
भाग्य
1
Answer link
१. कुंडलीतील सौभाग्य म्हणजे स्त्री च्या जीवनात तिच्या नवऱ्याने तिच्या मरेपर्यंत जीवित राहणे आणि तिच्या तिरडीला खांदा देणे.
२. ज्या प्रकारे स्त्रियांसाठी सौभाग्य लिहिलेले आहे. समाजाने तिला सौभाग्य लेणे दिलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या समाजाने पुरुषांसाठी सुद्धा सौभाग्य लेणे आणि पत्नीच्या मृत्यूनंतर सता [ सतीचे पुल्लिंग] होण्याची प्रथा सुरु केली असती तर किती छान झाले असते ?
३. सता होण्याचा प्रकार सुरु झाला तर समाजातील विधुरपणामुळे होणारे अनाचार , दुराचार , व्यभिचार आणि अत्याचार तर थोड्या प्रमाणात कमी झाले असते ?
४. ज्योतिष्यविद्या, भविष्यवाणी, कुंडली हे सर्वच प्रकार लोकांना मूर्ख बनवून आपला उदरनिर्वाह चालवण्याचा एक प्रकार आहे.
५. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या दरबारात एक भिक्षुक ब्राह्मण येऊन स्वतःला ज्योतिष्यविद्येत पारंगत आणि अचूक भविष्यवेत्ता असल्याचा दावा करीत प्रस्तुत झाला. महाराजांनी त्याचा यथावत आदरसत्कार करून त्याला दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. तो ब्राह्मण राजकीय आदरतिथ्य उपभोगून दुसऱ्या दिवशी महाराजांसमक्ष उपस्थित झाला. महाराजांनी त्याचे क्षेम कुशल विचारून त्याची रात्र कशी गेली हा प्रश्न विचारला. त्या ब्राह्मणाने गर्वाने उत्तर दिले कि मी जगातील एकमेव अचूक भविष्यवेत्ता आहे आणि आपल्या दरबारात माझे महान स्वागत होऊन मला आदरसत्कार मिळणार होता हे मी आपल्या विद्येने आधीच जाणून घेतलेले होते.
६. महाराजांनी त्याचे म्हणणे निमूटपणे ऐकून घेऊन आपल्या गारद्यांना पाचारण केले आणि त्याचे मस्तक धडापासून वेगळे करण्याचे फर्मान सोडले. दरबारातील सर्वच लोकांना असल्या निर्णयाचा अचंबा झाला.
७. ब्राह्मणाने आपला जीव धोक्यात असल्याचे समजल्याबद्दल महाराजांचे पाय धरून क्षमा मागितली आणि सांगितले कि तो असल्याचं प्रकारच्या भविष्यवाणी करून सामान्य नागरिकांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून दान दक्षिण घेऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो आणि त्याला ना कुणाच्या भूतकाळाची ना भविष्यकाळाची जाणीव असते मात्र तो लोकांना काय हवे आहे त्याचा मागमोस घेऊन आपली भविष्यवाणी करतो आणि त्यांच्याकडून दक्षिणा घेत असल्याचे सांगतो.