पारंपरिक खेळ
0
Answer link
भारतामध्ये अनेक प्रकारचे देशी खेळ खेळले जातात, त्यापैकी काही प्रमुख खेळ खालीलप्रमाणे आहेत:
- कबड्डी
- खो-खो
- मल्लखांब
- लगोरी
- विटी-दांडू
- गोट्या
- पतंगबाजी
- बैठकी
हे खेळ भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि थोड्याफार फरकाने खेळले जातात.
2
Answer link
मराठी संस्कृती ही अनेक क्रीडाप्रकारांचे माहेरघर आहे. असे खेळ गावांमध्ये आता फारसे खेळणारे उरले नाहीत, तंत्रज्ञानाच्या पीढी ने आम्हाला गुदगुलया केलया आहे . किमान पारंपारिक खेळ / क्रीडा प्रकार स्थानिक गावात तरी जीवंत रहायला हवा अस मला वाटतं .पूर्वी बालपन है मैदानी खेळ खेळन्यात गेल आसव .पन सदध्या काहि वर्षा मधे आपली जीवनसरणी बदलली आणि आपण हे खेळ खेळायचे थांबलो. फारसे काही खेळ अजुन आहे नावाला
सूर पारंब्या, आट्या-पाट्या, गोट्या, सागरगोट्या, लगोरी, मंगळागौरीचे खेळ, झब्बू, बदाम सात, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू, गलोल, भातुकली – एक एक आठवायला बसलं की आठवेल . या प्रत्येक खेळाबरोबर महाराष्ट्राचा माणसाच्या संस्कृतीचा एक धागा जोडलेला आहे.
1 सूर पारंब्या जिथे वडाची झाडे होती तिथे खेळला जात होता झाडावर चढून खेळला जाणारा हा खेळ जुन्या काळात प्रसिद्ध होता. पन हल्ली काय झाल काय माहित वडाची झाड गेली की खेळ खेळनारे गेले हाच ऐक प्रश्न आहे.
2भातुकलीचा खेळ तर प्रत्येक लहान मुलांना येणार्या प्रौढ वयातल्या जबाबदार्यांची जाणीव
करुण देत होता.सुरपारंब्या
चोर पोलीस
फुगड्या
विटीदांडू
गोट्या
घिसाघिसी
च्यावम्याव
रोपारोपी इ.
खेळांची वर्णन केले आहे. कसे खेळावेत त्याबद्दल माहिती दिली
आहे.
हे सर्व पारंपरिक खेळ शारीरिक शिक्षणाच्या तासिकेला रोज एक देशी खेळ प्रत्यक्ष मुलांना खेळायला सांगीतले. पाठात काही खेळ खेळण्याची पद्धत केवणीदिव्यातील पद्धती पेक्षा थोडी वेगळी आहे. त्यामुळे असे खेळ मुलांची पद्धत व पाठातील पद्धत या दोन्ही प्रकारे खेळ प्रत्यक्ष खेळून घेतला.
खेळ खेळताना मुलांचा आनंद शब्दात वर्णन करणे अशक्य ..
3मंगळागौरीचे खेळ बायका श्रावण महिन्यात खेळत असत. पूर्वीच्या काळी जेव्हा बायकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसे तेव्हा हे खेळ खेळणं बायकांनी एकत्र येण्यामागचं निमित्त होतं.
.6खो खो सारखे मैदानी खेळ खूप खेळले जात होते पन ते आता फक्त शालेय जिवनासाठी च उरले आहे.
7 कुस्तीच स्थान गावात यात्रे निमित्त किवा सांस्कृतिक कारणाने गावात अजुन पन आहे
8विटी-दांडू हा खेळ. साधारण पावसाळा संपला किंवा संपत आला की हा खेळ सुरू होयचा अगदी कमी साहित्यत हा खेळ खेळला जायचा (माझ विशेष प्राविन्य होत विट्टू दांडुत)😂
9लिंगोरच्या तर आता नावाला पन नाहि राहिला कुठ फार पूर्वी पासून चा खेळ होता
9गोट्या चिंचोके तर मुले घरोघरी खेळत होती
गावाकडील खेल
कोणतीही सामग्री नसताना गावाकडे विविध खेल खेळले जातात जसे की विटी दांडू, कब्बड्डी,क्रिकेट, गोटया, लपंडाव,गोळा फेक,इत्यादी
आजकाल है खेल जवळपास शाहरामधे लुप्त झालेले आहेत कारण याच कारणीभूत आहे मोबाइल मोबाइल ने शहरातील मुलांचे खेलने हिरावून घेतलेे आहे परंतु गावकडे आज पन नियमित पने खेळले जात असतात ते पन वयाचे कोणतेही बंधन नसताना गावकडील खेळांमध्ये विविधता व एकरूपता दिसून येते जसे की प्रत्येक खेळ हा नियम व अटीनुसार होत असतो त्यात कोणतेही बदल होत नाही अशाच खेळात मजा व आनंद दिसून येतो तसेच भांडणे सुद्दा होत असतात.
ते भले मोठे मैदान, भरपूर मुले, विविध खेल ते पण एकत्र आणि त्यात पण सर्व काही एक ठिकाणी जसे की पाणी, क्रीम,चॉकलेट, इत्यादी आडे सर्व गबोस्ती फक्त गावाकडच्या खेळातच दिसून येत असतात.
आम्ही सुद्धा खूप खेळ खेळतो परंतु जी मजा गावाकडच्या खेळांत आहे ती महा कुढत दिसून येणार नाही सांगण्याकरिता भरपूर आहेत पण शब्दात ते व्यक्त होत नसतात. म्हणतात ना सर्व विकत घेता येते पण बाळ पण विकत घेत येत नाही,म्हणून प्रत्येकाने गावाकडील खेल तरी या वयात सुद्दा खेळायला पाहिजे जेणेकरून प्रत्येकाचे बालपण ताजे होईल.
प्रत्येक व्यक्ती चा गावसंगे संबंध असतोच तसच खेळसांगे सुद्दा असतोच म्हणून प्रत्येक खेळातून काही न काही शिकवून पुढं जात राहिले पाहिजे. जेणे करून कोणत्याही गोष्टी ने गावचे किंवा आपले नाव मोठे होईल.
6
Answer link
आट्यापाट्याचे बदलते रंग
Updated Nov 27, 2011, 12:19 AM IST
> अश्विनी गो-हे । नाशिक
आट्यापाट्या हा एक *शिवकालीन* मैदानी खेळ आहे.
मराठी मातीत खेळला जाणारा आट्यापाट्या हा खेळ आता तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाईल, त्या दृष्टीने अनेक प्रयत्न सुरू आहे. हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जावा, यासाठी अनेक बदल करण्यात आले आहे. आट्यापाट्या या खेळाच्या बदलाविषयी थोडसं....
............
आट्यापाट्या हा धाडसी आणि रोमहर्षक खेळ आहे. भारतीय मूळ असलेला आट्यापाट्या हा अतिशय प्राचीन काळापासून खेळला जाणारा एक महत्त्वाचा खेळ आहे. पण आज अनेक भारतीयांना तो खेळ कसा खेळला जातो, याची माहिती नसून शाळेतील मुलांना अशा नावाचा खेळ पूर्वी खेळला जात होता हे माहिती नाही.
या खेळाचे स्वरूप हे पूर्वीपेक्षा बदलत असून पूर्वी या खेळामध्ये ९ खेळाडू एकदम धावात व त्यामुळे खेळामध्ये गोंधळ उडत असे. हा खेळ त्याकाळी गल्लोगल्ली खेळला जात असल्यामुळे तेव्हा तो भारतामध्ये प्रचलित खेळ मानला जाई. या खेळाला आतंरराष्ट्रीय स्थान प्राप्त व्हावे तसेच या खेळातील त्रुटी भरून काढण्यासाठी खेळाचे स्वरूप बदलविण्यात आले आहे. त्यामुळे १९८२पासून आट्या-पाट्या फेडरेशन ऑफ इंडियाने या खेळाची नियमावली तयार केली आहे.
