भूगोल पृथ्वी भूशास्त्र

पृथ्वीचे बाहेरील कवच कोणते आहे?

3 उत्तरे
3 answers

पृथ्वीचे बाहेरील कवच कोणते आहे?

1
पृथ्वीच्या पूर्वी एक मोठी पृथ्वी होती. त्यावर काहीतरी प्रचंड आदळले आणि त्यातून चंद्र फुटून बाहेर पडला असा एक कयास आहे. त्यानंतर अंतरिक्षातले खूप काही लहान-मोठे आदळत राहिले, परंतु ते मात्र पृथ्वीने सामावून घेतले अशी कथा सांगतात. आपल्यात पृथ्वीला 'क्षमा' म्हणतात ते उगीच नाही. पृथ्वी एकेकाळी वायुमेघ होती पण त्या वायूतला हायड्रोजन आता नावापुरताही शिल्लक नाही. आहेत ते त्या वायूचे नंतरचे वंशज मुख्यतः लोखंड आणि सिलिका म्हणजे अभ्रक. पृथ्वीच्या गर्भात रसरशीत अतिउष्ण असा लोखंडाचा प्रचंड दाबामुळे घट्ट झालेला गोळा आहे. त्याच्या बाहेर बहिर्गर्भात वितळलेले लोखंड फेऱ्या मारते आहे. त्याच्या बाहेरचे आवरण उष्णच आहे. बऱ्यापैकी घट्ट आहे, परंतु लवचिक आहे. लोहार वाकवतात त्या स्थितीतले आणि त्याच्याबाहेर पृथ्वीचे कवच आहे, त्यातसिलिका किंवा अभ्रकाचे राज्य आहे. प्लास्टिकच्या आधी कचकड्याच्या वस्तू असत किंवा गारगोटी किंवा नर्मदेतला गोटा हे सगळे सिलिकाचे नातेवाईक. हा गडी टिकावू असतो. वाळूतही तोच असतो. पारदर्शकही होऊ शकतो. आणि अलिप्त राहतो. म्हणूनच मोतीबिंदू काढल्यावर सिलिकाच्या पारदर्शक संयुगाची भिंग बसवण्याची कल्पना पुढे आली. असा हा स्थितप्रज्ञ सिलिका. पृथ्वीचे कवच सीताफळाच्या सालीसारखे उंच सखल आहे. तिच्यात गरच जास्त आणि तो उष्ण आहे. हल्ली फॅशनेबल दुकानात फळे अगदी बारीक कागदात गुंडाळतात. तेवढेच आपले वातावरण आहे.
उत्तर लिहिले · 4/10/2021
कर्म · 121765
0
पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात आणि खडकाचे प्रकार कोणते आहेत, हे मात्र नक्की.
उत्तर लिहिले · 9/7/2022
कर्म · 0
0

पृथ्वीच्या बाहेरील कवचाला भूकवच म्हणतात.

भूकवचाची जाडी सुमारे 5 ते 70 किलोमीटर असते. ते मुख्यतः सिलिका आणि ॲल्युमिना यांपासून बनलेले आहे.

भूकवचाचे दोन मुख्य भाग आहेत:

  • continental crust (continental crust) - continental crust खंडीय भूकवच: हे जाड असून ग्रॅनाइट (granite) खडकांनी बनलेले आहे.
  • oceanic crust (oceanic crust) - महासागरीय भूकवच: हे पातळ असून बेसाल्ट (basalt) खडकांनी बनलेले आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440

Related Questions

जमीन म्हणजे काय?
शिलावरणाच्या उपस्तरांची नावे लिहा?
पृथ्वीच्या सर्वात वरच्या आवरणास काय म्हणतात?
पृथ्वीच्या पृष्टभागाचे बाहेरील आवरण कशाने बनले आहे?
पृथ्वीवरील सर्वात वरच्या थराला काय म्हणतात?
पृथ्वीच्या वरील थराला काय म्हणतात?
पृथ्वी च्या वरच्या थराला काय म्हणतात?