घरगुती उपाय पर्यावरण कचरा व्यवस्थापन

घरगुती पातळीवर शून्य कचरा प्रणाली अमलात आणण्याचे उपक्रम कोणते?

3 उत्तरे
3 answers

घरगुती पातळीवर शून्य कचरा प्रणाली अमलात आणण्याचे उपक्रम कोणते?

2

.घरगुती पातळीवर शून्य कचरा प्रणाली अंमलात आणण्याचे मार्ग

शून्य कचरा ही संकल्पना म्हणजे होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे. सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग बायोगॅस निर्मितीसाठी करणे अजैविक कचरा म्हणजे प्लॅस्टिक आणि टाकाऊ काच यांचा पुनर्वापर करणे.पातळीवर या कचऱ्याची विभागणी खालीलप्रमाणे झाली तर त्याची विल्हेवाट लावणं आणखी सोपं होईल.

ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करणे.

सुक्या कचऱ्यात टाकाऊ कचरा वेगळा करणे आणि पुनर्वापरासाठीचा कचरा वेगळा करणे.

ओला कचऱ्याचा घरीच खत म्हणून वापर करणे.

. घन कचऱ्याची निर्मिती होण्यापासून रोखणे. अतिरिक्त कपडे, वस्तू, इलेक्ट्रिक सामान खरेदी न करणे

आपल्या सभोवताली कचरा होऊ नये याची दक्षता घेणे.

अशा पद्धतीने कचरा व्यवस्थापन घर पातळीवर योग्य प्रकारे झाले तर ही समस्या सोडवणे आणखी सोपे होईल.
:::::::::::'''''::::::::::::::::::::::::::;;:;;;:::::::::::::::::::::::::::
काय आहे शून्य कचरा?

शून्य कचरा म्हणजे कचर्‍याचे संकलन नाही किंवा कचर्‍याची निर्मितीही नाही.मग काय आहे शून्य कचरा‍? चला, जाणून घेऊयात.

उद्दिष्ट

शून्य कचरा प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट हे सेंद्रिय कचरा आणि अजैविक कचर्‍याचे विभाजन करणे हे आहे. सेंद्रिय कचर्‍याचा उपयोग बायोगॅस निर्मितीसाठी करण्यात येतो. त्यामुळे कचर्‍याचे विघटन करण्यासाठी होणार्‍या वाहतुकीचा खर्चाची बचत होते. अजैविक कचर्‍यामध्ये टाकाऊ प्लॅस्टिक आणि टाकाऊ काचेचा समावेश होतो. प्रभाग स्तरावर सर्व प्रकारच्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे हे शून्य कचरा प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे विघटन करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी कचर्‍याच्या वाहतुकीवर आणि त्या अनुषंगाने आवश्यक त्या कर्मचार्‍यांवर होणार्‍या खर्चात बचत होते.

कार्यपद्धती

जनवाणीच्या समूहाने मिटकॉन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटसोबत कात्रजच्या प्रकल्पाला भेट दिली. तेथे त्यांनी कार्यान्वित असलेल्या प्रक्रियेचा अभ्यास करून आवश्यक ती माहिती संकलित केली. त्यानंतर जनवाणी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जनवाणी आणि इतर सहकार्‍यांनी शून्य कचरा प्रकल्प केंद्रासाठीचे धोरण ठरविले.

स्वच्छ सहकारी संस्थेने कचरा वेचणार्‍या व्यक्तींना योग्य प्रशिक्षण दिले. त्यामध्ये सेंद्रिय कचरा आणि प्लॅस्टिक/काच/धातू असलेल्या कचर्‍याचे वर्गीकरण करण्याबाबत कचरा वेचकांना मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय पुनर्निमिती न होणार्‍या कचर्‍याबाबतही माहिती देण्यात आली. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने या कचरा वेचकांना प्रभागांमधील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी नेमले.

अंमलबजावणी

या प्रकल्पात भागीदार असलेल्या कमिन्स संस्थेने नागरिकांचा सहभाग असलेल्या `स्वच्छता मित्र’ या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. कचर्‍याच्या वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी कमिन्सने पपेट शोचे आयोजन केले. जनजागृतीचा हा उपक्रम प्रभावी ठरला.

या सर्व प्रयत्नांनंतरही ज्यावेळी प्रकल्प सर्वप्रथम प्रत्यक्ष कार्यान्वित झाला, त्यावेळी नागरिकांनी कचरा वेचकांना कचर्‍याचे वर्गीकरण करून दिले नाही. नागरिकांच्या वागणुकीमध्ये बदल घडण्यासाठी सातत्याने जनजागृतीचे उपक्रम घेण्याची गरज निर्माण झाली.

