व्याकरण वाक्यविचार

वाक्यरचनेचे प्रकार किती आहेत?

2 उत्तरे
2 answers

वाक्यरचनेचे प्रकार किती आहेत?

5
प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते. 

वाक्याचे प्रकार

मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

 1. अर्थावरून पडणारे प्रकार
2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्‍या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार


अर्थावरून पडणारे प्रकार :

1. विधांनार्थी वाक्य –

ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा .

मी आंबा खातो.
गोपाल खूप काम करतो.
ती पुस्तक वाचते.


2. प्रश्नार्थी वाक्य –

ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.

तू आंबा खल्लास का?
तू कोणते पुस्तक वाचतोस?
कोण आहे तिकडे?


3. उद्गारार्थी वाक्य –

ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.

अबब ! केवढा मोठा हा साप
कोण ही गर्दी !
शाब्बास ! UPSC पास झालास
वरील प्रकारातील वाक्य होकारार्थी व नकारार्थी या दोन्ही प्रकारातून व्यक्त करता येते.


4. होकारार्थी वाक्य –

ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .
उदा .

माला अभ्यास करायला आवडते.
रमेश जेवण करत आहे.
माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.


5. नकारार्थी वाक्य –

ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.

मी क्रिकेट खेळत नाही.
मला कंटाळा आवडत नाही.


6. स्वार्थी वाक्य –

ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.

मी चहा पितो.
मी चहा पिला.
मी चहा पिनार.


7. आज्ञार्थी वाक्य –

ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.

तो दरवाजा बंद कर (आज्ञा)
देव तुझे भले करो (आशीर्वाद)
कृपया शांत बसा (विनंती)
देवा माला पास कर (प्रार्थना)
प्राणिमात्रांवर द्या करा (उपदेश)


8. विधार्थी वाक्य –

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.

आई वडिलांची सेवा करावी (कर्तव्य)
तू पास होशील असे वाटते (शक्यता)
ते काम फक्त सचिनच करू शकतो (योग्यता)
तू माझा सोबत यायला हवे असे माला वाटते (इच्छा)


9. संकेतार्थी वाक्य –

जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.

जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.
पाऊस पडला तर पीक चांगले येईल.
गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता.
जर काळे ढग झाले असते तर जोरदार पाऊस झाला असता.



2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार :

1. केवळ वाक्य –

ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.
उदा.

राम आंबा खातो.
संदीप क्रिकेट खेळतो.


2. संयुक्त वाक्य –

जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदा.

विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.
भारतात कला पैसा आला आणि बेकरी वाढली.


3. मिश्र वाक्य –

जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.
उदा.

नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला.
तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली.
रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला.  
उत्तर लिहिले · 3/9/2021
कर्म · 25850
0

अर्थानुसार वाक्यांचे प्रकार:

  1. विधानार्थी वाक्य: ज्या वाक्यात केवळ माहिती दिलेली असते.
  2. प्रश्नार्थी वाक्य: ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो.
  3. उद्गारार्थी वाक्य: ज्या वाक्यात तीव्र भावना व्यक्त केलेली असते.
  4. आज्ञार्थी वाक्य: ज्या वाक्यात आज्ञा, विनंती,permission दिलेली असते.

रचनानुसार वाक्यांचे प्रकार:

  1. केवल वाक्य: ज्या वाक्यात एकच कर्ता आणि क्रियापद असते.
  2. संयुक्त वाक्य: जे वाक्य दोन किंवा अधिक केवल वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडले जाते.
  3. मिश्र वाक्य: ज्या वाक्यात एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये असतात.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2800

Related Questions

वाक्याचे चार प्रकार लिहा?
वाक्याचे चार प्रकार कोणते?
वाक्य घेऊन उदाहरण आधाराने स्पष्ट करा: वाक्य गुण?
प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाचे प्रकार कोणते?
वाक्याचे गुण उदाहरणानुसार आधारावर स्पष्ट करा?
वाक्याच्या वेळा समजावून सांगा आणि वाक्याचे विविध प्रकार कसे स्पष्ट कराल?
वाक्याचे गुण उदाहरणानुसार कसे स्पष्ट कराल?