योगासने ज्योतिष भाग्य

कुंडलीत सौभाग्य योग म्हणजे काय आहे?

2 उत्तरे
2 answers

कुंडलीत सौभाग्य योग म्हणजे काय आहे?

1
१. कुंडलीतील सौभाग्य म्हणजे स्त्री च्या जीवनात तिच्या नवऱ्याने तिच्या मरेपर्यंत जीवित राहणे आणि तिच्या तिरडीला खांदा देणे.

२. ज्या प्रकारे स्त्रियांसाठी सौभाग्य लिहिलेले आहे. समाजाने तिला सौभाग्य लेणे दिलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या समाजाने पुरुषांसाठी सुद्धा सौभाग्य लेणे आणि पत्नीच्या मृत्यूनंतर सता [ सतीचे पुल्लिंग] होण्याची प्रथा सुरु केली असती तर किती छान झाले असते ?

३. सता होण्याचा प्रकार सुरु झाला तर समाजातील विधुरपणामुळे होणारे अनाचार , दुराचार , व्यभिचार आणि अत्याचार तर थोड्या प्रमाणात कमी झाले असते ?

४. ज्योतिष्यविद्या, भविष्यवाणी, कुंडली हे सर्वच प्रकार लोकांना मूर्ख बनवून आपला उदरनिर्वाह चालवण्याचा एक प्रकार आहे.

५. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या दरबारात एक भिक्षुक ब्राह्मण येऊन स्वतःला ज्योतिष्यविद्येत पारंगत आणि अचूक भविष्यवेत्ता असल्याचा दावा करीत प्रस्तुत झाला. महाराजांनी त्याचा यथावत आदरसत्कार करून त्याला दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. तो ब्राह्मण राजकीय आदरतिथ्य उपभोगून दुसऱ्या दिवशी महाराजांसमक्ष उपस्थित झाला. महाराजांनी त्याचे क्षेम कुशल विचारून त्याची रात्र कशी गेली हा प्रश्न विचारला. त्या ब्राह्मणाने गर्वाने उत्तर दिले कि मी जगातील एकमेव अचूक भविष्यवेत्ता आहे आणि आपल्या दरबारात माझे महान स्वागत होऊन मला आदरसत्कार मिळणार होता हे मी आपल्या विद्येने आधीच जाणून घेतलेले होते.

६. महाराजांनी त्याचे म्हणणे निमूटपणे ऐकून घेऊन आपल्या गारद्यांना पाचारण केले आणि त्याचे मस्तक धडापासून वेगळे करण्याचे फर्मान सोडले. दरबारातील सर्वच लोकांना असल्या निर्णयाचा अचंबा झाला.

७. ब्राह्मणाने आपला जीव धोक्यात असल्याचे समजल्याबद्दल महाराजांचे पाय धरून क्षमा मागितली आणि सांगितले कि तो असल्याचं प्रकारच्या भविष्यवाणी करून सामान्य नागरिकांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून दान दक्षिण घेऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो आणि त्याला ना कुणाच्या भूतकाळाची ना भविष्यकाळाची जाणीव असते मात्र तो लोकांना काय हवे आहे त्याचा मागमोस घेऊन आपली भविष्यवाणी करतो आणि त्यांच्याकडून दक्षिणा घेत असल्याचे सांगतो.
उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 121765
0

कुंडलीत सौभाग्य योग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, सौभाग्य योग हा एक अत्यंत शुभ योग मानला जातो. हा योग वैवाहिक जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग असतो, त्या व्यक्तीला अनेक फायदे मिळतात.

सौभाग्य योगाचे फायदे:

  • वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते.
  • पती-पत्नीमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो.
  • कुटुंबात सुख-शांती नांदते.
  • आर्थिक लाभ होतो आणि समृद्धी येते.
  • समाजात मान-सन्मान वाढतो.

सौभाग्य योग कसा तयार होतो?

हा योग तयार होण्यासाठी काही विशिष्ट ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती जुळून यावी लागते. उदाहरणार्थ, जर कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असेल आणि तो चांगल्या स्थितीत असेल तर हा योग तयार होतो.

सौभाग्य योग असणाऱ्या व्यक्ती भाग्यवान असतात आणि त्यांना जीवनात कमी अडचणी येतात.

अधिक माहितीसाठी आपण एखाद्या चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2760