3 उत्तरे
3
answers
वेळेनिष्ठता म्हणजे काय?
1
Answer link
ठरलेल्या वेळेत ठरलेली कामे व्यवस्थित पूर्ण करण्याचा अनेकांचा अट्टहास असतो. त्यालाच वक्तशीरपणा म्हणतात. जगातील अनेक मोठे नेते वक्तशीरपणाबद्दल फारच आग्रही होते.
वक्तशीरपणा म्हणजे हाती घेतलेले काम नियोजनानुसार यशस्वी पार पाडणे, वेळ पाळणे, ठरलेले काम वेळेवर करणे होय. स्वतःच्या आणि इतरांट्या वेळेटी जाणीव ठेवून केलेले काटेकोर वर्तन म्हणजे वक्तशीर वागणे होय. आपल्या शाळेची वेळ, कामाच्या वेळा, गाड्यांच्या वेळा, समारंभाचे वेळापत्रक, ठरवलेल्या भेटीची वेळ यांबाबतीत वक्तशीरपणा असला पाहिजे. व्यक्तिगत यश, राष्ट्रीय पातळीवरील यश यांत वक्तशीरपणा हा महत्त्वाचा घटक आहे. थोर माणसांच्या थोरपणाचे गमक म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा होय. विद्यार्थीजीवनात जडलेल्या सवयी आयुष्यभर साथ देतात. यासाठी प्रत्येक काम वेळेनर करणे आवश्यक आहे. नियोजित काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे, स्वतः वेळ पाळणे, दुस-याला वेळ पाळण्यास लावणे, दुस-याच्या वेळेसही महत्त्व देणे हे वक्तशीरपणात अपेक्षित आहे.
वक्तशीरपणा म्हणजे कमीत कमी वेळात अधिकाधिक काम करणे होय. आयुष्यात यशस्वी झालेल्या थोर व्यक्तींना आपण त्यांच्या यशाचे रहस्य विचारले असता अनेकदा वक्तशीरपणा हेच मूल्य समोर येते. यशस्वी होण्यासाठी, हाती घेतलेले छोटे-मोठे कार्य पूर्ण करण्यासाठी वक्तशीरपणा या मूल्याला पर्याय नाही. स्वतः वेळ पाळणे आणि इतरांना वेळ पाळण्यास प्रवृत्त करणे यास वक्तशीरपणा म्हणतात.
अपेक्षित वर्तनबदल
विद्यार्थी शालेय वेळापत्रकाचे काटेकोर पालन करतात.
विद्यार्थी स्वतःच्या वेळेचे महत्त्व जाणून दुस-यांच्या वेळेलाही महत्त्व देतात.
विद्यार्थी दिलेली वेळ पाळतात.
दैनंदिन जीवनात विद्यार्थी आपला दिनक्रम तयार करून त्यानुसार तो पार पाडतात.
वेळ पाळण्यात चूक झाल्यास विद्यार्थ्याला अपराधीपणा जाणवतो.
इतरांना भेटण्याची वेळ व स्वतःची वेळ देतो.
उपक्रम
शाळेचे दैनंदिन, मासिक, अर्धवार्षिक, वार्षिक वेळापत्रक, उपक्रमपत्रक तयार करणे.
स्वतःचे दैनंदिन वेळापत्रक तयार करण्यास सांगणे व करून घेणे.
वेळेचे महत्त्व सांगणारे प्रसंग, घटना, कविता, साहित्य यांचे एकत्रीकरण करणे.
वेळेचे महत्त्व सांगणा-या वचनांचा संग्रह करणे. विविध भाषांमधील वेळेच्या संदर्भातील सुवचनांचा संग्रह करणे.
वेळ पाळणा-या विद्यार्थ्यांचे सार्वजनिकरीत्या कौतुक करणे.
0
Answer link
वेळेवर कोणतीही गोष्ट न केल्याने अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. वेळेचे व्यवस्थापन न केल्यास अनेक समस्या येतात. त्यामुळे व्यक्ती आणि संस्था दोघांचेही नुकसान होते.
* **व्यक्तीचे नुकसान:**
* कामात दिरंगाई: वेळेवर काम न केल्यास कामात दिरंगाई होते आणि काम वेळेवर पूर्ण होत नाही.
* संधी गमावणे: अनेक संधी वेळेवर काम न झाल्यामुळे हुकतात.
* नकारात्मक परिणाम: कामामध्ये चुका होण्याची शक्यता वाढते.
* ताण आणि चिंता: वेळेवर काम न झाल्यामुळे ताण आणि चिंता वाढते.
* **संस्थेचे नुकसान:**
* उत्पादकता कमी: वेळेवर काम न झाल्यामुळे संस्थेची उत्पादकता कमी होते.
* नफा घटतो: कामात दिरंगाई झाल्यास संस्थेचा नफा घटतो.
* प्रतिष्ठा कमी: वेळेवर काम न केल्यामुळे संस्थेची प्रतिष्ठा कमी होते.
* संबंध बिघडतात: ग्राहक आणि भागीदारांशी संबंध बिघडण्याची शक्यता असते.
0
Answer link
वेळेनिष्ठता म्हणजे काय?
वेळेनिष्ठता म्हणजे कोणतीही गोष्ट वेळेवर करणे. वेळेचे महत्त्व ओळखून प्रत्येक काम त्याच्या नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण करणे म्हणजे वेळेनिष्ठता होय.
- उदाहरण: एखादी व्यक्ती सकाळी 9 वाजता ऑफिसला पोहोचायची आहे, आणि ती न चुकता 9 वाजता पोहोचते, तर ती व्यक्ती वेळेनिष्ठ आहे असे म्हणता येईल.
- वेळेनिष्ठता केवळ कामाच्या ठिकाणीच नाही, तर आपल्या वैयक्तिक जीवनातही खूप महत्त्वाची आहे.
वेळेनिष्ठता एक चांगला गुण आहे जो आपल्याला यशस्वी होण्यास मदत करतो.
अधिक माहितीसाठी: https://www.mpsconline.gov.in/Rajbhasha/Marathi_Glossary/V