भूगोल भूगर्भशास्त्र

कायिक विदारण म्हणजे काय?

4 उत्तरे
4 answers

कायिक विदारण म्हणजे काय?

2
कायिक विदारण खडक फुटताना त्यांचे कणी विघटन (कणकण वेगळे होणे) होते, अपपर्णन (कांद्यासारखे पापुद्रे निघणे) होते, सांध्याच्या भेगा मोठ्या होऊन खडकांचे मोठे ठोकळे अलग होतात किंवा त्यांचा विध्वंस होऊन त्यांचे अणकुचीदार व धारदार तुकडे तुकडे होतात. उष्णतेमुळे खडक तापतात व प्रसरण पावतात. ते निवले म्हणजे आकुंचन पावतात.


  कायिक  विदारण म्हणजे अपक्षय किंवा झीज.


पृथ्वीच्या अंतर्गत प्रक्रियेमुळे आणि हालचालींमुळे पृथ्वीवर शिखरे, भूरूपे, नद्या, हिमनद्या तयार झालेल्या आहेत.

काहीना काही कारणाने या घटकांची झीज होत असते, हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

कायिक विदारण म्हणजे खडक कमकुवत होणे किंवा

त्याची झीज होणे होय.कायिक विदारण हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी खालील कारणामुळे होऊ शकते.

पाणी- पावसाचे प्रमाण जास्त असणाऱ्या प्रदेशात पाणी जमिनीत मुरल्यामुळे खडकाचे विदारण घडून येते.

उष्ण तापमान ज्या प्रदेशांत तापमान जास्त असते अशा ठिकाणी खडकांचे विदारण घडून येते. उष्णतेमुळे खडकांतील खनिजे प्रसरण पावतात. आणि वातावरण थंड झाल्यावर आंकुचन पावतात. यामुळे खडकांना तडे जातात व खडक फुटतात.

अति थंड तापमान- अति थंड तापमानामुळे पाणी - गोठून बर्फ बनते. खडकांच्या तडांमध्ये जाऊन बसलेले पाणी बर्फ बनते. आणि त्याचे आकारमान वाढते, पर्यायी खडक फुटतो आणि त्याचे विदारण होते.
उत्तर लिहिले · 13/10/2021
कर्म · 121765
0
कायिक विदारण म्हणजे काय ?
उत्तर लिहिले · 29/7/2022
कर्म · 0
0
कायिक विदारण (Physical Weathering):

कायिक विदारण म्हणजे हवामानातील घटकांमुळे खडकांचे लहान तुकड्यांमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया. ह्या प्रक्रियेत खडक रासायनिकदृष्ट्या बदलत नाहीत, फक्त त्यांचा आकार बदलतो.

कायिक विदारणाची कारणे:

  • तापमान: तापमानातील सततच्या बदलांमुळे खडक आकुंचन पावतात आणि प्रसरण पावतात. यामुळे खडकांमध्ये ताण निर्माण होतो आणि ते तुटतात.
  • पाणी: पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते, त्यामुळे खडकांमध्ये भेगा निर्माण होतात.
  • वारा: वाऱ्यामुळे लहान खडक आणि वाळू एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे खडकांची झीज होते.
  • वनस्पती: झाडांची मुळे खडकांच्या भेगांमध्ये वाढतात आणि खडक फोडतात.
  • प्राणी: काही प्राणी जमिनीत बीळे बनवतात, ज्यामुळे खडकांची झीज होते.

कायिक विदारणाचे प्रकार:

  • खडक फुटणे
  • खडक झिजणे
  • स्फटिक वाढणे
  • दाब घटणे

कायिक विदारणामुळे माती तयार होण्यास मदत होते, जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440

Related Questions

FYBA SOC101 पठारांचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा?
जमीन म्हणजे काय?
स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात चूक की बरोबर?
कोणत्या खडकांचा इंधन म्हणून वापर केला जातो?
स्त्री समुद्र तोय प्रतिवाहन म्हणजे काय ते स्पष्ट लिहा?
काही विदारण म्हणजे काय?
जमिनीचे प्रकार कोणते?