मराठा साम्राज्य इतिहास

निजामशाहीचा पाडाव केव्हा केला?

2 उत्तरे
2 answers

निजामशाहीचा पाडाव केव्हा केला?

2
इतिहास अभ्यास करत असताना आपण बऱ्याच वेळा १२ मावळ बद्दल ऐकतो. पण अनेकदा इतिहास अभ्यासकांना असा प्रश्न पडतो की, स्वराज्यातील ही १२ मावळे कोणती ? १२ मावळचा खरा इतिहास काय ? तर पाहुयात संपूर्ण माहिती.

"उत्तरेस राजमाची व चाकण येथून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर आणि अंबेडखिंड खांबटकीचा घाट येथून पुण्याजवळचा या संपूर्ण प्रदेशाच्या विस्ताराला एकत्रितपणे '१२ मावळ' म्हणतात."

पण आता इथे पुन्हा आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो कि छत्रपती शिवाजी महाराज आणि या १२ मावळ चा नेमका सबंध तरी काय ? तो कसा आणि केव्हा आला ? हेही ऐतिहासिकदृष्ट्या तितकेच महत्वाचे.

इ. स. १६३५ च्या अखेरीस, मोगलशाही आणि आदिलशाही यांनी एकत्रित मोहीम काढत निजामशाहीचा संपूर्ण पाडाव केला. यानंतर या जिंकलेल्या निजामशाही मुलुखाची या दोन्ही सत्ताधीशांनी वाटणी करून घेतली. हा तह १६३६ झाला. या तहानुसार १२ मावळ आदिलशाही सरदार रणदुल्लाखानास जहागिर म्हणून मिळाले. या जहागिरीचा कारभार चालवत असताना शहाजीराजे रणदुल्लाखान यांस सैन्यानिशी मदत करत असत. या सैन्याच्या खर्चासाठी जो सरंजाम दिला जात असे तो या बारा मावळ च्या महसूलातून दिला जाई. या जहागिरीचा सरंजाम वसुल करण्यासाठी शहाजीराजेंचा मुखत्यार आणि रणदुल्लाखान यांचा सुभेदार असलेल्या दादोजी कोंडदेव या मात्तबर आसामीची नेमणूक झाली. इ. स. १६४२ साली, शहाजीराजांनी आपली पुण्याची जहागिरी शिवाजीराजांकडे सोपवली. त्यानंतरच्या काही वर्षांत, १६४७ मध्ये दादोजींचा मृत्यू होताच बारा मावळची जबाबदारी शिवाजीराजांकडे आपोआप आली.


हेच ते बारा मावळ जेथून स्वराज्याच्या विस्ताराची घोडदौड सुरु झाली.

१) अंदरमावळ

२) नाणेमावळ

३) पवनमावळ

4) घोटणमावळ

५) पौंडखोरे

६) मोसेमावळ

७) मुठेमावळ

८) गुंजणमावळ

९) बेळवंडमावळ

१०) भोरखोरे

११) शिवतरखोरे

१२) हिरडसमावळ

♂Follow us on

🚩शिवनिती🚩

Shivneeti
उत्तर लिहिले · 20/12/2021
कर्म · 121765
0

इ.स. १६३६ मध्ये मुघलांनी निजामशाहीचा पाडाव केला.

अधिक माहिती:

  • निजामशाहीची स्थापना १५ व्या दशकात झाली होती.
  • अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी होती.
  • मुघलांनी आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्या मदतीने निजामशाही जिंकली.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2880

Related Questions

वंशावळ तज्ञ कोठे मिळतील?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड किती वेळेस आणि कुणी जाळला?
अरुण गवळीला डॅडी हे नाव कसे पडले?
महात्मा फुले माहिती?
Hadappa Sanskriti Harappa Sanskriti konatya Kala til hoti?
हडप्पा संस्कृती कोणत्या काळातील होती?
गरीब निवाजी नंदा संस्था कोण होती?