अंतिम टप्प्यात ज्यावेळी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली त्यावेळी सामूहिक कचरापेट्या हटविण्यात आल्या. तसेच नागरिकांना कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र पाकिटे देण्यात आली. कचरापेट्या हटविल्याचा परिणाम असा झाला की सर्व कचरा एकत्र करून कचरापेट्यात टाकणार्‍या नागरिकांना घरी येणार्‍या कचरा वेचकांनाकडेच कचरा देणे भाग पडले. दरम्यान सेंद्रिय कचर्‍याला महत्व प्राप्त होण्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी झाली.



सेंद्रिय कचर्‍यावर प्रक्रिया करून कात्रज येथील बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारी वीज शहरातील रस्त्यांवरील दिव्यांसाठी वापरण्यात येते. औद्योगिक भट्टयांमध्ये आवश्यक असणारे इंधन निर्माण करण्याचा प्रयोगही या प्रकल्पामध्ये करण्यात आला.

या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पुणे महानगरपालिकेने आणि जनवाणी यांनी मिळून आयएसओ मॅन्युअल तयार केले. घनकचर्‍यासंदर्भातील भारतातील हे पहिलेच मॅन्युअल ठरले.

कचरा वेचकांना आवश्यक त्या प्रशिक्षणासोबतच पायाभूत सुविधा पुरविण्यात आला. कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी त्यांना अनेक कचरा पेट्या देण्यात आल्या. तसेच त्यांना हातमोजे, रेनकोट, साबण, ढकलगाड्या आणि सायकल रिक्षा पुरविण्यात आले.

कात्रजमधील रहिवाशांना आवश्यक त्या प्रशिक्षणाची गरज आहे. कचर्‍याच्या वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी कमिन्स इंडियामधील स्वयंसेवकांनी मदत केली. तसेच कात्रजमधील रहिवाशांना कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी कचर्‍याचे डबेही देण्यात आले.

 



उत्तर लिहिले · 8/12/2021
कर्म · 121765
0
उत्तर
उत्तर लिहिले · 13/1/2022
कर्म · 0
0

घरगुती पातळीवर शून्य कचरा प्रणाली (Zero Waste System) अमलात आणण्यासाठी अनेक उपक्रम मदत करू शकतात. काही महत्त्वाचे उपक्रम खालीलप्रमाणे आहेत:

  1. कचरा कमी करणे (Reduce):
    • खरेदी करताना पुनर्वापर करता येतील अशा वस्तू खरेदी करा.
    • प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरा.
    • ज्या वस्तूंचे आयुष्यमान जास्त आहे, त्या वस्तू खरेदी करा.
  2. पुनर्वापर (Reuse):
    • जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करा, जसे की बाटल्या, बरण्या, कपडे.
    • पुस्तके, फर्निचर आणि इतर वस्तू दान करा.
  3. पुनर्चक्रण (Recycle):
    • घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करा.
    • प्लास्टिक, कागद, काच आणि धातूंचे पुनर्वापर करा.
  4. कंपोस्ट खत (Composting):
    • घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करा.
    • कंपोस्ट खत झाडांसाठी आणि बागेसाठी वापरा.
  5. जागरूकता आणि शिक्षण (Awareness and Education):
    • शून्य कचरा जीवनशैलीबद्दल माहिती मिळवा आणि इतरांना सांगा.
    • कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करा.
  6. उत्पादनांची निवड (Product Selection):
    • कमी प्लास्टिक असणारी उत्पादने खरेदी करा.
    • नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक उत्पादने वापरा.

हे काही उपक्रम आहेत ज्यांच्या मदतीने आपण घरगुती पातळीवर शून्य कचरा प्रणाली अमलात आणू शकतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2260

Related Questions

प्लास्टिक कचऱ्याची राख झाडांच्या आळ्यात खत म्हणून टाकली तर चालेल का?
घनकचरा व्यवस्थापनाची तत्त्वे काय आहेत?
क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते.?
biodegradable कचरा व अविघटनशील कचरा म्हणजे काय?
लहान मुलांचे जुने कपडे जाळावेत का?
खालीलपैकी कोणती घनकचरा व्यवस्थापनाची पर्यावरणपूरक पद्धत आहे?
घनकचरा म्हणजे काय?