2 उत्तरे
2
answers
माणसांचे मन चंचल का असते?
1
Answer link
कारण जे अस्तित्वात च नाही त्याची त्याची व्याख्या प्रत्येकाच्या भाषेत वेगळी असणार म्हणजे मन हे अदृश्य असले तरी माणसाच्या भावना जपणारा व भावनांचा साठा करणारा एक चंचल अवयव म्हणून स्वतःचे स्वतःला त्याची भाषा कळण्याइतपत व्यक्ती जागृत असावी लागते कारण मनावर ताबा मिळवणारा व्यक्ती शरीराच्या सर्व अवयवावर नियंत्रण ठेऊ शकतो म्हणून तर दुसऱ्याच्या मनाचा अभ्यास करणारा व्यक्ती मानसशाश्रीय तज्ञ म्हणून ओळखले जातात,
मन वाऱ्याप्रमाणे आहे जिकडे रस्ता मिळेल तिकडे वहाते तसे मन भरकटत असते आज येथे तर क्षणात कोठे ,मनासारखे न दिसणारे इंद्रिय दुसरे कोणते नाही म्हणून जो तो ज्याच्या त्याच्या परीने मनाची व्याख्या करतो,
माणसाचे मनाशी नाते जुळले की माणुस नावाचा प्राणी सजीव होतो चंचल मनाचा कोणी वाली नाही हेच खरे पण जसे माणसाला सुदंर , निर्मळ घर विचार बदलायला भाग पाडतें तसे माणसाच्या कर्मावर मनातले विचार बदलतात , म्हणून तर त्याला चंचल म्हणतात,
ज्याने समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखण्यावर स्वतःला सिद्ध केलं त्याना सिद्ध पुरुष म्हणावे असे मला वाटते , काही वेळेस अनेक लोकं मनातली भावना बोलून दाखवतात तर काही ती कृतीतुन व्यक्त होताना दिसते तर काहींच्या भावना डोळ्यातून कळतात, म्हणून तर माणसाचा जीवनाचा शिल्पकार मनाला म्हणावे असे माझे मत आहे आणि तें खरे असावे,
या जगात असे अनेक लोकं आहेत सल्ला दुसऱ्यांना विचारतात पण कामं स्वतःच्या मनाने करतात आणि तें कामं तें चुटकी सरशी हातावेगळे करतात कारण चार माणसांच्या अनुभवातून त्यानां आणखी मार्ग मोकळे होतात पण त्यासाठी स्वतःचा स्वतःच्या मनावर गाढ विश्वास हवा, मन चंचल आहे कारण देवाने माणसाला बनवले पण अनेक गोष्टी त्याच्या कर्मावर सोडल्या, निसर्गात हवा आणि शरीरात मन या समान गोष्टी आहेत पण त्या अदृश्य असल्या तरी त्याची जाणीव करून देणाऱ्या आहेत ,
सांगायचं तात्पर्य इतकंच शरीर व त्याचे अवयव यावर नियंत्रण ठरवणारी अदृश्य शक्ती म्हणजे मन असे मला वाटते बाकी लोकांना वेगळे वाटू शकतें मान्य आहे 🙏🏼
0
Answer link
माणसाचे मन चंचल असण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- एकाग्रतेचा अभाव: आजच्या धावपळीच्या जीवनात आणि माहितीच्या सतत Bombarding मुळे माणसाला एकाग्रता साधणे कठीण झाले आहे. त्यामुळे मन एका गोष्टीवर स्थिर न राहता सतत इकडे-तिकडे भटकत असते.
- विचारांची सतत गर्दी: मानवी मनात सतत विचार येत असतात. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यांमध्ये विचार चक्र फिरत राहते. त्यामुळे मन एकाग्र होऊ शकत नाही.
- भावना आणि इच्छा: माणसाच्या मनात अनेक प्रकारच्या भावना आणि इच्छा असतात. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मन सतत प्रयत्नशील असते, त्यामुळे ते चंचल बनते.
- बाह्य उत्तेजना: आजकाल Social Media, Entertainment आणि इतर अनेक गोष्टींच्या माध्यमातून सतत नवीन उत्तेजना मिळत असतात. त्यामुळे मन एका गोष्टीवर स्थिर न राहता सतत नवीन गोष्टींच्या शोधात असते.
- तणाव आणि चिंता: जीवनातील तणाव, चिंता आणि असुरक्षितता यामुळे मन अशांत होते आणि ते चंचल बनते.
या Psychological कारणांव्यतिरिक्त, काही Spiritual आणि Philosophical विचार देखील आहेत जे मनाच्या चंचलतेबद्दल सांगतात.
उपाय:
- योगा आणि Meditation: नियमित योगा आणि ध्यान केल्याने मनाला एकाग्रता साधण्यास मदत होते.
- श्वासावर लक्ष केंद्रित करणे: श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते.
- वर्तमान क्षणात जगणे: भूतकाळ आणि भविष्याचा विचार न करता वर्तमान क्षणात जगण्याचा प्रयत्न करणे.
मन चंचल असणे ही एक नैसर्गिक बाब आहे, पण त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.