भूगोल नैसर्गिक घटना

मृगजळ म्हणजे काय.?

2 उत्तरे
2 answers

मृगजळ म्हणजे काय.?

2
अगदी सोप्या भाषेत मृगजळ म्हणजे "जसं आहे तसं न दिसता वेगळे काहीतरी दिसणं" होय.

आपण एखादी वस्तू पाहतो कारण त्यावर प्रकाश किरणं पडतात म्हणुन आणि किरणं सरळ रेषेत प्रवास करतात म्हणुन ती वस्तू आहे तशी जागेवर हुबेहूब आपल्याला दिसते. पण किरणं वाकडी तिकडी झाली तर ??

मृगजळाची उदाहरणे :

१. दुपारच्या वेळेस उष्णतेमुळे जमीन खुप गरम होते. त्यातुन निघणारी गरम हवा वातावरणात असलेल्या हवेत मिसळते. वातावरणातील हवा कमी उष्णतेची असल्यामुळे त्यातुन जाणारी किरणं रिफ्रॕक्ट वाकडीतिकडी होतात. त्यामुळे आपण पाहिले की आपल्याला ते पाण्याचा पृष्ठभागासारखे दिसते. हळहळ करतांना दिसते.. ते मृगजळ असतं.

२. असं स्टोलवर समोसा बनतांना शेगडीवर पण हालचाल दिसते जी उष्णतेमुळे होते. ते पण मृगजळ झालं. ते खरतर नाही पण आपल्याला दिसतयं..

३. वाळवंटात आपण भटकून गेलो. खुप खुप भुक लागली आहे आणि आपण पाण्याचा कण शोधत आहोत. त्यावेळेस आपलं डोकं मेंदू काम करणे बंद करुन देतो. आपल्याला आभास व्हायला लागतात की ते समोर पलिकडे नारळाचे झाड आहे पाण्याचा तलाव आहे ते ही मृगजळचं झालं.

४. आपण आत्ता आलेला जोन अब्राहीमचा पोखरण वरिल "परमाणु" चित्रपट पाहिलाय का ?? त्यात दाखवलं आहे कसं भारताने अमेरिकेच्या उपग्रहांना न कळू देता न्युक्लिअर टेस्ट केली होती. उपग्रहांना नेहमी जसं आहे तसचं दाखवून भारताने ती टेस्ट केली होती. उपग्रहांसाठी पण ते एक मृगजळ झालं.

मृगजळ अर्थात मिराज म्हणजे "जैसा दिखता है वैसा हमेशा होता नहीं है असं समजा"..
उत्तर लिहिले · 4/1/2022
कर्म · 121765
0

मृगजळ म्हणजे दूरवर पाणी असल्याचा केवळ भास होणे.

स्पष्टीकरण:

  • जमिनीवरून ठराविक उंचीवरच्या हवेपेक्षा जमिनीलगतची हवा अधिक तापलेली असते.
  • तापलेल्या हवेचा निर्देशांक थंड हवेपेक्षा कमी असतो.
  • त्यामुळे दूरच्या वस्तूपासून येणारे प्रकाशकिरण जमिनीजवळ येताना सतत विरल हवेतून घन हवेत शिरल्यामुळे अधिकाधिक वाकतात.
  • जेव्हा हे किरण आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा ते जमिनीवरून येत आहेत असे वाटते.
  • त्यामुळे दूरवर पाणी साचल्याचा भास होतो, यालाच मृगजळ म्हणतात.

हे विशेषतः वाळवंटी प्रदेशात किंवा उन्हाळ्यात डांबरी सडकेवर दिसते.

स्रोत: विकासपीडिया

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

असे अचानक ढग गडगडले याचा आशय काय?
भरती म्हणजे काय? स्रोत स्पष्ट कराल का?
उजाडल्यावर निसर्गात कोण कोणत्या घटना घडणार आहेत?
चकवा म्हणजे काय?
हिवाळ्यात गवतावर दवबिंदू का जमा होतात?
भरती म्हणजे काय?
वीज जमिनीवर कशी पडते?