2 उत्तरे
2
answers
बुद्रुक म्हणजे काय?
3
Answer link
बुद्रुक हा पूर्वीच्या मराठा प्रदेशाच्या नावांच्या ठिकाणी सापडलेला प्रत्यय आहे. हे उत्तर भारतामध्ये आढळणार्या कलान सारखेच आहे आणि हे गाव किंवा दोन नावाच्या गावांचे दोन विभाग वेगळे करण्यासाठी वापरले जाते. "खुर्द" याचा अर्थ लहान आहे, आणि "बुर्ड्रुक" याचा अर्थ मोठा आहे; दोन्ही शब्द फारसी मूळ आहेत.
मौजे,खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय असा प्रश्न नेहमी पडायचा. याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर पुढील माहिती समोर आली.
गांवा’ला ‘मौजे’ असंही आता पर्यंत म्हणत. हा शब्द विशेषतः पोस्टाच्या पत्त्यात असायचा हे मला पक्क आठवतयं. , ‘मौजे’ हा शब्द ‘मौजअ’ वा ‘मौझा’ या मुळ अरबी शब्दावरून आला असून त्याचा ‘अरबी’ अर्थ ‘गांव’ असाच आहे.
‘खुर्द’ हा असाच एक फारसी भाषेतला शब्द. याचाही अर्थ गांवच परंतू लहान गांव. ‘खुर्द’ शब्दाचा आणखी एक अर्थ आहे आणि तो म्हणजे ‘सुटे किंवा किरकोळ पैसे’. मोठ्या गावाच्या शेजारी वसलेली लहान वा किरकोळ वस्ती म्हणजे ‘खुर्द’.
‘बुद्रुक’ हा शब्द ‘बुजुर्ग’ या फारसी शब्दाचा अपभ्रंश असून ‘बुजुर्ग’ म्हणजे मोठा किंवा थोर हे आपल्या सर्वांना माहित आहे..मुख्य किंवा मोठ गांव म्हणजे ‘बुद्रुक’. शेजारी वसलेली किरकोळ वसती म्हणजे ‘खुर्द’..
0
Answer link
बुद्रुक हा एक मराठी भाषेतील शब्द आहे.
बुद्रुक म्हणजे:
- गावाच्या नावांमध्ये 'बुद्रुक' हा शब्द वापरला जातो.
- 'बुद्रुक' म्हणजे मोठे गाव.
- एकाच नावाच्या दोन गावांपैकी जे गाव मोठे असते, त्याला 'बुद्रुक' म्हणतात.
उदाहरणार्थ, 'वडगाव बुद्रुक' हे पुण्याजवळील एका गावाचे नाव आहे.