भूगोल हवामान

वातावरणाचे किती प्रकार पडतात?

2 उत्तरे
2 answers

वातावरणाचे किती प्रकार पडतात?

1

 



वातावरणाचे थर -

वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते...

👉 वातावरणाचे मुख्य थर (प्रकार)

🔸तपांबर -भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर.याची सरासरी जाडी ११ किमी.या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात.पाऊस,वारे,ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात...

🔸तापस्तधी-तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय.उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते...

🔸स्थितांबर-तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय.या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण नसतात व हवा शुष्क असते...

🔸स्थितस्तब्धी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तब्धी होय.या थरातील तापमान स्थिर असते.या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो.हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो...

🔸मध्यांबर-स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय.या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते...

🔸मध्यस्तब्धी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तब्धी होय...

🔸दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय.या थरात उंचीनुसार तापमान वाढते...

🔸आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे.या थरात उंचीनुसार तापमान वाढते.या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात...

🔸बाह्यांबर - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांबर होय.भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे.या थरातील विविध वायूंचे अणू,रेणू,पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात..


उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121765
0

वातावरणाचे मुख्यत्वे ५ प्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे:

  1. क्षोभमंडल (Troposphere): हा वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे. याची उंची भूभागावर सुमारे ८ किलोमीटर तर विषुववृत्तावर १८ किलोमीटर असते. याच थरात हवामानातील बदल, ढग, पाऊस, वादळे येतात.
  2. स्थितांबर (Stratosphere): हा थर क्षोभमंडलाच्या वर असतो. ओझोन वायूचा थर याच भागात असल्याने अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण होते.
  3. मध्यमंडल (Mesosphere): हा थर स्थितांबराच्या वर असून येथे उंचीनुसार तापमान घटते.
  4. आयनांबर (Thermosphere): या थरात विद्युतभारित कण असल्याने বেতার लहरी परावर्तित होतात आणि संपर्क (communication) साधता येतो.
  5. बाह्यमंडल (Exosphere): हा वातावरणाचा सर्वात बाहेरील थर आहे. हा अतिशय विरळ असतो आणि हळूहळू अंतराळात विलीन होतो.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1020

Related Questions

हवेतील बाष्पाचे संघनन होऊन काय तयार होते?
हिमाल‌याच्या क्षेत्रात कोनत्या स्वरूपाचा पाऊस पढ़ता ?
हिमालय पर्वताच्या शिखरावर सतत बर्फ का असतो?
भारत व ब्राझील यांचे स्थान, विस्तार व हवामान, तापमान, पर्जन्यमान या घटकांमध्ये होणारे देश आणि दिशानुसार बदल विश्वकोश किंवा इंटरनेटचा वापर करून सांगा?
थंडी केव्हा कमी होत जायची?
आपल्या देशातील मुख्य ऋतू कोणते आहेत?
ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात?