भूगोल खंड देशसेवा देश

ऑस्ट्रेलिया खंडात एकूण किती देश आहेत आणि ते कोणते?

2 उत्तरे
2 answers

ऑस्ट्रेलिया खंडात एकूण किती देश आहेत आणि ते कोणते?

1
समुद्रांपलीकडे ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस न्यू गिनी, आग्नेयीस न्यूझीलंड व वायव्येस इंडोनेशिया हे देश आहेत. ऑस्ट्रेलियाची न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया, साउथ ऑस्ट्रेलिया, क्विन्सलँड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व टास्मानिया ही राज्ये असून नॉर्दर्न टेरिटरी व ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी हे केंद्रशासित प्रदेश आहेत.


जगातील सर्वात लहान आणि लोकसंख्येची घनता सर्वांत कमी असलेले खंड आणि ब्रिटिश कॉमनवेल्थमधील स्वतंत्र देश. क्षेत्रफळ७६,९५,१०० चौ. किमी.; लोकसंख्या आदिवासींसह १,२७,२८,५०० (१९७१). कमाल पूर्व-पश्चिम अंतर ३,८५९ किमी., उत्तर-दक्षिण अंतर सु. ३,१७० किमी., किनारा १९,६४४ किमी.; ऑस्ट्रेलिया १०° ४१' व ४३° ३९' द. आणि ११३° ९' पू. व१५३° ३९' पू. यांमध्ये बसलेला आहे. ऑस्ट्रेलिया म्हणजे दक्षिणेकडील भूमी. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस तिमोर व आराफूरा समुद्र, ईसान्येस कोरल समुद्र, पूर्वेस पॅसिफिक महासागर व टास्मन समुद्र आणि दक्षिणेस व पश्चिमेस हिंदी महासागर असून टास्मानिया बेटही दक्षिणेकडेच आहे.

उत्तर किनारपट्टीवर कार्पेटेरियाचे आखात व दक्षिणेकडे ग्रेट ऑस्ट्रिलियन बाइट व स्पेन्सर आखात असून ईशान्य किनाऱ्याजवळ ग्रेट बॅरिअर रीफ ही प्रवाळभित्ती सु. २,००९ किमी. पसरलेली आहे. समुद्रांपलीकडे ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस न्यू गिनी, आग्नेयीस न्यूझीलंड व वायव्येस इंडोनेशिया हे देश आहेत. ऑस्ट्रेलियाची न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया, साउथ ऑस्ट्रेलिया, क्विन्सलँड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व टास्मानिया ही राज्ये असून नॉर्दर्न टेरिटरी व ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी हे केंद्रशासित प्रदेश आहेत.

पूर्व न्यू गिनीच्या प्रदेशावर ऑस्ट्रेलियाच प्रशासन करतो. पापुआ, अ‍ॅशमोर व कार्तीए बेटे, ख्रिसमस बेट, कोको बेटे, हर्ड व मॅकडोनल बेटे, मॅकेरी बेट व नॉर्फोक बेटे ही ऑस्ट्रेलियाच्या मालकीची आहेत. दक्षिणेकडील ग्रेट ऑस्ट्रेलियन बाइटचा किनारा, पश्चिम किनारा व उत्तरेच्या केपयॉर्क द्वीपकल्पाचा किनारा हे वायव्य व पूर्व किनाऱ्यांप्रमाणे दंतुर नाहीत. उत्तरेकडील समुद्रबूड जमीन थेट न्यू गिनीपर्यंत गेलेली आहे. आग्नेय किनाऱ्याची ही जमीन अगदी अरुंद आहे. बाकीची कमीजास्त रुंद आहे. टास्मानिया बेट आग्नेय टोकाच्या समुद्रवूड जमिनीवरच आहे.

