क्रीडा पारंपरिक खेळ

तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा व त्यांचा संग्रह करा?

2 उत्तरे
2 answers

तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा व त्यांचा संग्रह करा?

2
मराठी संस्कृती ही अनेक क्रीडाप्रकारांचे माहेरघर आहे. असे खेळ गावांमध्ये आता फारसे खेळणारे उरले नाहीत, तंत्रज्ञानाच्या पीढी ने आम्हाला गुदगुलया केलया आहे . किमान पारंपारिक खेळ / क्रीडा प्रकार स्थानिक गावात तरी जीवंत रहायला हवा अस मला वाटतं .पूर्वी बालपन है मैदानी खेळ खेळन्यात गेल आसव .पन सदध्या काहि वर्षा मधे आपली जीवनसरणी बदलली आणि आपण हे खेळ खेळायचे थांबलो. फारसे काही खेळ अजुन आहे नावाला

सूर पारंब्या, आट्या-पाट्या, गोट्या, सागरगोट्या, लगोरी, मंगळागौरीचे खेळ, झब्बू, बदाम सात, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू, गलोल, भातुकली – एक एक आठवायला बसलं की आठवेल . या प्रत्येक खेळाबरोबर महाराष्ट्राचा माणसाच्या संस्कृतीचा एक धागा जोडलेला आहे.

1 सूर पारंब्या जिथे वडाची झाडे होती तिथे खेळला जात होता झाडावर चढून खेळला जाणारा हा खेळ जुन्या काळात प्रसिद्ध होता. पन हल्ली काय झाल काय माहित वडाची झाड गेली की खेळ खेळनारे गेले हाच ऐक प्रश्न आहे.

2भातुकलीचा खेळ तर प्रत्येक लहान मुलांना येणार्‍या प्रौढ वयातल्या जबाबदार्‍यांची जाणीव

 करुण देत होता.सुरपारंब्या

चोर पोलीस

फुगड्या

विटीदांडू

गोट्या

घिसाघिसी

च्यावम्याव

रोपारोपी इ.

खेळांची वर्णन केले आहे. कसे खेळावेत त्याबद्दल माहिती दिली

आहे.

हे सर्व पारंपरिक खेळ शारीरिक शिक्षणाच्या तासिकेला रोज एक देशी खेळ प्रत्यक्ष मुलांना खेळायला सांगीतले. पाठात काही खेळ खेळण्याची पद्धत केवणीदिव्यातील पद्धती पेक्षा थोडी वेगळी आहे. त्यामुळे असे खेळ मुलांची पद्धत व पाठातील पद्धत या दोन्ही प्रकारे खेळ प्रत्यक्ष खेळून घेतला.

खेळ खेळताना मुलांचा आनंद शब्दात वर्णन करणे अशक्य ..

3मंगळागौरीचे खेळ बायका श्रावण महिन्यात खेळत असत. पूर्वीच्या काळी जेव्हा बायकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसे तेव्हा हे खेळ खेळणं बायकांनी एकत्र येण्यामागचं निमित्त होतं.

.6खो खो सारखे मैदानी खेळ खूप खेळले जात होते पन ते आता फक्त शालेय जिवनासाठी च उरले आहे.

7 कुस्तीच स्थान गावात यात्रे निमित्त किवा सांस्कृतिक कारणाने गावात अजुन पन आहे

8विटी-दांडू हा खेळ. साधारण पावसाळा संपला किंवा संपत आला की हा खेळ सुरू होयचा अगदी कमी साहित्यत हा खेळ खेळला जायचा (माझ विशेष प्राविन्य होत विट्टू दांडुत)😂

9लिंगोरच्या तर आता नावाला पन नाहि राहिला कुठ फार पूर्वी पासून चा खेळ होता

9गोट्या चिंचोके तर मुले घरोघरी खेळत होती



गावाकडील खेल

कोणतीही सामग्री नसताना गावाकडे विविध खेल खेळले जातात जसे की विटी दांडू, कब्बड्डी,क्रिकेट, गोटया, लपंडाव,गोळा फेक,इत्यादी
आजकाल है खेल जवळपास शाहरामधे लुप्त झालेले आहेत कारण याच कारणीभूत आहे मोबाइल मोबाइल ने शहरातील मुलांचे खेलने हिरावून घेतलेे आहे परंतु गावकडे आज पन नियमित पने खेळले जात असतात ते पन वयाचे कोणतेही बंधन नसताना गावकडील खेळांमध्ये विविधता व एकरूपता दिसून येते जसे की प्रत्येक खेळ हा नियम व अटीनुसार होत असतो त्यात कोणतेही बदल होत नाही अशाच खेळात मजा व आनंद दिसून येतो तसेच भांडणे सुद्दा होत असतात.

