health problems (आरोग्याच्या समस्या) वाढल्या आहेत.

अर्णव: तू points बरोबर आहेत, पण Social media चा वापर productive कामांसाठीही होऊ शकतो. Online learning (ऑनलाईन शिक्षण), networking (संपर्क वाढवणे) आणि business promotion (व्यवसाय प्रोत्साहन) साठी हे खूप उपयोगी आहे.

सानिया: मला अजूनही doubt आहे, पण तू म्हणतो आहेस तर मी try करेन. पण जपून वापरेन.

अर्णव: नक्कीच! इंटरनेट एक powerful tool (शक्तिशाली साधन) आहे. त्याचा योग्य वापर करणे आपल्या हातात आहे.


या संवादात, इंटरनेटच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू मांडल्या आहेत. इंटरनेट हे एक मायाजाल नक्कीच आहे, पण त्याचा योग्य वापर केल्यास ते आपल्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.

टीप: हा संवाद केवळ एक उदाहरण आहे. तुम्ही तुमच्या विचारानुसार आणि गरजेनुसार बदल करू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

तुम्ही इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करा व लिहा?
इंटरनेटची रचना १९८० साली सर्वप्रथम कोणत्या देशाने मांडली?
जागतिक स्वीकार्यता (Universal Acceptance) म्हणजे काय?
इंटरनेटचे उपयोग लिहा?
इंटरनेटचे महत्त्व स्पष्ट करा?
Archive.org वर 1 hour loan आणि 14-day loan काय आहे? याचे पैसे द्यावे लागतात काय? 14 दिवसांनंतर आपण पुस्तके वाचू शकतो काय?
इंटरनेट इन सेन्टेन्स अँड विथ?