बदलेल्या खेळानुसार या खेळाचा सामना दोन डावांचा असतो. प्रत्येक डावाच्या दोन पाळ्या असतात अशा एकूण चार पाळ्यामध्ये तो खेळला जातो. एक पाळी सात मिनिटांची असते. संघामध्ये १२ खेळाडूंचा समावेश असून प्रत्येक पाळीनंतर तीन मिनिटांचा मध्यांतर केला जातो. तीन सर्वोत्कृष्ट पाळ्यांच्या आधारे सामन्याचा निर्णय होतो. आक्रमकांनी तीन पाटी ओलांडली तर प्रत्येक आक्रमणाला एक गुण मिळतो. पूर्वी हा गेम नऊ खेळाडूच्या धाव्यात असायच्या पण आता त्यामध्ये दोन बॅच करण्यात आले आहे. पहिली पाचची बॅच व दुसरी चारची बॅच असते. यामुळे पूर्वी हा खेळ खेळतांना जो गोंगाट होत असे तो आता कमी होऊन या खेळातील खेळाडूचे कौशल्य खेळातून बघायला मिळते. या खेळासाठी फक्त १०० बॉय ५० फूटांच्या मैदानावर हा खेळ कोणतेही साधनसामग्री नसतांना खेळता येतो.
प्राचीन काळापासून विविध नावांनी, अनेकानेक सुधारणा करीत देशाच्या विविध भागांत आट्यापाट्या हा खेळ खेळला जातो. पण अजूनही या खेळाला जिल्हा शालेय क्रीडा विभागाने शालेय खेळ म्हणून मान्यता दिली नसल्यामुळे या खेळाचा प्रसार कमी प्रमाणात होत आहे. महाराष्ट्र संघाचा प्रवीण रामकृष्ण वाहाले या खेळाडूने या खेळाचा विकास होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणतो की, हा खेळ मराठमोळ्या असून या खेळासाठी वेग, तंत्र चपळता व डावपेचाची आखणी हि फार गरजेची असते. तरच या खेळामध्ये खेळाडू जिंकू शकतो. मूळचा नागपूरचा असणारा प्रवीण वाहाले हा १९९०पासून हा खेळ खेळत असून त्याने या खेळासाठी २००५-२००६ सालाचा छत्रपती पुरस्कार मिळवला आहे. त्याबरोबर त्याने नागपूर जिल्हा उत्कृष्ट आट्यापाट्या खेळाडू व विदर्भ स्पोर्टस् पुरस्काराचा मान त्याने पटकावला आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनाही या खेळात करिअर करण्याचे त्याने ठरवले. लहानपणापासून खो-खो व आट्यापाट्या हा खेळ खेळण्याची त्याला आवड आहे. आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाने जी खेळाची नियमावली तयार केली आहे. त्यात अनेक छोटेमोठे बदल करण्यात आले व त्यामुळे हा खेळ सोप्पा झाला.
खो-खो, कबड्डी, मल्लखांब या देशी खेळांप्रमाणे आट्यापाट्या हा खेळही मराठी मातीतला पण महाराष्ट्रात तो दुर्लक्षित राहिलेला आहे अशी खंत आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाने स्पष्ट केले. एका संघातील खेळांडूनी दुस-या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेल्या हा महाराष्ट्रीय खेळ. या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो. या खेळासाठी साधनसामुग्री ही कमी प्रमाणात लागते तरीही हा खेळ शालेय खेळामध्ये समाविष्ट होत नाही. हा खेळ मनोरंजक, भरपूर व्यायाम करून देणारा व बिनखर्ची आहे. यात वैयक्तिक व सांघिक कौशल्य याची कसोटी लागत असते. म्हणूनच या खेळासाठी आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया हे एशियन व आल्मिम्पिक खेळासाठी मान्यता मिळावी, यासाठी ते प्रयत्न करत आहे. तसेच नेपाळ, भूतान, श्रीलंका यांच्याशी या खेळाविषयी चर्चा सुरू आहे. आता तरी हा खेळ आतंरराष्ट्रीय खेळामध्ये आपले स्थान निर्माण करेल, अशी आशा वाटते.

लगोरी’ची सातासमुद्रापार भरारी
June 26, 2013 07:00:23 AM सुप्रिया दाबके 1 Comment game, lagori, खेळ, लगोरी
एकावर एक सात दगड ठेवून रचलेली लगोरी चेंडूने नेम धरून फोडणे आणि विस्कळीत झालेले दगड प्रतिस्पर्धी संघाचा चेंडूचा मारा चुकवत रचण्याच्या हा खेळ बालपणात अनेकांनी खेळला आहे.