ते भले मोठे मैदान, भरपूर मुले, विविध खेल ते पण एकत्र आणि त्यात पण सर्व काही एक ठिकाणी जसे की पाणी, क्रीम,चॉकलेट, इत्यादी आडे सर्व गबोस्ती फक्त गावाकडच्या खेळातच दिसून येत असतात.

आम्ही सुद्धा खूप खेळ खेळतो परंतु जी मजा गावाकडच्या खेळांत आहे ती महा कुढत दिसून येणार नाही सांगण्याकरिता भरपूर आहेत पण शब्दात ते व्यक्त होत नसतात. म्हणतात ना सर्व विकत घेता येते पण बाळ पण विकत घेत येत नाही,म्हणून प्रत्येकाने गावाकडील खेल तरी या वयात सुद्दा खेळायला पाहिजे जेणेकरून प्रत्येकाचे बालपण ताजे होईल.

प्रत्येक व्यक्ती चा गावसंगे संबंध असतोच तसच खेळसांगे सुद्दा असतोच म्हणून प्रत्येक खेळातून काही न काही शिकवून पुढं जात राहिले पाहिजे. जेणे करून कोणत्याही गोष्टी ने गावचे किंवा आपले नाव मोठे होईल.


उत्तर लिहिले · 19/10/2021
कर्म · 121765
0
मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) असल्यामुळे मला गाव नाही. त्यामुळे माझ्या गावी खेळले जाणारे खेळ सांगणे शक्य नाही. तरीही, भारतातील गावांमध्ये खेळले जाणारे काही पारंपरिक खेळ आणि त्यांची माहिती मी तुम्हाला देऊ शकेन:

पारंपरिक खेळांची माहिती:

  1. विटी-दांडू:

    हा खेळ दोन लहान लाकडी तुकड्यांनी खेळला जातो. एक लहान तुकडा (विटी) असतो आणि दुसरा मोठा (दांडू). विटीला दांडूने मारून दूर उडवले जाते.

  2. लंगडी:

    हा खेळ एक पायावर उड्या मारून खेळला जातो. यात खेळाडू एका पायावर उडी मारत काही नियम पाळतो.

  3. कबड्डी:

    कबड्डी हा दोन संघांमध्ये खेळला जातो. यात एक खेळाडू श्वास रोखून प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्रात जातो आणि त्यांना स्पर्श करून परत येतो.

  4. खो-खो:

    खो-खो हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. यात एक संघ पाठलाग करतो आणि दुसरा बचाव करतो.

  5. गोट्या:

    गोट्या हा खेळ लहान गोल आकाराच्या दगडांनी किंवा काचेच्या गोळ्यांनी खेळला जातो. यात नेम साधून निशाण्यावर गोटी मारली जाते.

  6. भवर :

    हा खेळ लाकडी भवर वापरून खेळला जातो, ज्याला दोरीच्या साहाय्याने फिरवले जाते.


तुम्ही तुमच्या गावाकडील खेळांविषयी माहिती देऊन हा संग्रह वाढवू शकता.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

कुस्तीसाठी खाशाबांचे शरीर बळकट होण्याची कारणे काय होती?
मतदेरी स्पर्धा प्रस्तावना?
खेळामुळे बालकांच्या कोणत्या क्षमता वाढतात?
2025 आयपीएल मध्ये CSK vs MI यांच्यातील आजचा टॉस विनर कोण?
2025 आयपीएल मध्ये, एमआय विरूद्ध सीएसके यांच्यातील आजचा टॉस विजेता कोण?
कॅनडा वि. नामिबिया याच्यातील आजची टॉस विनर टीम कोणती?
2025 आयपीएल एसआरएच वि आरआर यांच्यातील आजची टॉस विनर टीम कोणती?