3 उत्तरे
3 answers

मेटाव्हर्स (Metaverse) म्हणजे काय?

2
मेटावर्स हा एक ग्रीक शब्द आहे आणि मेटॉवर्स हा शब्द मेटा + वर्स (Meta+Verse) हे दोन शब्दांना एकत्र करून मेटॉवर्स शब्द बनला. मेटा चा अर्थ 'च्या पलीकडे होतो आणि वर्स म्हणजेच जग किंवा विश्व होय. म्हणजेच मेटॉवर्स चा अर्थ आपल्या कल्पनेच्या पलीकडचे विश्व असा होतो.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या आपल्या विश्वासारखेच एक आभासी विश्व असेल.
Metaverse म्हणजे एक आभासी जग ज्यामध्ये तुम्ही वास्तविक जगात जे काही करता ते सर्व मेटॉवर्स मध्ये करू शकता.
             
Metaverse म्हणजे काय? | Metaverse Meaning in Marathi

मेटॉवर्स हे आपल्या जगा प्रमाणेच एक Virtual म्हणजेच आभासी जग असेल ज्यामध्ये सर्व काही काल्पनिक असेल परंतु सत्य भासणारे असेल. या मेटॉवर्स टेकनॉलॉजि च्या माध्यमातून आपण सर्वच गोष्टी ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो त्या आपल्याला मोबाईल किंवा कॉम्प्युटर्स च्या साहाय्याने अनुभवायला मिळतील.

ज्या प्रमाणे आपण मोबाईल मध्ये एखादा गेम खेळत असताना आपण त्या गेम मध्ये असलेल्या कॅरॅक्टर ला अनुभवतो अगदी त्याच प्रमाणे मेटॉवर्स मध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व क्रिया अनुभवू शकू.
एक आभासी जग तयार करण्यासाठी अनेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे त्या तंत्रज्ञाना मध्ये व्हर्च्युअल रियालिटी (Virtual Reality), ऑगमेंटेड रियलिटी (Augmented Reality), अश्या आभासी तंज्ञानाचे मिश्रण मेटॉवर्स या टेकनॉलॉजि मध्ये असणार आहे.
त्याचप्रमाणे 5G टेक्नॉलॉजी, ब्लॉकचैन तत्रंज्ञान आणि NFT सारख्या टेकनॉलॉजि चा देखील वापर मेटॉवर्स मध्ये केला जाईल. या सर्व प्रकारच्या तत्रंज्ञानाला एकत्रित करून एक मेटॉवर्स तयार करण्यात येणार आहे.

मेटावर्सचा उपयोग काय असेल?

आपण सध्या जे काही इंटरनेट आणि मोबाईलच्या सहाय्याने द्विमितीय विश्वात करतो आहे ते सर्व काही 3D मध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे. यामध्ये मग मेटावर्स च्या माध्यमातून आपण ज्या मीटिंग सध्या मोबाईलच्या माध्यमातून घेतो आहे त्यांचा 3D आनंद घेऊ शकू. आपल्याला एक वेळा हा आनंद अनुभवायला आवडेल मात्र याची गरज सतत असेल का? हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. याचे उत्तर मात्र येणारा काळच देऊ शकेल.

आपल्याला एका ठिकाणी बसून सर्व काही करता येऊ शकेल. मात्र आपण बाहेरील विश्वापासून दूर राहू शकतो का? सध्या लॉकडाऊन झाल्यानंतर देखील आपल्याला ते जमले नाही तर भविष्यात ते शक्य असेल का?

मेटावर्स पासून होणारे तोटे

आपल्याला एक काल्पनिक विश्व जर मिळाले तर आपण त्याच विश्वात रमून जाऊ शकतो. आपल्याला खऱ्या विश्वाविषयी काही सहानुभूती किंवा माहिती नसेल. आपण खऱ्या विश्वापासून दूर होण्यास सुरुवात करू आणि हे खरंच धोक्याचे पाऊल असेल.

सध्या आपण जे काही इंटरनेट वर करतो आहे ते सर्व आपल्याकडून थोड्याफार परमिशन घेत आहे. मग जर आपल्याला मेटावर्स वापरायचे असेल तर आपल्या ला त्या तंत्रज्ञानाला सर्व परमिशन घ्याव्या लागतील आणि परिणाम म्हणजे तुमची प्रायव्हसी पूर्णपणे नष्ट झालेली असेल. तुमचा डेटा किती ठिकाणी विकला जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही.

मेटॉवर्स म्हणजे काय? याबद्दल अतिरिक्त माहितीचे वाचन करण्यासाठी या मराठी स्पिरिट या वेबसाईट ला व्हिझिट करा.

मेटावर्स विषयी आपण जवळपास सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर मेटावर्स चे हे सर्व फायदे आणि तोटे आणि उपयोग लक्षात घेतल्यावर मेटावर्स विषयी आपले मत काय आहे? हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उत्तर लिहिले · 5/5/2022
कर्म · 2195
0
मेटाव्हर्स (Metaverse) म्हणजे आभासी जग.
जे वास्तवात नसते, फक्त कल्पनेत असते. ते जग वास्तविक नसून काल्पनिक असते.
उत्तर लिहिले · 15/4/2022
कर्म · 25850
0

मेटाव्हर्स (Metaverse) म्हणजे काय?

मेटाव्हर्स ही एकshared online space आहे जिथे user व्हर्च्युअल (virtual) जगात interact करू शकतात.

हे इंटरनेटचे एक नवीन version आहे, जे 3D, इमर्सिव्ह (immersive) आणि इंटरॅक्टिव्ह (interactive) अनुभव देते.

मेटाव्हर्सची काही वैशिष्ट्ये:
  • व्हर्च्युअल जग: मेटाव्हर्समध्ये user व्हर्च्युअल जगात प्रवेश करू शकतात, जिथे ते buildings, landscapes आणि इतर usersबरोबर interact करू शकतात.
  • 3D ग्राफिक्स: मेटाव्हर्स 3D ग्राफिक्स वापरते, ज्यामुळे अनुभव अधिक आकर्षक आणि वास्तववादी वाटतो.
  • इमर्सिव्ह अनुभव: मेटाव्हर्स इमर्सिव्ह अनुभव देण्यासाठी व्हर्च्युअल reality (VR) आणि augmented reality (AR) तंत्रज्ञान वापरते.
  • सामाजिक संवाद: user मेटाव्हर्समध्ये socialise करू शकतात, games खेळू शकतात आणि collaborate करू शकतात.
  • आर्थिक संधी: मेटाव्हर्समध्ये virtual वस्तू आणि services खरेदी आणि विक्री करण्याची संधी आहे.
मेटाव्हर्सचे उपयोग:
  • शिक्षण: विद्यार्थी 3D मध्ये concepts explore करू शकतात.
  • मनोरंजन: games खेळणे, concerts पाहणे शक्य आहे.
  • व्यवसाय: meetings घेणे, उत्पादने प्रदर्शित करणे शक्य आहे.
  • सामाजिक संवाद: मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट करणे शक्य आहे.

मेटाव्हर्स अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, परंतु त्यात बदल घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2840