भूवर्णनऑस्ट्रेलिया खंडात ३ ते ६ अब्ज वर्षांपूर्वीच्या प्राचीन कँब्रियन-पूर्व खडकांची ढाल मध्य व पश्चिम भागांत पसरलेली आहे; काही ठिकाणी यांवर नंतरच्या काळातील खडकांचे स्तर साचलेले दिसतात. खंडाचा पूर्वेकडील भाग हा ह्या ढालीचीच उपवृद्धी दिसतो. ६० ते २० कोटी वर्षांच्या दरम्यानच्या पुराजीव काळात टास्मान विस्तीर्ण अभिनतीने खंडाचे पूर्वेकडील भाग बनले आणि २० कोटी वर्षांपूर्वी मध्यजीव काळात पूर्व-मध्य द्रोणी तयार झाली; त्यामुळे अभिनतीचे घडीचे पर्वत व पश्चिमेकडील कँब्रियन-पूर्व खडकांची ढाल ह्यांमध्ये समुद्र व सरोवरे निर्माण झाली.
ढाल प्रदेशात आर्कियनयुगातील गाळाचे खडक, लाव्हारसाचे थर व अग्निजन्य खडकांचे नीस, शिस्ट वगैरे प्रकार आहेत. स्लेट, क्वार्टझाइट, ग्रीन स्टोन इ. खडक पश्चिम भागात सापडतात. लोअर प्रोटिरोझोइक काळातील वालुकाश्म, ग्रेवॅक, स्लेट व चुनखडीचे खडक नॉर्दर्न टेरिटरी, पश्चिम क्वीन्सलँड, दक्षिण व पश्चिम ऑस्ट्रेलियात आढळतात. नॉर्दर्न टेरिटरी व वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील अपर प्रोटिरोझोइक खडकांमध्ये बदल न झालेले गाळाचे खडक व लाव्हारसाचे थर आढळतात.

साउथ ऑस्ट्रेलियात अ‍ॅडिलेड अभिनतीमध्ये वालुकाश्म, ग्रेवॅक, डोलोमाईट व रक्तवर्णी खडक (लोहधातुक खनिजे) हे अपर प्रोटिरोझोइक खडक आढळतात. कँब्रियन-पूर्व ढालीच्या खडकांत खनिज संपत्ती विपुल आहे. ऑस्ट्रेलियात सोने, शिसे, जस्त, लोह व युरेनियम ह्यांचे भरपूर उत्पादन याच खडकांतून मिळू शकले. अपर प्रोटिरोझोइक खडकांत थोड्या प्रमाणात युरेनियम (नॉर्दर्न टेरिटरी) मिळण्याची शक्यता आहे.

पर्मियन काळात ऑस्ट्रेलिया खंडाचे दुसऱ्यांदा हिमाच्छादन झाले व मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचे निक्षेप तयार झाले. सोने, कथील, तांबे, चांदी यांचेही निक्षेप पूर्व ऑस्ट्रेलियात तयार झाले. याच प्रदेशात बोवेन व सिडनी द्रोणींमध्ये मोठ्या प्रमाणात बिट्यूमिनस कोळशाचे प्रचंड साठे तयार झाले. टास्मन अभिनतीमध्ये तेलसाठ्याची शक्यता निर्माण झाली. क्वीन्सलँड, व्हिक्टोरिया, टास्मनिया व साउथ ऑस्ट्रेलिया ह्या भागांत बिट्यूमिनस कोळशाचे प्रचंड निक्षेप, तर ग्रेट आर्टेशियन द्रोणीप्रदेशात वालुकाश्मांचे निक्षेप तयार झाले.

व्हिक्टोरियात लिग्नाइटचे प्रचंड निक्षेप आहेत. राज्यातील बहुतेक विद्युतशक्ती व घन इंधन त्यांपासूनच तयार होते. सोने व कथील यांचे उत्पादन होते. तृतीयक काळातील जांभ्या दगडाच्या मातीमुळे येथे बॉक्साइटचेही निक्षेप तयार झाले आहेत. क्वीन्सलँडच्या दक्षिणेकडील भागात व न्यू साउथ वेल्सच्या उत्तर भागात चतुर्थक युगात रुटाइल, झिर्‌कॉन व इल्मेनाइट ही खनिजे तयार झाली.

काही शास्त्रज्ञांच्या मते पुरातनकाळी ऑस्ट्रेलिया खंड गोंडवनभूमीचा भाग असून दक्षिण अमेरिका, भारत व आफ्रिका ह्यांना जोडलेले होते; खंडविप्लवामुळे वरील सर्व प्रदेश वेगवेगळे झाले असावेत. जगातील इतर खंडांप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये आल्प्स पर्वतसदृश संरचना व उंची असलेली पर्वतराजी नाही. पूर्वेकडील ४८० किमी. लांबीच्या प्रदेशात मुख्य गिरिभूमी आढळते; तीमध्ये मौंट कॉझिस्को हे अत्युच्च शिखर (२,२३३.५ मी.) असून इतर फारच थोडी शिखरे १,८३० मी.हून उंच आढळतात. या गिरिभूमीमध्ये विच्छिन्न पठारे आहेत; त्यांमध्ये बरेच उच्च समतलप्रदेश असून ते अनेक नद्यांच्या घळ्यांनी तुटलेले आहेत. पूर्वेकडील गिरिभूमी उत्तरेकडे २८० मी. व दक्षिणेकडे ६०० मी. उंच असून न्यू साउथ वेल्स व पूर्व व्हिक्टोरियामध्ये ती ६०० मी. ते १,८३० मी. पर्यंत उंच गेलेली आहे.

