शब्दाचा अर्थ मराठी कविता शब्द रसग्रहण साहित्य

कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा: वस्तूंना मन हे नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात?

2 उत्तरे
2 answers

कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा: वस्तूंना मन हे नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात?

1
: 'वस्तू' या कवितेत कवी

द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने

समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने

Chapter 6: वस्तु - कती [Page 22]

-

Xसमजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.

काव्यसौंदर्य : बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगलेवर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.

भाषिक सौंदर्य : मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे.
उत्तर लिहिले · 11/12/2021
कर्म · 121765
0

या ओळींमध्ये कवी म्हणतात, जरी वस्तूंना मन नसेल, म्हणजे त्यांना भावना नसतील, तरी आपण त्यांच्याशी आपुलकीने वागलो, त्यांना मान दिला, तर त्या वस्तूंना खूप आनंद होतो.

भावार्थ:

  • वस्तू निर्जीव असल्या तरी, त्या आपल्या जीवनातील अविभाज्य भाग असतात.
  • आपण त्यांना जतन करतो, त्यांची काळजी घेतो, त्यामुळे त्या वस्तू आणि आपल्यामध्ये एक भावनिक संबंध निर्माण होतो.
  • जेव्हा आपण त्या वस्तूंना मन असल्यासारखे वागतो, तेव्हा त्या वस्तूंनाही आनंद होतो, म्हणजेच त्या अधिक काळ टिकतात आणि आपल्यालाही आनंद देतात.

उदाहरण:

घरातील जुन्या वस्तू, जसे की आई-वडिलांनी वापरलेल्या वस्तू, आपल्याला प्रिय असतात. कारण त्या वस्तूंबरोबर आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. त्या वस्तू जतन करून आपण आपल्या भावना जपत असतो.

संदेश:

या ओळींमधून कवी आपल्याला वस्तूंबरोबर स्नेहपूर्ण संबंध ठेवण्याचा आणि त्यांना मान देण्याचा संदेश देतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1080

Related Questions

खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण काय येईल? धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दुधभात भरवीन?
साहेबराव पाटील या कवितेचा रसग्रहण करा ?
वस्तू कविता रसग्रहण कसे कराल?
बाप या कवितेचे रसग्रहण करा?
तयास म्हणावे का? या कवितेचे रसग्रहण करा.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे (वाटल्याने) त्या वस्तू प्रचंड सुखावतात. काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
सोनू शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला, याच रसग्रहण?