2 उत्तरे
2
answers
भागधारक म्हणजे काय?
5
Answer link
समभागाच्या मालकाला भागधारक म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी कंपनीच्या मालकीतील वाटेकरी बनतो.मुख्य मेनू उघडा
जनतेच्या (मर्यादित) भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) कंपनीच्या एकूण भांडवलाची रक्कम ज्या अनेक एककांमध्ये विभागलेली असते, अशा एककांना समभाग (फ्रेंच: Actions, स्पॅनिश: Acciones, पोर्तुगीज: Ações, जर्मन: Aktien, इंग्लिश: Shares / Stocks , शेअर्स / स्टॉक) किंवा शेअर असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची दर्शनी किंमत[श १] म्हणतात. समभागाच्या मालकाला भागधारक [श २] म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी कंपनीच्या मालकीतील वाटेकरी बनतो. भारतातील कंपन्यांच्या एका समभागाची किंमत बहुधा १० रुपये असते. मात्र, काही कंपन्यांच्या समभागाची दर्शनी किंमत, १रु, २रु, ५रु किंवा १०० रुपयेदेखील आहे.
"बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी लिमिटेड" अर्थात "बेस्ट" या मुंबईतील कंपनीचे समभाग प्रमाणपत्र
समभागांचे दोन मुख्य प्रकार आहेत. साधारण समभाग [श ३] आणि अधिमान्य समभाग [श ४]. सामान्य जनतेला अधिमान्य समभाग उपलब्ध नसतात.
हे समभाग एखाद्या अधिकृत दलालाकरवी वित्तीय बाजारातून विकत घेता येतात किंवा विकता येतात. अशा समभागाची किंमत दर्शनी किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. ही किंमत कंपनीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून त्या विशिष्ट समभागाच्या मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर दलालांनी ठरवलेली असते. एका दिवसाच्या अवधीत समभागाच्या किमतीत अनेक चढउतार होतात.
पुनर्गुंतवणूक न करण्यात आलेला नफ्याचा मोठा हिस्सा हा लाभांश [श ५] म्हणून भागधारकांना दिला जातो. दर समभागामागे किती लाभांश देऊ केला आहे, हे भागधारकाला कंपनीच्या वार्षिक अहवालावरून समजते. कंपनीला पुरेसा नफा झाला नाही तरी अधिमान्य समभागधारकांना लाभांश देणे कंपनीचे कर्तव्य असते. त्या वेळी साधारण भागधारकांना लाभांश मिळत नाही.
वित्तीय बाजारांमधील समभाग म्हणजे साधारण समभाग [श ३] किंवा अधिमान्य समभागांसारख्या [श ४] विविध वित्तीय साधनांसाठी[श ६], तसेच मर्यादित भागीदारी[श ७] व स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळातील[श ८] गुंतवणुकीसाठी हिशेबाचे एकक[श ९] असतो.
0
Answer link
भागधारक (Shareholder): भागधारक म्हणजे असा कोणताही व्यक्ती किंवा संस्था जी कंपनीच्या भागांची मालक असते.
व्याख्या: भागधारक हे कंपनीचे आंशिक मालक असतात आणि त्यांनी कंपनीत केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात त्यांना अधिकार आणि जबाबदाऱ्या असतात.
भागधारकांचे प्रकार:
- सामान्य भागधारक (Equity Shareholders): यांच्याकडेVoting right असतो.
- प्राधान्य भागधारक (Preference Shareholders): यांना लाभांश (Dividend) मिळवण्याचा प्राधान्य असतो.
महत्व: भागधारक कंपनीला भांडवल पुरवतात आणि कंपनीच्या धोरणांमध्ये भाग घेतात.
उदाहरण: जर तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स असतील, तर तुम्ही त्या कंपनीचे भागधारक आहात.