2 उत्तरे
2
answers
डावपेच करणार्यांना कसे ओळखावे?
1
Answer link
डावपेच करणाऱ्या लोकांना आमच्या गावाकडे गेमाड म्हणतात. गेम करत असतात म्हणून गेमाड हा शब्द.
अश्या लोकांना ओळखण्यासाठी काही निरीक्षणे
असे लोक तुम्ही जेव्हा भेटाल तेव्हा एक टिपिकल सपक स्मितहास्य देत असतात. त्यांना तुम्हाला स्माईल नसेल द्यायची तरी नकळत देतात कारण हा त्यांचा स्वभाव असतो. किंवा एक ट्रिक म्हणू शकता.
असे लोक इतर लोकांविषयी सखोल चौकशी करत असतात. काही घेणं देणं नसेल तरीही उगाच खोलात घुसत असतात.
असे लोक आपल्या समोर इतर लोकांना नावे ठेवत असतात. (मग हेच लोक तुमच्याविषयी इतरत्र गप्पा इस्कटत असतील हे पण नक्की)
यांच्या सोबत दर तीन महिन्याला नवीन लोक/मित्र असतात. ते लोक एक तर यांच्या जाळ्यात अडकलेले असतात किंवा पुढच्या गेम मधले प्यादे असतात.
असे लोक तुम्हाला कायम इतर लोकांबद्दल मत व्यक्त करण्यास प्रवृत्त करत असतात अन् तुम्ही जे बोलता त्याचा आधार घेऊन तुमचा पण गेम वाजवू शकतात.
हे लोक दिखावा करण्यात पटाईत असतात. पैसा, पद, प्रतिष्ठा, वशिला इत्यादी गोष्टींचा दिखावा फक्त करून इतरांना जाळ्यात ओढतात अन् स्वतः मज्जा लुटतात.
अश्या लोकांचा कॉल जरी आला तरी सावधपणे बोलावे, चॅटिंग पण सांभाळून करावी. कशाचा उपयोग कुठल्या मार्गे कसा होईल सांगता येत नाही.
असे लोक शक्यतो समोरच्या च्या तोंडा प्रमाणेच बोलत असतात. जे लोक समोरच्या व्यक्ती च्या प्रत्येक गोष्टीत संमती दाखवतात त्यांची भूमिका संशयास्पद असते.
सगळी वातावरण निर्मिती झाल्यावर जेव्हा गेम करायची वेळ येते तेव्हा ते प्रचंड घाईत असल्यासारखे दाखवतात. जसे काही आपण त्यावेळेला तो सांगतोय ते केले नाही तर जगबुडी होईल. तुम्हाला विचार करायलाही वेळ देत नाहीत आणि त्यांचे काम साधून घेतात. (
तरीही असे लोक इतके शातिर असतात की तुम्हाला तुमचा गेम झाल्याशिवाय समजत नाही अन् जेव्हा समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
थोडक्यात, बोगस हास्य करणारे आणि गोड गोड बोलणारे लोक शक्यतो गेमाड असतात असं अनुभव सांगतो.
धन्यवाद 🙏🏼
0
Answer link
डावपेच करणार्यांना ओळखण्यासाठी काही गोष्टी मदत करू शकतात:
हे सर्व मुद्दे तुम्हाला डावपेच करणाऱ्या व्यक्तीला ओळखायला मदत करतील. |