5 उत्तरे
5
answers
भारतीय समाजशास्त्राचा जनक कोण?
3
Answer link
गोविंद सदाशिव घुर्ये हे एक अग्रगण्य भारतीय शैक्षणिक होते जे समाजशास्त्राचे प्राध्यापक होते. 1924 मध्ये, मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून ते दुसरे व्यक्ती बनले आणि त्यांना भारतातील भारतीय समाजशास्त्र आणि समाजशास्त्राचे जनक मानले जाते.
1
Answer link
आधुनिक समाज शास्त्राचे जनक
आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानले जाते
समाजशास्त्र मध्ये सामाजिक संबंधाचा आभ्यास केला जातो व हा आभ्यास करत असताना निरीक्षण , वर्गीकरण , गृहीत कृत्य , पूर्वकथान व निष्कर्ष इत्यादी मार्गाचा अवलंब समाजशास्त्रामध्ये करता येणे शक्य अाहे.असे प्रतिपादन ऑगस्ट कॉम्त यांनी 1828 मध्ये स्पष्ट केले व तेथुनच समाजशात्रीय विचाराची सुरुवात झाली व समाजशात्रीय विचार विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विचारवंतांनी आपले योगदान दिल्याचे दिसून येते. हे विचारवंत आपण खाली पाहूया यात भारतीय विचारवंत देखील आहेत .
विचारवंत
भारतीय विचारवंत संपादन करा
*जी.एस. घुर्यें (12 डिसेंम्बर 1893)
*एम. एन. श्रीनिवास (1916)
*मुजुमदार
*इरावती कर्वे
वरील सर्व विचारवंतांपैकी ऑगस्ट कॉम्त हे समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात.
ऑगस्ट कॉम्त :-
ऑगस्ट कॉम्त यांनी खऱ्या अर्थाने शास्त्रीय दृष्टीकोनातून समाजशास्त्रीय विचारास सुरुवात केली. ऑगस्ट कॉम्तचा जन्म 19 जानेवारी 1798 रोजी झाला. फ्रान्समधील मॉटपेलिअर या शहरात झाला. त्यांचे आई वडील कॅथलिक पंथाचे अनुयायी होते. तर कॉम्त हा कॅथलिक पंथावर टीका करणारा होता. मानावी जीवनचा
विकास घडवून आणण्यासाठी काय करता येईल? याचा विचार करण्यासाठी कॉम्त ने आपले सर्व आयुष्य खर्च केले. या थोर विचारवंतांचे 5 सप्टेंबर 1857 मध्ये निधन झाले. ऑगस्ट कॉम्त यांनी त्यांच्या विहारांची मांडणी खूप छान प्रकारे केली आहे.
ऑगस्ट कॉम्त ने प्रत्यक्षवाद या ग्रंथामध्ये तीन अवस्थेचा सिद्धांत मंडला. या तीन अवस्थेच्या सिद्धांतात त्याने सर्व मानवी समाजातसर्व काळात मानवी बुद्धीच्या विकासाचा आढावा घेतला. यात कॉम्त म्हणतो, मानवी बुद्धीचा विकास, शास्त्राची प्रगती, मानवी समाजाचा विकास या तीन एकामागून एक येणाऱ्या अवस्थेतून झालेला आहे. ती अवस्था काल्पनिक अवस्था, अध्यात्मिक किंवा तात्विक अवस्था, प्रत्यक्षवादी व वैज्ञानीक अवस्था या तीन अवस्था आहेत.
समाजाची रचना:-
कॉम्त म्हणतो, समाज विकासाच्या तीन अवस्था मधे समाज पायावस्था व समाज रचना हि सुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाची असते . काल्पनिक अवस्थेमध्ये राजेशाही आसते व लष्कराचे राज्य असते .राजा हा सर्व ठिकाणी ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार मनाला जातो .ईश्वर हा राजाचा राजा असून त्याच्या इच्छेनुसार सर्व कारभार चालतो. राजाची आज्ञा न मानल्यास त्यांना शिक्षा मिळते व तुलना नैसर्गिक अधिकार नसतात.
तात्विक अवस्थेमध्ये मानवी विचारांची स्थिती तिथेच न थांबता हळू हळू कल्पना अशी येत गेली की, प्रत्येक घटने मागे ईश्वरच असतो असे नाही.काही अमूर्त शक्ती आहेत व त्याच्यामुळे सुद्धा काही विश्वाच्या घडामोडी घडून येतात. या मानवी शक्तीचा विकास झाल्याचे दिसते.
शेवटच्या वैज्ञानिक अवस्थेत समाजातब्बद्ल होतात. समाज उद्योग प्रधान बनतो. अनेक नवनवीन शोध लावले जातात.समाजात बौद्धीक सुधारणा होते व समाज जीवन सुखी व संपन्न होण्यास मदत होते.
कॉम्तचा विज्ञानवादी सिंद्धान्त अतिशय प्रसिद्ध आहे विज्ञानवाद , प्रत्यक्षवाद किंवा शास्त्रीय दृष्टीकोन असेही म्हणतात .कॉम्त विज्ञानवाद कशाला म्हणावे हे सांगताना ती स्वतःच गोंधळून गेलेला दिसतो. मात्र कॉम्त अवैज्ञानिक राहिला अशी त्याच्यावर टीका केली जाते .
कॉम्त विज्ञानवादाचा अर्थ शास्त्रीय शस्त्रविहित अभ्यास पद्धतीने असाे होतो. कॉम्त मानतो जगातील सर्व घडामोडी मग त्या कोणत्याही स्वरूपाचे असो निश्चित असा नैसर्गिक नियमाद्वारे घडवून येत असतात.
कॉम्प्तची सामाजिक स्थित्यात्मक व गत्यात्मकतेच संकल्पना ही आहे. स्थित्यात्मक समाज शास्त्राविषयीचा विचारांमध्ये अपणास व्यवस्थेचा विचार जाणवतो.तर गत्यात्मक समाजशास्त्रात प्रगतीचा विचार मांडला आहे .
कॉम्त म्हणतो की, समाजशास्त्र हे सर्वात शेवटी उदयास आलेलेे शास्त्र आहे व सर्वात शेवंतीची शेंडी फळ हे समाजशास्त्र आहे . असे ही ते म्हणतात.
0
Answer link
भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून गोविंद सदाशिव घुर्ये (G. S. Ghurye) यांना ओळखले जाते.
ते एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी भारतीय समाजाचा सखोल अभ्यास केला.
- त्यांनी भारतातील जात, धर्म, कुटुंब आणि संस्कृती यांसारख्या विषयांवर महत्त्वपूर्ण लेखन केले.
- मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.
- त्यांच्या योगदानाला आदराने आजही स्मरण केले जाते.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
जी. एस. घुर्ये - विकिपीडिया