3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना केव्हापासून सुरू केली?

2

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्त्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली.


उमरा येथिल पंडितराव गुलाबराव देशमुख यान्नी 2006 ला टकलिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गुरुमंत्री आर.आर.आबा पाटील याना भेटुन ताज्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान रविविन्यसाथी निवेदन दिलेले पंढिंविणत्याला 2006

umra yethil panditrao gulabrao deshmukh yanni 2006 la ttakalin mukyamntri vilasrao deshmukh and gurhmantri r.r.aaba patil yana bhetun tajyat mahatma gandhi tanttamukti abhiyan rabvinyasathi nivedan dile ann vinti kilee yawrun 2007 pasun rajyat he abhiyan chlu ahe tyala ata

उमरा देशमुख येथील ह.भ.प.पंडितराव गुलाबराव देशमुख यांनी राज्य तंटामुक्त करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील उर्पा आबा यांच्याकडे पाठपुरावा करून 2007 मध्ये राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले. पंडितराव देशमुख हे समाजसेवक, अहिंसावादी कार्यकर्ते आणि वारकरी संप्रदायाचे प्रेरक होते. 7 मार्च 2018 रोजी त्यांचे निधन झाले.

दिवंगत ह.भ.प. पंडितराव गुलाबराव देशमुख उमरेकर यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्ट 2007 रोजी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाची स्थापना केली. MPAC परीक्षेत महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाचा उद्देश काय आहे? असा प्रश्न विचारला असता, गावातील पोलिसांची गस्तीपासून मुक्तता करून गावात शांतता नांदावी, असे उत्तर दिले.


वाद झाल्यास तंटामुक्त गाव समितीसमोर वादींनी उभे राहायचे आणि वाद सामोपचाराने सोडवायचे असे याचे प्राथमिक स्वरूप आहे. ही संकल्पना महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारलेलि आहे. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेल्या ग्रामस्वराज्य या संकल्पनेवर तंटामुक्ती ग्राम ही संकल्पना उभी आहे. गावाचा विकास गावातच झाला पाहिजे तसेच त्या त्या गावातील प्रश्न देखील त्याच ठिकाणी सोडवता आले पाहिजेत ही बाब यामध्ये अधोरेखित केली गेली आणि एकूणच शासकीय स्तरावर ही योजना सर्वांकश रीत्या राबवली गेल्यामुळे त्याला अद्भुत पूर्ण यश देखील मिळाले. तत्कालीन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य श्री आर. आर. पाटील यांनी या योजनेला खऱ्या अर्थाने न्याय दिला


उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 121765
0
२००७
उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 25
0
महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना 15 ऑगस्ट 2007 पासून सुरू केली. या योजनेचा उद्देश गावा-गावातील तंटे गावातच मिटवून, गावात सलोखा निर्माण करणे हा आहे.

उत्तर: महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना 15 ऑगस्ट 2007 पासून सुरू केली.

या योजनेचा उद्देश गावा-गावातील तंटे गावातच मिटवून, गावात सलोखा निर्माण करणे हा आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

घरकुलसाठी जागा उपलब्ध नसल्यास लाभधारकांनी काय करावे?
पाटबंधारे विभागामध्ये ऑनलाईन विनंती अर्ज ग्रामपंचायतीला करता येतो का?
कृषी विभागाचा ईमेल ॲड्रेस काय आहे?
आदिवासींचे हितसंबंध जोपासण्यासाठी आणि भौतिक जीवनमान सुधारण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती सांगा?
शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारच्या, राज्यसरकारच्या सर्व चालु योजना एकाच ठिकाणी कोणत्या ॲपवर पाहायला मिळतील?
आदिवासींचे राहणीमान सुधारण्यासाठी व त्यांचे भौतिक जीवनमान उंचवण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती सांगा.
आदिवासींचे हितसंबंध जोपासण्यासाठी आणि भौतिक जीवनमान उंचवण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती सांगा?