मुंबई – एकावर एक सात दगड ठेवून रचलेली लगोरी चेंडूने नेम धरून फोडणे आणि विस्कळीत झालेले दगड प्रतिस्पर्धी संघाचा चेंडूचा मारा चुकवत रचण्याच्या हा खेळ बालपणात अनेकांनी खेळला आहे. बालपणातील हा लगोरी खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेत भारताच्या ज्युनियर संघाने सुवर्णपदक पटकावले आहे.
या खेळाला सरकाकडूनही मान्यता मिळावी आणि ऑलिंपिकमध्येही त्याचा समावेश व्हावा, यासाठी आंतरराष्ट्रीय लगोरी महासंघाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती या संस्थेचे सचिव संतोष गुरव यांनी ‘प्रहार’ला दिली. मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यात लगोरी खेळाच्या संघटना आहेत. ‘मुंबई’तील चार मुले राष्ट्रीय पातळीवरील लगोरी संघांमध्येही खेळली आहेत. या पारंपरिक खेळाची पहिली-वहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच भूतानमध्ये झाली.
मात्र हा आपला पारंपरिक खेळ असला तरी या स्पर्धेत बांगलादेश आणि नेपाळ यांनी वरिष्ठ स्तरावर सुवर्णपदके पटकवली असून भारताला ज्युनियर स्तरावरील मिळालेल्या सुवर्णपदकावर समाधान मानावे लागले आहे. असे असले तरी लगोरीसारखा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला हे महत्त्वाचे असल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले.
नागोठणेसारख्या गावातील रहिवासी संतोष गुरव आणि त्यांचे कुटुंबीय लगोरी खेळ वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. संतोष यांचे भाऊ भरत हेदेखील आंतरराष्ट्रीय लगोरी खेळाचे पंच आहेत. स्वत: आंतरराष्ट्रीय स्तरावर वुडबॉल खेळणारे संतोष यांनी हा खेळ वाढवण्यासाठी नागोठण्यातूनच या खेळाचा प्रसार करायला सुरुवात केली. त्यांनी या खेळाची ऐतिहासिक पार्श्वभूमीही सांगितली.
महाभारतात श्रीकृष्णाने बालपणी संवगडय़ांसोबत हा खेळ खेळल्याचे म्हटले जाते. संत एकनाथांच्या गाथेतही २७१-३०० या पानांवर या खेळाचा उल्लेख दिसतो. पेशवेकाळात जे मान्यताप्राप्त खेळ होते त्यातही लगोरी खेळाचा समावेश होता,’’ असे संतोष आवर्जून सांगतात.
लगोरी खेळ तीन वर्षे मोठय़ा पातळीवर खेळला जात आहे त्यामुळे पुढील वर्षापर्यंत त्याला राज्य सरकारची मान्यता मिळेल आणि शाळांमध्येही या खेळाच्या स्पर्धा भरवल्या जातील, असा विश्वास संतोष यांना आहे. खेळाच्या प्रसारासाठी त्यांनी सुरुवातीला भारतात विविध ठिकाणी दौरे करून विविध राज्यांना लगोरी खेळाचे महत्त्व पटवून दिले.
फक्त भारतातच नाही तर नेपाळ, भूतान, बॅँकॉकसारख्या देशांमध्ये जाऊनही त्यांनी लगोरी खेळासाठी पुढाकार घेतला. त्यातच भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशांतही लगोरीची परंपरा असल्याने त्या देशांनी लगेचच खेळाच्या विकासाला मान्यता दिली. त्यातून आंतरराष्ट्रीय लगोरी महासंघ निर्माण झाला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या. सध्या जवळपास १५ देशांमध्ये आणि भारतातील २६ राज्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. प्रत्येक राज्यात आणि हा खेळ खेळणा-या देशांत लगोरी खेळाचे नाव वेगळे आहे.
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेत भारतासह अन्य देशांनीही विजय नोंदवले. ते पाहता परदेशातही हा खेळ गंभीरपणे खेळला जात असल्याचे संतोष म्हणाले. आशियाई आणि ऑलिंपिकपर्यंत हा खेळ पोहोचावा म्हणून खेळाच्या नियमांत बदल करण्यात आल्याचेही संतोष यांनी सांगितले.