ही जटिल पर्वतराजी खंडाचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पाडते, म्हणून हिला 'ग्रेट डिव्हायडिंग रेंज' म्हणतात. या पर्वतराजीला 'ऑस्ट्रेलियन आल्प्स', 'न्यू इंग्लंड रेंज', 'लिव्हरपूल रेंज' अशीही नावे आहेत. गिरिभूमीचे पश्चिमेकडील उतार हे अंतर्भागातील मैदानी प्रदेशापर्यंत जातात व ते पुढे साउथ ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स व मौंट लॉफ्टी पर्वतश्रेणीपर्यंत व पुढे वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील मौंट इझा व क्लॉनकरी या कमी उंचीच्या पर्वतांपर्यंत पसरलेले आढळून येतात.

तृतीयक युगात घडून आलेल्या पृथ्वीच्या उलथापालथीमुळे आल्प्स, हिमालय, अमेरिकन कॉर्डिलेरा व ॲटलास ह्यांसारख्यापर्वतश्रेणी अस्तित्वात आल्या, तरी ह्या उलथापालथीचा धक्का ऑस्ट्रेलिया खंडाला पोचला नाही. ऑस्ट्रेलियातील पर्वतांचे हे स्वरुप प्राचीन वलीपर्वतांप्रमाणे आहे.

हे वलीपर्वत खाली दबले गेले, पुन्हा वरती आले, वक्रित व भ्रंशित झाले. ऑस्ट्रेलियाच्या भूदृश्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे विस्तीर्ण मैदाने व पठारे ही होत. ऑस्ट्रेलिया खंडाचा मोठा भाग कमी उंचीचा व पुष्कळ प्रमाणात धुपलेल्या मॅकडोनल व मसग्रेव्ह पर्वतराजींनी व्यापलेला आहे; परंतु गिब्सन, ग्रेट व्हिक्टोरिया, ग्रेट सँडी व सिंप्सन या वाळवंटासारख्या प्रदेशांत घन खडक वालुकागिरींनी झाकलेले आहेत. या विस्तीर्ण प्रदेशातील कोणत्याही भागाची उंची ६०० मी. पेक्षा अधिक नाही.

 


उत्तर लिहिले · 6/1/2022
कर्म · 121765
0

ऑस्ट्रेलिया खंडात एकूण १४ देश आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

  • ऑस्ट्रेलिया
  • फिजी
  • किरिबाटी
  • मार्शल बेटे
  • मायक्रोनेशिया
  • नौरू
  • न्यूझीलंड
  • पलाऊ
  • पापुआ न्यू गिनी
  • सामोआ
  • Solomon Islands (सोलोमन बेटे)
  • टोंगा
  • Tuvalu (तुवालू)
  • वानुआतू

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5220

Related Questions

सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?
15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आतापर्यंतच्या क्रमवारीनुसार प्रभारी पंतप्रधानांची नावे लिहा?
मानवाची निर्मिती प्रथम कुठल्या देशात झाली, परंतु आजच्या मानवाच्या मेंदूचे वजन किती?
१५ ऑगस्ट १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आतापर्यंतचे क्रमवारीनुसार प्रभारी सहीत पंतप्रधानांची नावे लिहा?
मी शाळेमध्ये शिकण्यासाठी जातो, त्यामुळे माझा देश शिक्षित होईल, आणि त्यामुळे माझ्या देशाचा विकास होईल?
मी शाळेमध्ये शिकण्यासाठी जातो, तेव्हा माझा देश शिक्षित होईल, त्यामुळे माझ्या देशाचा विकास होईल?
मानवाची निर्मिती प्रथम कुठल्या देशात झाली आणि आजच्या मानवाच्या मेंदूचे वजन किती असते?