3 उत्तरे
3
answers
इंद्रायणी नदीची माहिती मिळेल का?
6
Answer link
इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धराणापासून परत सुरू होते.लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे ४ किलोमीटरचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बर्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते.
कुंडलिका नदी (किंवा कुंडली) ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, वडिवळे धरण कुंडलिकावर आहे. कुंडलिका (कुंडली) व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते. इंद्रायणीच्या वरच्या बाजूला धरणाजवळ कुबेरगंगा नावाची एक लहान नदी इंद्रायणीला मिळते. तेथे एक बेट झाले आही, हेच सिद्धबेट म्हणून पुढे प्रसिद्ध झाले.

1
Answer link
इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धरणापासून परत सुरू होते. 

इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धराणापासून परत सुरू होते.लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे ४ किलोमीटरचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बर्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते.
कुंडलिका नदी (किंवा कुंडली) ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, वडिवळे धरण कुंडलिकावर आहे. कुंडलिका (कुंडली) व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते. इंद्रायणीच्या वरच्या बाजूला धरणाजवळ कुबेरगंगा नावाची एक लहान नदी इंद्रायणीला मिळते. तेथे एक बेट झाले आही, हेच सिद्धबेट म्हणून पुढे प्रसिद्ध झाले.
पूणे जिल्हयाच्या मध्यभागातून वाहणारी भीमा नदीची एक उपनदी लोणावळयाच्या नैऋर्त्येस सु. 5 किमी वर सहयाद्रीतील कूरवंडे घाटाजवळ ही उगम पावते. व 93 किमी पुर्व दिशेकडे वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावानजीक भीमेस मिळते. आंध्र नदी ही तिची प्रमुख उपनदी आहे. इंद्रायणीच्या खोज्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 710 चौ.किमी असून घाटमाथ्याजवळ टाटा कंपनीचे बांधलेल्या लोणावळे वळवण शिरावट व आंध्र या चार तलावांतील पाण्याच्या साहयाने तळ कोकणात वीजनिमिर्त होते. देहू व पूणे मूबई हमरस्ता व रेल्वे मार्ग खाज्याच्या पश्चिम भागातून गेल्यामुळे त्या भागात चांगली वाढ झालेली आहे.
राम झरा :
राम झरा हा या इंद्रायणी नदीला मिळणारा मुख्य नाला आहे. या झर्याचा उगम पुणे जिल्ह्यातील चिखलीजवळच्या हरगुडे वस्ती येथे होतो व कुदळवाडीतून वाहत वाहात चिखली-मोई फाट्याजवळ तो इंद्रायणीत विलीन होतो. या झर्याचा उल्लेख तुकारामांच्या गाथांत आला आहे. हा झरा बाराही महिने वाहत असे, त्यामुळे या झर्यात जलचरांचा मोठा वावर होता.. संत तुकाराम जेव्हा आळंदीला पायी वारी करायचे त्यावेळेस ते चिखली गावाजवळील ह्या झर्यावर आराम करून तेथे पाणी पिऊन पुढे जायचे.
झर्याच्या दोन्ही बाजूला पोटखराबा जमीन आहे. हळूहळू या झर्याला गटारगंगेचे स्वरूप आले. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, हरगुडे वस्ती व तेथील बंदिस्त गोदामात रसायने साठविणारे सर्व व्यापारी, त्रिवेणी नगर व तेथील पावडर कोटिंग व्यवसाय करणारे यांचे रिकामे रसायन कंटेनर, पोती, बॅगा वगैरे गोष्टी भंगाराचा व्यवसाय करणारे व्यापारी घेतात व राजरोजपणे त्या वस्तू धुऊन त्यांतले घातक रसायन युक्त पाणी बेधडकपणे राम झर्यात सोडून देतात. रासायनिक कंपनीतील रसायनांचे रिकामे बॅरेल्स नाल्याशेजारच्या भंगार शेडमध्ये धुऊन पुन्हा विकले जातात.
0
Answer link
इंद्रायणी नदी पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक नदी आहे. ही नदी लोणावळ्याजवळ उगम पावते आणि पश्चिम दिशेकडे वाहत जाते. ही नदी पुणे जिल्ह्यातून वाहते.
इंद्रायणी नदी विषयी काही माहिती:
- उगम: लोणावळ्याजवळील कुरवंडे गावातून
- लांबी: सुमारे ५४ किलोमीटर
- खोरे: मुख्यतः पुणे जिल्हा
- प्रवाह: पश्चिम वाहिनी
- मिळणारी नदी: भीमा नदी
- तीर्थक्षेत्र: देहू आणि आळंदी ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे याच नदीच्या काठी आहेत.
इंद्रायणी नदी ही पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची नदी आहे. देहू आणि आळंदी यांसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमुळे या नदीला विशेष महत्त्व आहे.
अधिक माहितीसाठी हे दुवे पहा: