घर
                
                
                    बांधकाम
                
                
                    पाऊस
                
                
                    आवाज 
                
            
            पावसाळ्यात छतावरील पत्र्यांचा खूप आवाज येतो. जसा पाऊस वाढेल तसा आवाज वाढतो. यावर काही उपाय करू शकतो का?
2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        पावसाळ्यात छतावरील पत्र्यांचा खूप आवाज येतो. जसा पाऊस वाढेल तसा आवाज वाढतो. यावर काही उपाय करू शकतो का?
            2
        
        
            Answer link
        
        आवाज कां येतो हे सांगतो, त्यावरुन पर्याय काय हे कळेल.
        आघात (Impulse):- पाण्याचा थेंब पत्र्यावर ज्या क्षणी पडतो त्याचक्षणी त्याची गती बदलते आणि दिशाबदल होतो, ज्याकारणांने पत्र्यावर आघात होतो. सहाजिकच पत्रा थोडासा वाकतो आणि थरथरतो. हे थरथरणे म्हणजे "आवाजाची" उत्पत्ती.
आघात कमी कसा करता येईल?
पत्रा पुर्ण 'आडवा' असेल तर जास्तीतजास्त आघात होतो. पत्र्याचा 'उतार' (slope) वाढविला की आघाताची तिव्रता कमी, आवाज कमी. पत्रा जितका जाड तितके त्याचे थरथरणे कमी. अँकरींग स्क्रू/बोल्टचे (j bolt) पिच (pitch) कमी ठेवण्यानेही फायदा होईल.

चित्रसंदर्भ: आंतरजाल
थोडक्यात सांंगायचे तर हे थोडं खर्चिक प्रकरण आहे.
अलिकडे temporary शेडकरता वगैरे किंमत कमी ठेवण्यासाठी पत्र्याचा corrugated पॅटर्न च्या ऐवजी 'semi corrugated' पॅटर्न वापरण्याकडे आणि कमी उतार ठेवण्याकडे कल संभवतो.
ता.क.: वार्यातही ह्या पत्र्यांचा फडफडाट होतो तो वेगळाच.😊😅. पत्रे घालुन झाले असतील तर एक जुगाड 😅 सुचवितो: प्रत्येक पत्र्यावर जड वस्तू जसे की विट, फरशी ठेवून आवाज suppress करता येईल पण इतर समस्याही उदभवण्याची शक्यता आहे.
            0
        
        
            Answer link
        
        पावसाळ्यात छतावरील पत्र्यांचा आवाज कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
 
  
        पावसाळ्यात छतावरील पत्र्यांचा आवाज येतो कारण पत्रे हलके असल्यामुळे पावसाच्या थेंबांच्या आघाताने ते कंप पावतात. यावर काही उपाय:
- 
    पत्र्यांना जाड करणे:
जाड पत्रे वापरल्यास आवाज कमी होतो, कारण ते अधिक स्थिर राहतात.
 - 
    अंडरलेमेंट (Underlayment) चा वापर:
पत्रे लावण्यापूर्वी छतावर अंडरलेमेंटMaterial (उदाहरणार्थ: रबर किंवा तत्सम) लावल्यास आवाज कमी होतो. हे मटेरियल आवाज शोषून घेते.
 - 
    इन्सुलेशन (Insulation):
छताला इन्सुलेशन केल्याने आवाज कमी होतो. यासाठी तुम्ही थर्माकोल (Thermocol) किंवा तत्सम मटेरियल वापरू शकता.
 - 
    पत्र्यांमध्ये गॅप (Gap) कमी करणे:
दोन पत्र्यांमध्ये जास्त गॅप असेल, तरी आवाज येतो. त्यामुळे गॅप कमी करण्याचा प्रयत्न करा.
 - 
    स्क्रू (Screw) व्यवस्थित लावणे:
पत्रे व्यवस्थित स्क्रूने फिट (fit) करणे आवश्यक आहे. लूज (loose) पत्र्यांमुळे आवाज येतो.
 
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही छतावरील पत्र्यांचा आवाज कमी करू शकता.