पूजा धार्मिक आख्यायिका धर्म

शंकराची पूजा करताना आपण त्याच्या मूर्तीऐवजी लिंगाची पूजा का करतो? यामागे काही आख्यायिका आहे का?

2 उत्तरे
2 answers

शंकराची पूजा करताना आपण त्याच्या मूर्तीऐवजी लिंगाची पूजा का करतो? यामागे काही आख्यायिका आहे का?

1
होय. आख्यायिका आहेत, अनेकांनी येथे दिल्या आहे. सर्व आख्याइका छान आहेत; आवडल्या.

ह्या बहुसंख्य आख्यायिका ह्या योनिपूजा, लिंगपूजा अस्तीत्वात आल्यानंतर शेकडो, कदाचित हजारो वर्षांनंतर रचल्या गेल्या.

आता थोडा चाकोरीबाहेरचा विषय. बहुतेकांना न पटणारा. न आवडणारा.

लिंगपूजेत फार खोल अर्थ दडलेला आहे. तिचा इतिहास माणूस जंगली अवस्था टाकून शेती करायला लागला तितका जुना आहे.

अनादि काळापासून जगातील सर्व संस्कृतीत अगदी आदिवासीपासून ते वैचारिक दृष्ट्या खूप पुढारलेल्या संस्कृतिपर्यन्त लिंग व योनि पूजा अस्तीत्वात आहेत. आपल्या हिंदू धर्मातही आहेत.

जुन्या काळी ह्या पृथ्वीवर जीवनसंघर्षात टिकून राहायचे तर, संख्याबळ हवे. रोगाची एक साथ आली की गावेच्या गावे उजाड होत. तेच युद्ध झाले तर होत असे. लढायला, शेतात कामे करायला माणसे हवीत. अगदी काल परवा पर्यन्त आपल्याकडेही अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद देण्याच्या प्रघात होता. नवीन जीव ज्यातून जन्माला येतो, ते अवयव अश्लील नव्हेत. लैंगिक संबंध ही घाणेरडी क्रिया नव्हे; हे तत्व त्यामागे आहे. आपल्याकडे गर्भाधान हा पवित्र धार्मिक विधी मानला गेला, तो त्यामुळेच. मूर्तिपूजा अस्तित्वात येण्याच्या खूप आधीपासून जगभर लिंगपूजा योनिपूजा अस्तित्वात आहेत. जगभर, फक्त हिंदूत नव्हे.

मी स्वतः शैव आहे. त्यामुळे मला मोकळेपणाने लिहायला हरकत नाही. सर्व देवांचे स्वरूप कालौघात बदलले. मूळ शंकर, शिव, हा आपण मानतो तसा कुणी मानव रूप धारण केलेला कैलासावर राहणारा, कंठात विष धारण करणारा, गळ्यात नाग असणारा असा कुणी देव नव्हता. ते मूळ शिवरूप आहे. शंकर, म्हणजेही शम+कर म्हणजेच रक्षण करणारा, कल्याणकर्ता देव आहे. शिव व शंकर हे एकच दैवत. हे कल्याणकारी दैवत शिवतत्व, ते निर्मितीही करते. लिंगपूजा हे त्याचेच प्रतीक. लिंगपूजा हे fertility myth आहे. व्यापक अर्थाने ही fertility माणसाला मुले होणे, गायीगुरांची खिल्लारे जन्माला येणे, इतकेच नाही तर शेतात उत्तम पीक येणे हे सर्व व्यापून राहिले आहे. आणि हा शिव तुमच्या आमच्या मनात असतो. आपण प्रतिकात्मक लिंगपूजा करतो म्हणजे ह्या निर्मितिक्षमतेची उपासना करतो.

ह्या ठिकाणी माझे मत सांगतो. शिवलिंग हा समास ९९.९ टक्के लोक शिवाचे लिंग, म्हणजे शंकर ह्या देवाचे लिंग असा षष्ठी तत्पुरुष विग्रह करतात. त्याऐवजी तो शिव असलेले, म्हणजे, पवित्र लिंग, असा कर्मधारय समास करावा. म्हणजे शिव हे लिंगाचे विशेषण झाले. शिव असे लिंग, पवित्र असलेले लिंग. तसेच शाळुंका म्हणजे अमुक एका देवीची योनि नव्हे. पवित्र अशी योनि. हयातून स्थापन झालेला गर्भ हा पवित्र मानला जातो.

हल्ली जगभर पुराणांचा अभ्यास विद्यापीठ पातळीवर चालू आहे. हे कळले की अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा हाती घेतलेले सरसावतात. (अंनिस बद्दल मी म्हणत नाही, सर्व साधारण तशी मते असणारे लोक). हा अभ्यास धार्मिक दृष्टीतून नसून सांस्कृतिक दृष्टीतून आहे, आणि तो जगभर चालू आहे.

वर जे मी संगितले ते, त्या भाषेत (Comparative mythology)च्या भाषेत, creation myth, fertility myth मानले जाते. शिव नंदी बाळगतो, हेही शेती व गुरांचे खिल्लार ह्या अर्थाने fertility myth आहे.
उत्तर लिहिले · 13/12/2021
कर्म · 121765
0

शंकराची पूजा करताना मूर्तीऐवजी लिंगाची पूजा करण्यामागे अनेक कारणे आणि आख्यायिका आहेत. त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. अमूर्त स्वरूप (Abstract Form):

    शिवलिंग हे शंकराच्या अमूर्त स्वरूपाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात, देवतेला निराकार रूपात पूजणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. शिवलिंग हे देवाची ऊर्जा आणि शक्ती दर्शवते, जी कोणत्याही आकारात बांधलेली नाही.

  2. निर्मिती आणि विनाश (Creation and Destruction):

    शिवलिंग हे निर्मिती आणि विनाशाचे प्रतीक आहे. लिंग म्हणजे सृजनशक्ती आणि योनी म्हणजे ऊर्जा. या दोघांच्या संयोगानेच जग चालते, असे मानले जाते. त्यामुळे शिवलिंग हे जीवनचक्राचे प्रतीक आहे.

  3. आख्यायिका (Mythology):

    लिंग पुराणानुसार, एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण, यावरून वाद झाला. तेव्हा त्यांच्यासमोर एक विशाल आणि अंतहीन अग्निस्तंभ प्रकट झाला. त्या स्तंभाचा अंत शोधण्यास सांगितले. ब्रह्मा आणि विष्णू दोघांनाही त्याचा अंत लागला नाही. तेव्हा त्यांना समजले की ही शंकराची शक्ती आहे, त्यामुळे त्यांनी शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली.

  4. ऊर्जा आणि ध्यान (Energy and Meditation):

    शिवलिंग हे ऊर्जा केंद्र मानले जाते. असे मानले जाते की शिवलिंगाजवळ ध्यान केल्याने आध्यात्मिक ऊर्जा जागृत होते आणि चित्त शांत होते.

  5. प्राचीन परंपरा (Ancient Tradition):

    शिवलिंगाची पूजा ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीमध्येही लिंगाच्या पूजेचे अवशेष सापडले आहेत, जे हे दर्शवतात की ही परंपरा फार जुनी आहे.

या कारणांमुळे शंकराची पूजा करताना मूर्तीऐवजी लिंगाला अधिक महत्त्व दिले जाते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1080

Related Questions

खंडोबा पाच पावली का करतात?