2 उत्तरे
2 answers

तितिक्षा म्हणजे काय?

3
तितिक्षा म्हणजे सारे सोसण्याचे बळ होय.शमादमादी जे सहा गुण आहेत( शम,दम,श्रध्दा,उपशम ,समाधान आणी तितिक्षा).मानवाचे शरीर जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्याला अनेक सुख दुःखाच्या परिस्थीतुन जावे लागते ते सगळं मुकाट सहन करणे.गुलाबाची फुले हवीत तर एखादा काटा हा टोचणारच.पावसाळा पाहिजे तर मे महिन्याची उष्णता सहन करावीच लागेल.न कुरकुर करता आनंदाने सहन करणे म्हणजे तितिक्षा होय.

अध्यात्मिक ,अधिभौतिक आणि आधिदैविक असे त्रिविध ताप म्हणजे दु:खे ही प्रत्येक मानवाला भोगावीच लागतात. सर्व सामान्य माणुस हा सुखाला कवटाळतो,दू:खाला कंटाळतो.खरया साधकात तितिक्षा ही असतेच. दुसऱ्या भाषेत तितिक्षा म्हणजे स्थितप्रज्ञता. नाईलाजाने दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा नाही. ज्ञानेश्वरादी चार भावंडे लहानपणापासून त्यांच्या निर्वाणा पर्यंत कशी जगली हे तितिक्षेचे मोठे उदाहरण आहे. सुखदुःखात स्थिर राहणारी अशी ही संत मंडळी त्यांच्या अंगी तितिक्षा असते.

आत्मानंद किंवा अत्मवृत्ती त्यांच्यात भरपूर असते.सर्व सामान्यांना तितिक्षा कळणार नाही.तितिक्षा ही फक्त संत,ऋषी मुनी या मध्ये असते.
उत्तर लिहिले · 17/12/2021
कर्म · 121765
0

तितिक्षा म्हणजे दुःख, Obstacles आणि अडचणी सहन करण्याची क्षमता.

अधिक माहिती:

  • तितिक्षा म्हणजे सहनशीलता, ক্ষমাशीलता, आणि प्रतिकूल परिस्थितीत खंबीर राहण्याची शक्ती.
  • हे एक आंतरिक गुण आहे, जो आपल्याला शांत आणि स्थिर राहण्यास मदत करतो, खासकरून जेव्हा आपल्या जीवनात कठीण प्रसंग येतात.
  • तितिक्षा आपल्याला नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यास मदत करते.

तितिक्षेचे महत्त्व:

  • तितिक्षा आपल्याला जीवनातील आव्हानांना धैर्याने तोंड देण्यास मदत करते.
  • हे आपल्याला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते.
  • तितिक्षा आपल्याला इतरांशी अधिक समजूतदारपणे वागण्यास प्रवृत्त करते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5240

Related Questions

तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत?
उद्बोधन, प्रबोधन, कीर्तन, प्रवचन, टीकाटिप्पणी, निंदानालस्ती, वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे. कथा, व्यथा, संवेदना आहेत. महाभारत, रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव का बदलला नाही? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते? पैसा, सत्ता, अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे.
सण सोहळे, उपास, व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार, पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढवला आहे, त्यात भर म्हणून वाढदिवस, मुंज, बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले, यात्रा, जत्रा, रौप्य, अमृत, हिरक महोत्सव साजरे होतात. हे चित्र प्रेमाभक्तीने निर्मळ, निरंकुश, निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय?
वृत्ती म्हणजे काय?
पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, त्याची विचार पद्धती याचे दर्शन होते, हे विधान साने गुरुजींच्या 'सुंदर पत्रे' या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, त्याची विचार पद्धती याचे दर्शन होते, हे विधान साने गुरुजींच्या सुंदर पत्रांमधील लेखकावरून स्पष्ट करा.
पाऊस आला मोठा या गौरी देशपांडे यांच्या कथेतील स्त्री स्वभावाचे दर्शन घडवा?